सहकारनगर पोलीस स्टेशनला पाहिजे असलेला तडीपार आरोपी भारती विदयापीठ पोलीसांच्या जाळ्यात
आरोपीकडुन एक गावठी बनावटीची पिस्टल व एक जिवंत काडतुस केले जप्त.
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/दिवाळी सणानिमीत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी, धिरज गुप्ता व पोलीस अमंलदार हे पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार अभिजीत जाधव व राहुल तांबे यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडुन तडीपार केलेला आरोपी अजिंक्य संतोष काळे, रा. स.नं. 25/2 गणेशनगर, आंबेगाव पठार, पुणे हा नवले पुलाखालील चौकाकडुन कात्रज दिशेने येणारे हायवे वरील चिंतामणी ज्ञानपीठकडे जाणा-या रोडवर थांबला असुन त्याचेकडे पिस्टल व जिवंत काडतुसे आहे.
त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी नवले पुला खालील चौकाकडुन कात्रज दिशेने येणारे हायवेवरील चिंतामणी ज्ञानपीठकडे जाणा-या रोडवर जावुन पाहणी केली असता, तेथे तडीपार आरोपी अजिंक्य संतोष काळे हा तिथे दिसून आला. भारती विद्यापीठ पोलीसांनी त्याची अं...