पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/
दिवाळी सणानिमीत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी, धिरज गुप्ता व पोलीस अमंलदार हे पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार अभिजीत जाधव व राहुल तांबे यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडुन तडीपार केलेला आरोपी अजिंक्य संतोष काळे, रा. स.नं. 25/2 गणेशनगर, आंबेगाव पठार, पुणे हा नवले पुलाखालील चौकाकडुन कात्रज दिशेने येणारे हायवे वरील चिंतामणी ज्ञानपीठकडे जाणा-या रोडवर थांबला असुन त्याचेकडे पिस्टल व जिवंत काडतुसे आहे.
त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी नवले पुला खालील चौकाकडुन कात्रज दिशेने येणारे हायवेवरील चिंतामणी ज्ञानपीठकडे जाणा-या रोडवर जावुन पाहणी केली असता, तेथे तडीपार आरोपी अजिंक्य संतोष काळे हा तिथे दिसून आला. भारती विद्यापीठ पोलीसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याचेकडे एक 35,000/- रुपये किंचे गावठी बनावटीचे पिस्टल व एक 200/- रुपये किंचे जिवंत काडतुस मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहे.
त्याच्या विरूध्द भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.690 / 2022, आर्म ॲक्ट कलम 3 (25), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37 ( 1 ) 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर आरोपीताचा अभिलेख तपासणी करता तो सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंवर 204 / 2022 भादंवि कलम 326 या गुन्हयामध्ये पाहीजे असल्याचे निष्पन्न झाले आहे
उल्लेखनीय कामगिरी भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विजय पुराणिक सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, अभिजीत जाघव, राहुल तांबे, नरेंद्र महांगरे, रविंद्र चिप्पा, विश्वनाथ घोणे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, निलेश चोरमले, अशिष गायकवाड व विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.