Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

लष्कर पोलीसांकडून 2 लाखांच्या 4 मोटारसायकल जप्त

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/
लष्कर पोलीस स्टेशन येथील चोरी गेलेली सफेद रंगाची ॲक्टीव्हा ही अज्ञात इसमाने शेंडगे टेलर, बाबाजान दर्गा समोर येथुन चोरी गेले बाबत फिर्यादीने तक्रार दिल्याने या गुन्हयातील अज्ञात आरोपीचा व वाहनाचा तपास करीत असतांना, वाहन चोरीच्या ठिकाणावरील 35 सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात आला दरम्यान गुप्त बातमीदारा मार्फत बातमीवरुन सराईत आरोपी पर्यंत लष्कर पोलीस पोहचले. यावेळी असिफ अकबर शेख , वय 30 वर्षे यास अटक केली आहे .
आरोपीकडे वाहन चोरीचा तपास करीत असतांना संबंधितांने एकुण चार दुचाकी वाहने चोरी केल्याचे आढळुन आले. पोलीसांनी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.


1 ) लष्कर पोलीस स्टेशन कडील गु.र.नं 86/2022 भा.द.वी कलम 37 9 मधील ( 1 ) सफेद रंगाची ॲक्टीव्हा गाडी क्रमांक एम.एच एल सी 778 अं.कि.रु 50,000 / -रु ( 2 ) सीस्का एल.इ.डी 10 लॅम्प 5.500 / – रु ( 3 ) एच आय के व्हीजन कंपनीचे 3 कॅमेरा 12,000 / – रु 2 ) लष्कर पोलीस स्टेशन कडील गु.र.नं 44/2022 भा.द.वी कलम 37 9 मधील ( 1 ) सफेद रंगाची ॲक्टीव्हा स्कुटर क्रमांक एम.एच 12 एन.डी 1141 अं.कि.रु .50,000 / – रु 3 ) भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील गु.र.नं 336 / 2022 भा.द.वी कलम 37 9 मधील 1 ) हिरो कंपनीची स्पिलेंडर , काळया रंगाची एम . एच 12 क्यु.एच 9 672 अं.कि.रु 40,000 / – 2 ) होंडा शाईन काळया रंगाची एम . एच 10 ए.यु 2112 अं.कि. रु 50,000 / असा एकुण 2,07,500 / – मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील गुन्ह्याचा तपास श्री . शितलकुमार गायकवाड , सहा पोलीस निरीक्षक , लष्कर पोलीस स्टेशन पुणे हे करत आहेत .


सदरची कामगीरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक कदम व पोनि ( गुन्हे ) प्रियंका शेळके यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक गायकवाड, पोहवा महेश कदम, पोहवा कैलास चव्हाण, पोहवा किसन भारमळ पोना समिर तांबोळी, पोना अमोल गायकवाड, पोना गणेश कोळी , पोना सचिन मांजरे, पोना रमेश चौधर यांनी केलेली आहे .