पुणे महापालिकेचा गोरगरीबांच्या घरावर भर पावसाळ्यात बुलडोजर,करबुडव्या -हडपसर मार्केटयार्डातील कोट्यधीशांवर मात्र सवलतींचा वर्षाव
पुणे/दि/ प्रतिनिधी/सामाजिक न्यायाच्या नावानं आरोळी ठोकत सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने आणि पुणे महापालिकेतील भाजपाच्या सत्ताधार्यांनी पुण्यातील गोरगरीबांच्या घरावर भर पावसाळ्यात बुलडोझर फिरविला आहे. २०१९ मध्ये आलेल्या पावसामुळे आंबिल ओढ्यातील अनेक कुटूंबे उध्वस्त झाली होती. त्यामुळे आंबिलओढ्यातील अतिक्रमणे काढण्यास सुरूवात केली. परंतु बिल्डरांच्या फायदयासाठीच आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरीकांनी केला आहे. सत्ता आणि पोलीसी बळावर मोठा फौजफाटा घेवून ही कारवाई करण्यात आली आहे. परंतु दुसरीकडे मात्र हडपसर आणि मार्केटयार्डात कोट्यधीश असलेल्या अनेक श्रीमंतांनी भली मोठी अतिक्रमणे केली आहेत, पुणे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा टॅक्स बुडविला आहे. हे वास्तव असतांना देखील हजार पाचशे पोलीसांच्या बळावर गोरगरीबांच्या घरावर भल्या पहाटेच बुलडोझर फिरव...