बिबवेवाडी पोलीस स्टेशनची हद्द म्हणजे दिन और रात – दण्णा-दण्णी , आपटा – रपटी आणि मारतोड
bibawewadi police
एक गुन्हा माझ्याकडे का बघितले म्हणून आणि दुसरा गुन्हा मला का हाक मारलीस म्हणून लोअर इंदिरा नगरात तुफान हाणामारी
पुणे/दि/ प्रतिनिधी/बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवस असो की रात्र, लाठी-काठी, कुर्हाड-कोयता, गुप्ती - तलवार आणि राहिलं तर मग गावठी कट्टा… दोन्ही गटात आणि कधी कधी आपआपसात गुन्हेगारांचे दे दणादण वाजणं नेहमीच झालं आहे. ठिकाणही नेहमीचीच आहेत. गुन्हेगार देखील ओळखीचेच. परंतु कायद्याचा धाक मात्र शून्य. कायदा आणि सुव्यवस्थेला कशा वाकुल्या दाखविल्या जातात हे बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील राड्यावरून सहज लक्षात येत.पुरेशा प्रमाणात देशी विदेशी दारू आणि जोडीला सुरू असलेली हातभट्टीचे फुगे, मटका आणि जुगारांचे दिवस-रात्र सुरू असलेले डाव यामुळे तर दिन दूनी आणि रात चौगुणी होत असते. यातूनच मग नंतर एकमेकांशी खुनशी वाढत जातात.रविवार आणि सोमवारी बिबवेवाडी पोलीस स्टेशन ह...