पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम की,भानुप्रताप बर्गे?
पुण्याचे पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी पदभार स्वीकारल्या
दिवसापासूनच शहरातील हुक्का पार्लर, मटका जुगार अड्ड्यांसह अवैध धंद्यावर धडाधड कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. पुणे पोलीस
आयुक्तालय आणि शहर पोलीसांनी मागील १०० वर्षात जे काम केले नाही, ते काम एकट्या बर्गे
यांनी एका दिवसात करून दाखविल्याने पुण्यातील प्रसार माध्यमे, जनसंपर्क विभागासह पुणे
शहर पोलीस आयुक्तालय चक्रावुन गेले आहे. त्यामुळे सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, ११ पोलीस उपायुक्त, चारपाच
डझन सहाय्यक आयुक्तांसह, १२ हजार पोलीस कर्मचारी हे निव्वळ नामधारी असून सध्या नियुक्तीवरील
या वरीष्ठ अधिकार्यांची तातडीने बदली करून, त्यांची गरजु जिल्ह्यात बदली करावी व ती
पदे रिक्त करण्यात यावीत. आयुक्तालयाची सर्व कामे एकटे भानुप्रताप बर्गे करण्यास सक्षम
ठरल्याने, पोलीस ठाणी देखील कामचुकार ठरली आहेत. श्री. बर्गे यांच्या सारखे ...