मुस्लिमांना दुय्यम दर्जाच्या वागणूकीविरूद्ध आयएएस अधिकारी शाह फैजल यांचा राजीनामा
काश्मीर/ दि/
यूपीएससी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावणारे पहिले
काश्मिरी ठरलेले, सन २००९च्या तुकडीतील आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी बुधवारी सेवेचा
राजीनामा दिला. काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या हत्या आणि भारतीय मुस्लिमांना
दिली जात असलेली दुय्यम वागणूक याच्या निषेधार्थ राजीनामा देत असल्याचे ३५ वर्षीय फैजल
यांनी सांगितले.
फेसबुक
पोस्टद्वारे त्यांनी ही घोषणा केली आहे. ‘काश्मीरमध्ये सातत्याने होणार्या हत्या,
त्या रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून केले जाणारे अपुरे प्रयत्न, ब्राम्हणवादी गटांकडून
२० कोटी भारतीय मुस्लिमांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, जम्मू-काश्मीर राजाच्या स्वतंत्र
ओळखीवर हल्ले करून ती पुसण्...





