Thursday, December 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शासन यंत्रणा

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांनो आपणांस हे माहिती काय आहे….<br>10 हजार सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावाने आंदोलन करणारे दारू पिऊन धिंगाणा का घालत होते….

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांनो आपणांस हे माहिती काय आहे….
10 हजार सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावाने आंदोलन करणारे दारू पिऊन धिंगाणा का घालत होते….

शासन यंत्रणा
सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगारांना वेतन नाही -1) कामगार आयुक्त कार्यालयातील माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतन म्हणून दरमहा 21 हजार ते 25 हजार रूपये देणे शासनाच्या नियमान्वये आवश्यक आहे. तथापी खाजगी ठेकेदारांनी- सुरक्षा रक्षकातील कामगारांना त्यांचा हक्काचा पगार दिला नाही. पीएफ व ईएसआय वेळेत भरला गेला नाही. तसेच पुणे महापालिकेकडे कामगार कल्याण विभागाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे, हे खरे आहे काय… मनपा बाहेर आंदोलन करणारे फुकट बसले होते काय -ज्यांच्या नावाने पैसे घेतले त्यांनाच दारू पिऊन शिव्या दिल्या -2.पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतन, ईएसआय, इपीएफ मिळत नाही म्हणून काही संघटनांनी पुणे महापालिकेच्या बाहेर 1 दिवस, 2 दिवस… काही संटनांनी 5 दिवस तर काही संघटनांनी 500 दिवसही आंदोलन केले. या आंदोलनाचे फलित काय….. न्याय का मि...
पुणे महापालिकेत पदभरती -पदोन्नतीचा सट्टा बाजार,

पुणे महापालिकेत पदभरती -पदोन्नतीचा सट्टा बाजार,

शासन यंत्रणा
20 टक्क्यांना पदभरती- पदोन्नती देण्यासाठी 80 टक्के कर्मचाऱ्यांचा छळ, भुलभुल्लैयांचा मेळ, मिळून खेळू खेळ…पुणे/दि/ प्रतिनिधी/ national forum/पुणे महानगरपालिकेच्या सेवेमध्ये 1997-98 मध्ये रुजू झालेल्यांना आज 2022 पर्यंत एक किंवा दोन पदोन्नती मिळाल्या असल्याची 70 टक्के उदाहरणे आहेत. बाकीच्या 20/ तीस टक्के वाल्यांना मात्र दे दण्णदण्ण पदोन्नती मिळत गेल्या असल्याचे दिसून येत आहे. तांत्रिक व अतांत्रिक पदांवर पदोन्नती देतांना प्रचंड भेदभाव करण्यात आला आहे व तो भेदभाव आजही सुरू आहे. तांत्रिक विभागात कनिष्ठ अभियंता असलेले आज कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता या पदावर कार्यरत आहेत. तर काही अभियंते हे आजही उपअभियंता या पदावर कार्यरत आहेत. एवढा हा भेदभाव आहे. अतांत्रिक पदांवर देखील क्लार्क किंवा लघुटंकलेखक या पदावरील सेवक आज खातेप्रमुख झाले आहेत, तर काही विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तर 80 टक्के कर...
पुणे महापालिकेतील उपकामगार अधिकारी पदाच्या भरतीचे गौडबंगाल

पुणे महापालिकेतील उपकामगार अधिकारी पदाच्या भरतीचे गौडबंगाल

शासन यंत्रणा
कार्यरत प्रभारी, भ्रष्टाचारी उपकामगार अधिकाऱ्यांना पदोन्नतीची खिरापत पुणे/दि/ प्रतिनिधी/ नॅशनल फोरम/पुणे महानगरपालिकेतील उपकामगार अधिकारी या प्रशासकीय सेवा श्रेणी 3 मधील पदाच्या भरतीचे गौडबंगाल समोर आले असून, सध्या मुख्य कामगार अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या खात्यामधील प्रभारी उपकामगार अधिकारी यांना कायमस्वरूपी उपकामगार अधिकारी या पदावर पदस्थापना करण्याच्या उद्देशाने दि. 28 ऑगस्ट रोजीची जाहीरात काढली असल्याची चर्चा सध्या पुणे महापालिकेच्या वर्तूळात सुरू आहे. उपकामगार अधिकारी वर्ग 3 या पदावर तदर्थ पदोन्नतीने नियुक्ती देणेकामी अर्ज मागविण्यात आले आहेत. उपकामगार अधिकारी हे पद नामनिर्देशनाने 50 टक्के व पदोन्नतीने 50 टक्के भरण्याचे नवीन सुधारित आकृतीबंधामध्ये तरतुद आहे. तथापी आता करण्यात येणारी भरती प्रक्रिया ही पदोन्नतीने करण्यात येणार आहे. दरम्यान उपकामगार अधिकारी यामधील अर्हत...
पुणे महापालिकेतील कामगार कल्याण विभागातील उपकामगार अधिकारी पदाची पदोन्नती पदस्थापना रद्द करण्याची मागणी

पुणे महापालिकेतील कामगार कल्याण विभागातील उपकामगार अधिकारी पदाची पदोन्नती पदस्थापना रद्द करण्याची मागणी

शासन यंत्रणा
कोणत्याही सरळसेवेने किंवा पदोन्नतीमध्ये प्रभारी पदाचा अनुभव ग्राह्य धरता येत नाही तसेच प्रभारी उपकामगार अधिकारी अनुभव कोणत्या आधारावर ग्राह्य धरीत आहेत ? पुणे/दि/ प्रतिनिधी/ national forum/मुख्य कामगार अधिकारी श्री. शिवाजी दौंडकर यांनी 26/7/2021 रोजी उपकामगार अधिकारी या पदाच्या मुळ मंजुर आकृतीबंधामध्ये बदल करण्याबाबत शासनास पत्रव्यवहार करण्यात आला व नगरविकास विभागाने 6 मे 2022 रोजी उपकामगार अधिकारी या पदाच्या शैक्षणिक अर्हता व पात्रतेमध्ये बदल करण्यात आले आहे. मुळ आकृतीबंधामध्ये उपकामगार अधिकारी हे पद सरळसेवा नामनिर्देशनाने 100 टक्के भरण्याची तरतुद असतांना, नवीन बदलानुसार एकुण पदांच्या 50 टक्के नामनिर्देनासने व 50 टक्के पदभरती पदोन्नतीने करण्याचा निर्णय प्राप्त झाला आहे. दरम्यान मुख्य कामगार अधिकारी यांनी केवळ मर्जीतल्या सेवकांना पदोन्नती देण्यासाठीच मुळ आकृतीबंधामध्ये बदल करण्यात आले अ...
लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील,सेंट मेरी शाळेतील विद्यार्थींनींचा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे हस्ते सत्कार

लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील,सेंट मेरी शाळेतील विद्यार्थींनींचा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे हस्ते सत्कार

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/ national forum/लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर हद्दीतील सेन्ट मेरी स्कुल, कॅम्प, पुणे येथील विद्यार्थीनी यांनी आय.सी.एस.सी बोर्ड 10 वी च्या परिक्षेत भारतात अ.क्र .01 कु . हरगुणकौर मथारु यांनी 99 .8 टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला व अ.क्र.02 कु . शिवाणी देव यांनी 99 .6 टक्के घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला . त्यांचा सत्काराचा व इतर मुलीना त्यांच्यापासून प्रोत्साहन मिळावे या करीता लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक कदम व सेन्ट मेरी स्कुलचे मुख्याध्यापीका श्रीमती सुजाता मल्लीक कुमार यांच्या संयुक्तीक रित्या आज दि . 03/08/2022 रोजी पोलीस आयुक्त पुणे शहर श्री . अमिताभ गुप्ता, याच्या हस्ते ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला . तसेच सदर विद्यार्थीनी सेन्ट मेरी स्कुलचे मुख्याध्यापीका श्रीमती सुजाता मल्लीक कुमार , उपमुख्याध्यापीका श्रीमती ओहोळ व...
पुण्यातील आंबिल ओढा झोपडपट्टीच्या विकसकावर ॲट्रॉसिटी कायदयाखाली गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

पुण्यातील आंबिल ओढा झोपडपट्टीच्या विकसकावर ॲट्रॉसिटी कायदयाखाली गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

शासन यंत्रणा
पुण्यातील आंबिल ओढा national forum पुणे/दि/ प्रतिनिधी/भारतातील अनुसूचिज जाती आणि अनुसूचित जमाती ह्या मूळनिवासी जमाती म्हणून ओळखल्या जातात. परंतु वर्षानुवर्षे त्यांचे नैसर्गिक व न्यायिक हक्क हिरावून घेवून इथली भांडवलदारी यंत्रणा त्यांना जीवन जगु देत नाहीत. राज्यातील ग्रामीण भागात होणारा जातीय अत्याचार आणि शहरासारख्या ठिकाणी देखील पोहोचला आहे. त्यामुळे न्यायिक हक्कासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांविरूद्ध खोट्या केसेस करणे, त्यांना कायदयाव्दारे अटकाव करून त्यांच्या कर्तव्यापासून त्यांना परावृत्त करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. तथापी न्यायालयाने अनु. जाती व जमाती यांची न्यायिक बाजू लक्षात घेवून, पुण्यातील आंबिल ओढा झोपडपट्टीचे विकसक, केदार असोसिएटचे साथीदार दिलीप देशमुख व बांधकाम व्यावसायिक श्री. सूर्यकांत निकम व प्रताप निकम यांवर अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे पुणे न्यायालयाने न...
चतुःश्रृंगीतील जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षेचा छापा

चतुःश्रृंगीतील जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षेचा छापा

शासन यंत्रणा
कुप्रसिध्द गुन्हेगार झुलकर खान व प्रमोद भेंडे याच्या जुगार अड्ड्यावरून. 5.26 लाखांच्या मुद्देमालासह, 17 आरोपींविरुद्ध कारवाई.कारवाईत चारचाकी, दुचाकी, मोबाईल सह टेबल, खुर्च्या, सोफे जप्त पुणे/दि/ प्रतिनिधी/सामाजिक सुरक्षा विभागास अवैध जुगाराच्या धंद्याबाबत मिळालेल्या बातमीनुसार, चतुःृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, दर्शन रीव्हर साईड हॉटेल, सांगवी स्पायसर रोड, औंध, या हॉटेलमध्ये व हॉटेलबाहेरील मोकळ्या जागेत बाईकवर सुरू असलेल्या पैशावर मटका, सोरट, पंकी पाकोळी, वगैरे जुगार गैरकारदेशीरीत्या खेळत व खेळवत असलेचे समजलेने, पंचासमक्ष या ठिकाणी रात्रौ सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून, सोरट, पंकी पाकोळी, मटका जुगार, वगैरे प्रकारचे जुगार खेळणारे तसेच अवैध रीत्या विदेशी मद्याचा साठा व विक्री करणारे आरोपी मिळून आलेने, 4 जुगार खेळवणारे, 4 जुगार खेळणारे व पाहीजे आरोपी 9 (त्यात जुगारासह अवैध वि...
पुणे महापालिकेतील 10 हजार कंत्राटी कामगारांचे 2700 कोटी रुपयांच्या महाघोटाळा

पुणे महापालिकेतील 10 हजार कंत्राटी कामगारांचे 2700 कोटी रुपयांच्या महाघोटाळा

शासन यंत्रणा
घोटाळेबाजांना पदोन्नतीची खिरापत, पुणे महापालिकेच्या आकृतीबंधात मनमानी फेरबदलपुणे/दि/ नॅशनल फोरम प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांचे सेवाप्रवेश नियम 2014 च्या अधिसुचनेनुसार निर्गमित केले आहेत. दरम्यान आकृतबंधामध्ये प्रशासकीय सेवा मध्ये पुनः उपकामगार अधिकारी हे पद निर्माण करून सेवाप्रवेश नियमामध्ये बदल एप्रिल 2022 रोजी करण्यात आलेला आहे. त्यानुसार नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी श्री. दिलिप वाणिरे यांनी पुणे महापालिकेच्या आस्थापनेवरील उप कामगार अधिकारी या पदाचे सुधारित सेवाप्रवेश नियम, नेमणूकीची पद्धत व टक्केवारी निश्चित केली असून 50 टक्के नामनिर्देशानाने व 50 टक्के पदोन्नतीने भरण्याचे आदेश निर्गमित केले आहे. वस्तुतः 100 टक्के पदे नामनिर्देशानाने भरण्याची तरतुद आकृतीबंधामध्ये असतांना देखील केवळ जवळच्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीचे मार्ग खुले करून दिले आहेत. प्रशासकीय सेवा...
पुणे महापालिकेने लाडावुन ठेवलेल्या …..क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस कंपनीकडून सुरक्षा रक्षकांना पगारच नाही,

पुणे महापालिकेने लाडावुन ठेवलेल्या …..क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस कंपनीकडून सुरक्षा रक्षकांना पगारच नाही,

शासन यंत्रणा
पुणे/दि/ नॅशनल फोरम प्रतिनिधी/पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना मागील चार महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीये. महापालिकेच्या मालकीच्या मिळकती, दवाखाने, उद्यान, पाणी टाकी व कार्यालये येथे कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. सुमारे 32 कोटी रुपयांचे हे कंत्राट मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला दिले आहे. ही कंपनी भारतीय जनता पार्टीच्या बड्या नेत्याची असून केवळ दबावापोटी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने या कपंनीचा प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप प्रस्ताव मंजुरीच्यावेळी विरोधकांकडून करण्यात आला होता. या कंपनीच्या मार्फत 1500 कंत्राटी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेसोबत झालेल्या करारानुसार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत कंपनीकडून सुरक्षा रक्षकांना वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र कराराचे उल्लंघन होत असून स...
पुणे पोलीसांना आली लहर…आणि रात्रीत केला कहर…

पुणे पोलीसांना आली लहर…आणि रात्रीत केला कहर…

शासन यंत्रणा
पोलीसांच्या साध्या अचानक छापामारीत सापडले बंदूका, तलवारी, कोयते, बंदूकीच्या पोतभरून गोळ्यापुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस काही कामच करीत नाहीत, स्थानिक पोलीस गुन्हेगारांवर मेहेरबान आहेत असा आरडा ओरडा सर्व बाजुने होत असल्याने अखेर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने, एका रात्रीत साधी छापामारी केली अन्‌‍ गुन्हेगारांकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत बंदूका, बंदूकीला लागणाऱ्या गोळ्या, कोयते, तलवारी मोठ्या संख्येने पकडले आहेत. त्यातच 14 तडीपार इसम पुणे शहरात वास्तव्य करीत असल्याचे आढळुन आले आहे. ही साधी छापमारी होती. परंतु खरीच मोठी कारवाई केल्यास, दोन/पाच ट्रक भरून शस्त्रसाठी आढळुन येईल यात शंकाच नसल्याचे या कारवाईवरून अनुमान निघत आहे. पुणे शहरातील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासाठी मागील आठवड्यात भर मध्यरात्री गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशनमधील पथकांनी विशेष मोहिम राबविली. या व...