
दत्तवाडी- उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत चंदनचोरी,
गुन्हे शाखा युनिट 3 कडून चंदनचोरी करणारी टोळी गजाआड
पुणे/दि/ प्रतिनिधी/ नॅशनल फोरम/पुणे शहरात चोरी, दरोडा, लुटालुटीच्या घटना घडत असतांना, विविध पोलीस स्टेशन हद्दीत बंदुका, पिस्तुल, घातक शस्त्रास्त्रे पकडली जात आहेत. जेवढी पकडली जात आहेत ती सर्वांना दिसत आहेत, परंतु जी हत्यारे अद्याप पर्यंत जप्त केली नाहीत त्यांची संख्या किती असू शकते याचा अंदाजही कुणी बांधु शकत नाही. चोरट्यांनी आता दरोड्यासह त्यांचा मोर्चा चंदनाच्या झाडकडे वळविला असल्याचे दिसून येत आहे. दत्तवाडी व उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत देखील चंदनाच्या झाडांची चोरी झाली, परंतु गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात दोन्ही पोलीस स्टेशनच्या यंत्रणा निकामी ठरल्या. अशावेळी गुन्हे युनिट शाखा क्र. 3 यांनी पुढे येऊन चंदन चोरांचा छडा लावला आहे. यामध्ये चोरांकडून आणखी पाच गुन्हे उघड झाले आहेत. दत्तवाडी, उत्तमनगर, डेक्कन, बंडगार्डन, वानवडी हद्दीतील चंदनाच्या झाडांची चोरी केल्याच्या गुन्ह्याची कबुली चोरट्...