Friday, May 10 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बाळासाहेब आंबेडकरांचा अेबीपी माझाला अल्टीमेटम

‘ध’चा ‘मा’ करणारी न्यूज चैनल खोडसाळ आणि खोट्या बातम्या दाखवून राजकीय बदनामी करत आहेत असा स्पष्ट आरोप बहुजन वंचित आघाडीने केला आहे.

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पंधरा दिवसाचे अल्टिमेटम दिल्याची खोटी आणि खोडसाळ बातमी काल अेबीपी माझा न्युज चॅनलवर दाखवण्यात आली, तसेच त्यांच्या न्युज पोर्टलवर प्रकाशित करण्यात आली. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. जर कालची पत्रकार परिषद आपण नीट बघितली तर त्यात बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना ‘काँग्रेस – राष्ट्रवादी बरोबरची बोलणी 15 दिवसात क्लिअर करून घ्या आणि निवडणुकीच्या तयारीला लागा’ असा सल्ला दिलेला आहे, सूचना केलेली आहे. मात्र त्यात कुठेही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 15 दिवसांचे अल्टिमेटम देत असल्याचे म्हटलेले नाही.

 तरीसुद्धा अतिशय खोटी आणि खोडसाळ बातमी अेबीपी माझा चॅनेलवर दाखवण्यात आली. आम्ही अेबीपी माझा चॅनेलचा त्याबद्दल निषेध करतो. अशा खोडसाळ आणि खोट्या बातम्या दाखवून वंचितांच्या राजकारणाचा नुकसान करण्याचं काम यापूर्वीही काही चॅनल ने केलेलं आहे. मात्र यापुढे वंचित बहुजन आघाडी असा खोडसाळ प्रकार सहन करणार नाही. कुणीही वंचित बहुजन आघाडी सोबत असा खोडसाळ प्रकार यापुढे करू नये, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी दिला आहे.