पुणे शहर वाहतुक पोलीसांची पोलखोल रस्ता सुरक्षा, हेल्मेट सक्ती आणि समुपदेशनाच्या नावाखाली वाहतुक पोलीसांकडून दरोड्याचे नव नवीन फंडे
/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
रस्त्यावरील वाढते अपघातांना वाहनचालकच अधिक जबाबदार असतात. सिट बेल्ट किंवा हेल्मेट परिधान न केल्यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्या कारणामुळे राज्य शासनाने रस्ता सुरक्षा अभियान सुरू करून, शासन निर्णयाव्दारे ते आदेश पारीत केले आहेत. अगदी त्याचाच धागा धरून, पुणे शहर वाहतुक विभागाने हेल्मेट सक्तीचा, पुणे शहरात कहर केला आहे. शासन निर्णय महाराष्ट्रासाठी आहे, केवळ पुणे शहरापुरता मर्यादीत नाही. एवढी मोठी जबरी कारवाई राज्यात कुठेही नसतांना,(आमचे शेजारी पिंपरी चिचंवड पोलीस आयुक्तालय असतांना देखील तिथे एवढी जबरदस्ती नाही) निव्वळ पुणे शहरात ती रट्टावुन राबविली जात आहे. दोनशे रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत दंडाची वसूली केली जात आहे. कारवाई बाबत उद्रेक झाल्यानंतर मात्र वाहतुक ...