व्यवहार्यता तफावता निधीऐवजी पुणे मेट्रोस शासनाकडून जमीन
मुंबई/दि/ पुणे शहरातील हिंजवडी
ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या हिश्शाच्या
व्यवहार्यता तफावत निधी (व्हीजीएफ ग्रँट) रोखीने देण्याऐवजी प्राधिकरणास राज्य शासनाच्या
पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतन, दुग्ध विकास व पोलीस विभाग यांच्याकडून जमिनीचे हस्तांतरण
करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात
आली.
पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण (पीएमआरडीए) मार्फत हिंजवडी ते शिवाजीनगर
दरम्यान राबविण्यात येणार्या पुणे मेट्रो ३ या
प्रकल्पाची एकूण किंमत ८,३१२ कोटी रुपये आहे. निकडीचा सार्वजनिक प्रकल्प व महत्वाकांक्षी
नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या व्यवहार्यता तफावत
निधीपोटी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास ८१२ कोटी रुपये रक्कम राज्य शासनाने
देणे अपेक्षित आहे. मात्र थेट रक्कम देण्याऐवजी...