पुणे महापालिकेतील हजारो कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी,
महापालिका आयुक्त विक्रम कुमार, रविंद्र बिनवडे यांची
सीबीआय- ईडी मार्फत चौकशी करा
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पुणे शहरातील 50 लाख लोकसंख्येसाठी सुमारे 35 हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांव्दारा पुणे महापालिकेचे प्रशासन चालविण्यात येत आहे. या 35 हजार कर्मचाऱ्यांची बदली, पदोन्नती तसेच काही विशिष्ठ अधिकाऱ्यांना पदांचा, अतिरिक्त पदभार व प्रभारी पदभार या पदांसाठी लाखोंची बोली आणि कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, याची रक्कम काही हजार कोटींच्या घरात पोहोचली असल्याचा अंदाज आहे. आज बहुतांश कर्मचारी पगाराला एका खात्यात आणि कामाला दुसऱ्या खात्यात आहेत. पदांचा बाजार मांडला गेला आहे. महाराष्ट्र शासनाचा बदलीचा अधिनियम निव्वळ कागदावर ठेवला गेला आहे. त्यामुळे या सर्व बदली, पदोन्नती, अतिरिक्त व प्रभारी पदभाराच्या गैरव्यवहारातील हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी पुणे महापालिकेचे आयुक्तश्री. विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांची सीबीआय व ईडी मार्फत चौ...