स्वारगेट पोलीसांचे क्रुर क्रौर्ये स्वारगेट पोलीसांच्या जबर मारहाणीत युवकाचा कोठडीत मृत्यू
पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यातील
कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मिलिंद गायकवाड यांच्या अन्यायकारक
बदलीने पुणे शहर पोलीस दल धास्तावले आहे. भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांनी खंडणी मागितल्या
प्रकरणी श्री. गायकवाड यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. श्री. गायकवाड यांच्या
धाडसी वर्तनामुळे पुणे शहरातील नागरीकांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली
होती. दरम्यान अन्यायकारक बदलीने पोलीस आणि नागरीक धास्तावलेले असतांनाच, परवा पुण्यातील
स्वारगेट पोलीस ठाण्याने क्रुर व पाशवी कृत्य करून, सर्वसामान्य पुणेकर नागरीक व पोलीस
दलास भयंकर धक्का दिला आहे. मोबाईल चोरीच्या संशयावरून एका युवकास मार्केटयार्ड येथुन उचलण्यात आले. त्यात स्वारगेट पोलीस ठाण्याच्या
कोठडीत जबरी मारहाण केल्यामुळे त...