Wednesday, April 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शासन यंत्रणा

जिम, ब्युटी सलूनच्या बाबतीत निर्बंधांचे सुधारित आदेश

जिम, ब्युटी सलूनच्या बाबतीत निर्बंधांचे सुधारित आदेश

शासन यंत्रणा
मुंबई/दि/शनिवार दि. ८ जानेवारी २०२२ रोजी राज्य शासनातर्फे सोमवारपासून लागू होणार्‍या निर्बंधांसंबंधी काढण्यात आलेल्या आदेशात अंशत: सुधारणा करण्यात आल्या आहेत. आदेशानुसार ब्युटी सलून आणि व्यायाम शाळांना ५० टक्के क्षमतेने, मास्कचा उपयोग करून व पूर्ण लसीकरण झालेल्या कर्मचार्‍यांमार्फत सेवा देता येईल कोणतेही नवीन आदेश येईपर्यंत हेच आदेश अमलात राहतील.या सुधारणा खालील प्रमाणे असतील :१- तक्त्यामध्ये उल्लेखित ‘प्रस्तावित निर्बंध’ याचा अर्थ लागू निर्बंध असा गृहीत धरण्यात येईल.२- ब्युटी सलूनचा समावेश केश कर्तनालय (किंवा हेअर कटिंग सलून) या गटात करण्यात येईल. त्यांनाही क्षमतेच्या टक्के उपस्थितीत सलून उघडे ठेवण्याची परवानगी असेल व सोबतच केश कर्तनालय/ हेअर कटिंग सलून करिता उल्लेखित निर्बंध लागू असतील. या आस्थापनांमध्ये फक्त अशीच सेवा देण्यास मुभा असेल की,ज्यामध्ये मास्क काढण्याची गरज नसते. या सेवे...
पुणे महापालिकेत विविध पदांची नोकरभरती, सर्व खात्यांकडून रिक्त पदांचा तपशील मागविला

पुणे महापालिकेत विविध पदांची नोकरभरती, सर्व खात्यांकडून रिक्त पदांचा तपशील मागविला

शासन यंत्रणा
पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महापालिकेत नोकर भरती करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या १४ डिसेंबर २०२१ च्या पत्रानुसार मान्यता देण्यात मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात पुणे महापालिकेतील नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने, सर्व खातेप्रमुखांना एक परिपत्रक पाठविले असून, त्यामध्ये त्यांच्या त्यांच्या विभागाकडील रिक्त पदांचा तपशील तातडीने कळविण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. या पत्रात नमूद केले आहे की, पुणे महापालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेने पदभरती करण्यासाठी संवर्गनिहाय बिंदू नामावली नोंदवह्या तपासून घेणे आवश्यक आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांना कुठल्या पदांची आवश्यकता आहे याची माहिती घेवून सरळसेवेने भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे.त्या अनुषंगाने पुणे महापाकिलेच्या वेगवेगळ्या विभागांनी महाराष्ट्र शासन यांनी मान्यता दिलेल्या आकृतीब...
गुलटेकडी मार्केटयार्डातील भांडवलदारांच्या बेकायदा बांधकामांना सत्तेचे संरक्षण

गुलटेकडी मार्केटयार्डातील भांडवलदारांच्या बेकायदा बांधकामांना सत्तेचे संरक्षण

शासन यंत्रणा
पुणे/दि/ पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या गुळ भुसार व वेगवेगळ्या विभागात मोठ्या संख्येने अनाधिकृत व बेकायदा बांधकामे मोठ्या संख्येने झाली आहेत. तरी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात इथली शासन यंत्रणा कुचकामी ठरत आहे. बाजार समिती व पुणे महापालिका यांच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या आणभाका अनेक पत्रातून दिसून येत असला तरी कारवाई करतांना दोन्ही यंत्रणा मागे हटत आहेत. ही पिछेमुड धोरण नेमकं कुणासाठी व कुणाच्या सागण्यावरून होत आहे. झोपडपट्टी, चाळी किंवा पुण्यातील पेठांमध्ये घराच्या पुढे ओठा बांधला तरी दोन चार दिवसात अतिक्रमण म्हणून ते पाडले जाते. मग मार्केटयार्डातील बेकायदा बांधकाम पाडायला आता शासन निर्णय काढण्याची आवश्यकता आहे काय असा सवाल नागरीक करीत आहेत. त्यामुळे बेघरांवर जशी कारवाई केली, तसे बिनदिक्कतपणे अतिक्रमण करणार्‍यांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे. ...
माहिती आयुक्तांच्या सुनावणीला पुणे महापालिकेतील अधिकार्‍यांची दांडी,

माहिती आयुक्तांच्या सुनावणीला पुणे महापालिकेतील अधिकार्‍यांची दांडी,

शासन यंत्रणा
अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांच्याकडून सज्जड दम, हजर राहून सहकार्य करा- अन्यथा कारवाईला समोरे जावे लागेल पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये कामचुकारीचा प्रादुर्भाव झाला आहे. कोणतंही काम आज कसं टाळावं याच उत्तम प्रशिक्षण पुणे महापालिकेतील कर्मचार्‍यांनी अवगत केलं आहे. त्यामुळेच पुणे महापालिकेतील लोकशाही दिन असो की, माहिती अधिकाराचे प्रथम अपिल असो, एवढच कशाला विभागीय आयुक्त कार्यालयातील लोकशाही दिनाला देखील दांडी मारली जात आहे. आता तर चक्क माहिती आयुक्तांकडील द्वितीय अपिलाला देखील दांडी मारली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी कार्यालयीन आदेश थोडक्यात फर्मान जारी करून, अधिकारी व कर्मचार्‍यांना सज्जड दम भरला आहे. काय म्हणाले अतिरिक्त आयुक्त -पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे ...
पुणे महापालिकेच्या बांधकाम, विद्युत व यांत्रिकीच्या अभियंत्यांनो, बदलीच्या जागी हजर व्हा, अन्यथा…..

पुणे महापालिकेच्या बांधकाम, विद्युत व यांत्रिकीच्या अभियंत्यांनो, बदलीच्या जागी हजर व्हा, अन्यथा…..

शासन यंत्रणा
पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या बांधकाम, विद्युत व यांत्रिकी शाखेतील उपअभियंता, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना बदली हा प्रकारच आवडत नाहीये. वर्षानुवर्षे एकाच खात्यात व एकाच विभाग-कार्यालयात राहण्याची सवय जडली आहे. नियुक्तीपासून रग्गड १०/१२ वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत असणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे. कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर, उपअभियंता पदापर्यंत संबंधित अभियंता महाशय, आहे त्याच कार्यालयात कार्यरत असतांना अनेकांनी अनेकांना पाहिले आहे. बदली आणि पदोन्नती झाली तरीही पगाराला बदलीच्या ठिकाणी व कामाला आहे त्याच कार्यालयात कार्यरत असल्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे आता प्रशासनाचे डोळे उघडले असून, बदलीच्या जागी रुजू न होणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या स्थापत्य अर्थात बांधकाम, विद्युत आणि यांत्रिकी संवर्गातील अभि...
पुणे महापालिकेतील भ्रष्टाचार – गैरव्यवहारांच्या अबु्रची लक्तरे वेशीवर टांगली

पुणे महापालिकेतील भ्रष्टाचार – गैरव्यवहारांच्या अबु्रची लक्तरे वेशीवर टांगली

शासन यंत्रणा
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महानगरपालिकेत भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांच्या साखळदंडांने पुणेकर नागरीकांना बांधुन टाकले आहे. पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रिय व उपायुक्त कार्यालयातही भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांची चलती वाढली आहे. बनावट बिल प्रकरणी आशय इंजिनिअरवर फौजदारी गुन्हा, धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयातील गैरव्यवहार प्रकरणी दोन अभियंते निलंबित तर उपअभियंत्याची खातेनिहाय चौकशी, कनिष्ठ अभियंता रामचंद्र शिंदे याच्याकडून माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर महिलांकरवी दहशत अशा घटनांची एक मालिकाच तयार झाली आहे. त्यातच बांधकामासहित विविध तांत्रिक खात्यात होत असलेल्या मनमानी बदल्या आणि अतिरिक्त पदभार कारभारामुळे पुणे महापालिका आयुक्तांच्या आदेशाखेरीज खातेप्रमुखांनी प्रशासकीय मान्यतेशिवाय खात्यामध्ये परस्पर बदल करू नयेत असे फर्मान जारी करावे लागले आहे. सगळीकडे भ्रष्टाचार आणि ...
पुणे महापालिकेच्या बांधकाम झोन ७ मधील सोमवार- रास्तापेठेतील अभियंत्यांची खणा-नारळाने ओटी भरावी …?

पुणे महापालिकेच्या बांधकाम झोन ७ मधील सोमवार- रास्तापेठेतील अभियंत्यांची खणा-नारळाने ओटी भरावी …?

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेचा डेव्हलपमेंट चार्जेस बुडवून, मिळकत कराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी ठेवून, सोमवार पेठ व रास्ता पेठेत वेगवान पद्धतीने अनाधिकृत बांधकामे सुरू आहेत. नॅशनल फोरमच्या सोमवारच्या अंकात याबाबतची बातमीही प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापी काल व आज जोरदार पाऊस आणि धुके असतांना देखील वेगवान पद्धतीने बांधकामे सुरू असल्याने, सोमवार रास्तापेठेतील अभियंत्यांची खणा नारळाने ओटी भरावी किंवा कसे याची पंचायत आता निर्माण झाली आहे. नुकसान शेवटी पुणे महापालिकेचे आणि पुणेकरांचेच आहे -अनाधिकृत बांधकामे केल्याने पुढील ५० वर्ष ही इमारत पडणार नाही किंवा पाडलीही जाणार नाही त्यामुळे …. १) अनाधिकृत बांधकामे केल्याने रस्तारूंदी पुढील ५० वर्षात होणार नाही. २) बांधकामांना परवानी घेतली नसल्याने, मिळकत कराची आकारणी जुन्या क्षेत्रफळानुसारच पुढील ५० वर्ष होत राहणार, नवीन मंजुरी खेरीज नव्य...
२०० कोटींचा भ्रष्टाचार- गैरव्यवहार करून, लपण्यासाठी पत्नीचा वापर करणार्‍या रामचंद्र शिंदेंचे पुनर्वसन बांधकाम झोन ३ च्या बाणेर- बालेवाडीत….

२०० कोटींचा भ्रष्टाचार- गैरव्यवहार करून, लपण्यासाठी पत्नीचा वापर करणार्‍या रामचंद्र शिंदेंचे पुनर्वसन बांधकाम झोन ३ च्या बाणेर- बालेवाडीत….

शासन यंत्रणा
१०० वर्षांच्या चिंचेचा जसा आंबटपणा कमी होत नाही, अगदी तस्साच प्रकार जयवंतराव आणि श्रींमतराव यांच्यातून जराही कमी झाल्याचे दिसत नाहीये… पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या बांधकाम विभाग क्र. ७ मध्ये सुमारे २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार- गैरव्यवहार करून, ते लपविण्यासाठी माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या अंगावर बांधकाम व्यावसायिकांच्या गुन्हेगारी टोळयांचा आधार घेणे, गुन्हेगारांना अंगावर पाठविणे, तृतीयपंथी इसमांसहित स्वतःच्या पत्नीचाही वापर करून, कार्यकर्त्यांवर जबरी दहशत बसविण्यात आलेल्या रामचंद्र शिंदे यांचे पुनर्वसन बांधकाम विभाग क्र. ३ च्या बाणेर बालेवाडीत करण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे समजले आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या कनिष्ठ अभियंता रामचंद्र शिंदेची बदली अकार्यकारी पदावर बीओटी करून अजून १० दिवसही झाले नाहीत तोपर्यंत त्यांच्या पुनर्वसनाचे काम सुरू केले असल्य...
अबबऽऽ कचराच कचरा… गणेश पेठ दुधभट्टी, सदा सर्वदा कचराच कचरा

अबबऽऽ कचराच कचरा… गणेश पेठ दुधभट्टी, सदा सर्वदा कचराच कचरा

शासन यंत्रणा
पुण्यातील मध्यवर्ती पुणे शहरातील गणेश पेठ येथील दुध भट्टी जवळील नाल्यावर कचरा, नाल्यात कचरा, पुलावर कचरा, सगळीकडे कचर्‍याचे ढिग दिसून येतात. पुणे महापालिकेने व्यापार्‍यांना विनंती करून कचरा टाकण्यास मनाई करणारा फलक लावला असून त्याकडे कुणाचेही लक्षच नसते. आता कचरा टाकणार्‍यांवर आणि कचरा होऊ देणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारल्या शिवाय कचर्‍याची समस्या सुटणार नाही. ...
पगार वाढीचे गाजर नको, विलीनीकरण करा, एसटी कर्मचारी भूमिकेवर ठाम

पगार वाढीचे गाजर नको, विलीनीकरण करा, एसटी कर्मचारी भूमिकेवर ठाम

शासन यंत्रणा
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर तोडगा म्हणून परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचार्‍यांच्या पगारवाढीची घोषणा केली आहे. परंतु आम्हाला पगार वाढ नको, अशी भूमिका संपकरी एसटी कर्मचार्‍यांनी घेतली आहे. विलीनीकरणचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमचा संप असाच सुरू राहील असे नंदुरबार आगारातील कर्मचार्‍यांनी सांगितले. पगार वाढ करून परिवहनमंत्री अनिल परब यांनी कर्मचार्‍यांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील काही संघटनांना हा निर्णय मान्य आहे परंतु राज्यातील सर्व कर्मचारी एकत्र असून हा संप कर्मचार्‍यांचा आहे, कुठल्या संघटनेचा नाही अशी भूमिका या कर्मचार्‍यांनी मांडली आहे. राज्यातील सर्व कर्मचारी एकत्र असून पगारवाढीचा निर्णय आम्हाला अमान्य असून जोपर्यंत विलिनीकरणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कर्मचार्‍याचा संप असाच सुरू राहिल असा निर्धार या कर्मचार्‍यांनी केला आहे. ...