बिबवेवाडी गंगाधाम चौकातील सॉलिटेअर एमटीएम ने पुणे महापालिकेचे थकविले दोन कोटी रुपये
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरासह दक्षिण पुण्यात बेकायदेशिर होर्डींगवाल्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यात एका आकारमानाच्या होर्डींगला परवानगी घेवून प्रत्यक्षात जागेवर जास्त आकारमानाचे होर्डींग उभारले गेले आहेत. वर्षानुवर्षे पुणे महापालिकेचा महसुल बुडविला जात आहे. दरम्यान पुणे महापालिकेतील आकाशचिन्ह व अतिक्रमण विभागावर उपआयुक्त माधव जगताप यांचीच मिरासदारी होती व आहे. त्यामुळे मागील सात/आठ वर्षात आकाशचिन्ह विभागाने पुणे महापालिकेच्या महसुलात वाढ करण्याऐवजी स्वतःचा आर्थिक विकास करण्याचे धोरण अवलंबविल्यामुळे पुणे शहरात होर्डींगचा धुमाकुळ सुरू आहे. त्यात बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील व पुण्याच्या दक्षिण भागातील सॉलिटेअर एमटीएम बांधकाम व्यावसायिकाने लहान मोठ्या आकारमानाचे सुमारे 125 पेक्षा अधिक होर्डींग उभे केले आहेत. तथापी मागील काही वर्षांपासुन त्यांनी होर्डींगचा महसुल भरला न...