Thursday, April 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सा.बा. पुणे विभागातील शारंगपानी

अस्तित्व आयडेंटी पत
याचा मागमूस राहिलाच नाही

उलट लोकोपकदत अशा अस्तित्वहीन आयडेंटीफाय न होणार्‍या अन् पत तर आख्याआवारातच राहिली नाही. अशाकंडके कुणी ढूंकुनही पाहत नाही की संगतीनं कुणी सुखदुखाःच्या चार ओळी सहानुभूतीने विचारपुसतही नाही.
आनंद गमाविलेलं हे टोळकं अंतर्गत संघर्ष, कुरघोड्या याच्यात एवढं गुंतलं गेललं आहे की, त्यांना ह्या सार्‍या घातक स्थितीतून बाहेर कोण काढणार… प्रश्‍न जरी आपल्या भोवती पिंगा घालित असेल तरी हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे. कारण ही जी स्थिती निर्माण केली आहे, त्या या स्थितीच स्थित्यंतर घडुन आणणार नाही. उलट अर्थी रोज नव नव्या युक्त्या शोधून या टोळक्यांच्या मेंदूत पाणी वहाव असंच त्यांला वाटते. कारण हे टोळकं शहाणसुरतं झालं तर त्यांचच अस्तित्व टांगणीला लागणार आहे. ज्याला उत्तर शोधायचे आहे त्याला हा पत्ता देता येईल.
१९४६ ची बिल्डींग सा. बां. पुणे विभाग.
१९४६ च्या बिल्डींग मधील भ्रष्ट पैशाला लचावलेली ही बिनडोक स्थिती कोण केली की, त्या योगे हे सातत्याने १० ते पावणेसहाच्या घड्याळाच्या काट्यावर टरविुन दिलेली कोते करण्याएैवजी एकमेकावर कुरघोडी खेळतात. संघर्ष करतात. या अंतर्गत संघर्षात या टोळक्यांची बाहेरच्यांवर नजर जाते. हे एक आश्‍चर्य मानावे लागेल.
भ्रष्टाचाराला इंचा इंचा लटकुन राहिलेली इथला कर्मचारी वर्ग कित्येक वर्षे श्रीमंत विभागाच्या गगनचुंबी माज असलेल्या कुशीत शिरून प्राक्तना पलिककडे जावून जगण्याच्या निगडीत असलेल्या रगिने विभागावरच श्रीमंतीवर हक्क सांगत बेछुट श्रीमंत झालेला आहे. विभागातला हा धुम्मस कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांन सुद्धा काटावर येत असतांना अनुभवास मिळणार आहे. यात वाद, भ्रष्टाचाराच्या रगित वाढलेला हा कर्मचारी वर्ग ठणकावुन सांगणार आहे, आमच्या जीवावरच तुम्ही जगताय. ह्या वाक्याचा व्यापक अर्थ तेलंग यांच्या कानातुन मेंदूत शिरेपर्यंत पाणी पुलावरून वाहून गेलेले असेल.
१९४६ च्या बिल्डींग मधील सा. बां. पुणे विभागाची अशी स्लमडॉग सारखी स्थिती नव्हतीच. पूर्वी बाबुराव चव्हाण, बोरगे, ए,डी. कुलकर्णी. जे.डी., कुलकर्णी. ते भरत बाविस्कर यांनी पुणे विभागाचं कार्यकारी अभियंता पद भोगतांना जेवढ तांत्रिक आणि आंतरीक आस्थापनेवर जरब ठेवली होती. ती त्यांची आजही सा. बां. खात्यात आवर्जून घेतली जातात. त्याची कारणेही तशीच त्यांनी आपले कान आणि निर्णय आबाधित ठेवले होते. अर्थात विभागातही एकदा एरा गबाळ्या त्यांच्या कानाला लोंबकाळुन मी साहेबाचं डोक चालवितो, म्हणणारा कुणीच धाडणी नव्हता.
पण उलट स्थिती श्री. निरंज तेलंग यांनी केली. कर्मचार्‍यांच्या अंतर्गत हेव्या दाव्यांच्या राजकारणात शिरण्याचा मोठा प्रयत्न केला. श्रीमंत विभागाच्या कुरणात बिनदिक्कत चालणार्‍या मेंढराच्या कळपात बिनडोक एडका शिरल्यागत श्री. तेलंग घुसले. ही मेंढर चरत होतीच, त्यात मार धडक गड गडप चा मंत्र तेलंग यांनी दिला.
मेंढरं आणखी सोकावली, मंग पुढ राजकारण शिजू लागलं. विभागामधील माहिती बाहेर जावू नये म्हणून दक्षता घेण्यास सुरूवात केली. विभागाकडे फिरकणार्‍या पत्रकार, कार्यकर्त्यांना विभागात येण्यास मज्जाव केला. मग तीन वर्षे सेवाकाळ होईपर्यंत बिनधास्त चरायचं. कर्मचार्‍यांचा वापर केअरफ्री सारखं करायचा, हे ठरवुनच असल्या सारखे श्री. तेलंग यांनी प्रारंभापासून घोकमपट्टी केल्यासारखं पाठ करून शासकीय वर्तन सुरू केले. (क्रमशः)