कॉंग्रेसवाले एकटा चलो रे….
मुंबई/दि/कॉंग्रेसची देशातील सत्ता गेली, राज्यातीलही गेलीच होती. पुणे महापालिकेसह राज्यातील बहुतांश महापालिकेतील सत्ता गेलेली आहे. दोन चार पक्षांच्या कुबड्या घेवून हा पक्ष निदान कसा बसा सत्तेत असतांना, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेता असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील कॉंग्रेसच्या पुढार्यांना हसावे ही रडावे अशी अवस्था झाली आहे. एवढी रक्कम खर्च करून नगरसेवक तरी होणार का ही भिती सध्या तरी पुण्यातून दिसून येत आहे.राज्यात सरकार चालवताना जरी तिन्ही पक्ष एकत्र असले तरी स्थानिक पातळीवरील वाद कधी लपले नाहीत, त्यामुळेच कॉंग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. त्या अनुषंगाने राज्यातल्या नेतृत्वाने हलचालीही सुरू केल्या आहेत, महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची नावं प्रदेश कार्य...