Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

पुरग्रस्तांना तुम्ही येथे मदत करू शकता

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/        तुम्हाला पुरग्रस्तांना मदत करायची आहे. मात्र, ती कोठे करावी हे माहिती नसेल तर पुण्याच्या विभागीय कार्यालयात विशेष मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. किंवा मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फतही मदत करता येऊ शकते.        पुण्याच्या विभागीय कार्यालयातील मदत केंद्रात ‘रेडी टू इट’ अन्न पदार्थ तसेच नवे कपडे, चादरी, ब्लॅकेट इत्यादी साहित्य तुम्ही दान करू शकता.        तर दानशुर व्यक्ती ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ बँक खात्यातही पैशाच्या स्वरूपात मदत करू शकता. त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी बँक खाते क्रमांक  १०९७२४३३७५१ आणि खऋडउ छज. डइखछ००००३०० बँच कोड  ००३००० अधिक माहितीसाठी, भारत वाघमारे ९८५०७९११११ किंवा सुरेखा माने ७७७५९०५३१५ यांना संपर्क करू शकता....
एस.सी, एसटी, ओबीसींनो आपली सत्ता मिळवा – बाळासाहेब आंबेडकर

एस.सी, एसटी, ओबीसींनो आपली सत्ता मिळवा – बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
ambedkar-1 नागपुर/दि/ प्रबुद्ध भारत/        आरक्षित जागांवरून निवडून गेलेले सर्व प्रतिनिधी हे गालाम आहेत. त्यांच्याकडून काही होणार नाही. आपल्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवायच्या असतील तर सत्ता आपल्या हातात असायला हवी. शासनात एक किंवा दोन माणसे पाठवुन काहीही होणार नाही. शासनाच्या धोरणात सहभागी व्हावे लागेल आणि त्यासाठी किमान ५० पेक्षा अधिक माणसे विधानसभेत पाठवा. एससी, एसटी, ओबीसी, व्हीजे एनटी सत्तेत बसले, तर त्यांना कुणाला न्याय मागण्याची गरज नाही. केवळ नियोजनाची आवश्यकता आहे, हे नियोजनच देशाचे संविधान वाचवू शकते. तेंव्हा आपली सत्ता मिळवा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब आबेडकर यांनी येथे व्यक्त केले.        विविध संघटनांच्या वतीने विवर्य सुरेश भट सभागृह येथे स्कॉलरशिप परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून...
पुणे महापालिकेपुढे कुणी टाकलाय शेणाचा सडा सरोदे म्हणताय, मग इथच येवून पडा

पुणे महापालिकेपुढे कुणी टाकलाय शेणाचा सडा सरोदे म्हणताय, मग इथच येवून पडा

सर्व साधारण
ma na pa pune कारण मीच ओढतोय जुन्या पुण्याचा गाडा बांधकाम कसलं हे तर बादकाम पुणे/दि/ प्रतिनिधी/        जुन्या डीपीची मुदत २००७ रोजी संपल्यानंतर, पुणे महानगरपालिकेने जुन्या पेठांच्या पुण्याला अस्पृश्यतेची वागणूक दिली. २००७ ते २०१७ पर्यंत एकाही बांधकामाला मंजुरी दयायचीच नाही, अस्सं धोरण ठरवुन, जुनं पुणे शहर ठप्प केलं. परंतु दुसर्‍या बाजूने पुणे शहराच्या चारही दिशांना उपनगरात दण्णादण बांधकामे होत गेली...उपनगरेच शहरासारखी दिसू लागली. थोडक्यात जिल्हापेक्षा तालुकाच मोठा झाला. पुण्यातील पेठा सोडून बाहेर कुठेही जा... जिकडं तिकडं झगमगाट... पण पुणे शहर म्हणजे जुने वाडे, अरूंद रस्ते, गल्ली आणि बोळा. इथपर्यंतच पुणं शहर सिमित राहिलं आहे. जानेवारी २०१७ रोजी पुणे शहराचं भाग्य उजळलं. नव्या बांधकामांना मंजुरी देण्याचं सुरू झालं. परंतु ज्यांनी नवीन प्रारूप विकास आराखड्याला अधिन राहून बांधकाम...
विजाभज, इमाव, विमाप्र घटकांसाठी महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना

विजाभज, इमाव, विमाप्र घटकांसाठी महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना

शासन यंत्रणा
मुंबई/(मंत्रिमंडळ निर्णय)/        विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्थापन करण्यास  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाज्योती संस्थेच्या माध्यमातून या समाजसमुहांच्या विकासासाठी आता अधिक नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत.        पुणे येथे स्थापन करण्यात येणारी महाज्योती ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असणार आहे. तिची नोंदणी कंपनी कायद्यानुसार करण्यात येणार आहे. महाज्योती संस्थेची स्थापन करण्यासह तिच्या कामकाजासंदर्भात वेळोवेळी आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या मंत्र...
गुन्हे शाखेकडून पुण्यातील कुंटणखान्यावर रट्टा,१४ जणींची सुटका

गुन्हे शाखेकडून पुण्यातील कुंटणखान्यावर रट्टा,१४ जणींची सुटका

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/        पुण्यातील रेड लाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या बुधवार पेठेतील कुंटणखान्यावर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रट्टा मारून वेश्या व्यवसायाकरीता प्रवृत्त केल्याप्रकरणी कुंटनखाना मालकींनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय नेपाळ, बांग्लादेशातील तरूणींसह चौदा जणाना ताब्यात घेण्यात आले आहे.        बुधवार पेठेतील कुंटणखाना चालक काजल गोरे तमांग वय ५२ रा. डायमंड बिल्डींग, बुधवार पेठ पुणे मुळ रा. नेपाळ हीला अटक करण्यात आली आहे. पोलीसांकडून या प्रकरणांत ४/५ कुंटणखाना चालक महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        बुधवार पेठेतील ताजमहाल बिल्डींग, डायमंड बिल्डींग या इमारतीमधील कंटणखान्यात परराज्यातील तरूणींना डांबून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल...
न्यायालयाच्या आदेशानुसार तोलाई आकारणी बंदीचा निर्णय कायम ठेवावा – मर्चंट चेंबर

न्यायालयाच्या आदेशानुसार तोलाई आकारणी बंदीचा निर्णय कायम ठेवावा – मर्चंट चेंबर

शासन यंत्रणा
market pune पुणे/दि/ रिजवान शेख/        राज्य शासनाने न्यायालयाच्या ओदशानुसार, राज्यातील सर्व बाजार समित्यांना इलेक्ट्रॉनिक काटे बसविलेल्या ठिकाणी शेतमालाचे वजन होते, तिथे कोणतीही तोलाई आकारू नये व शेतकर्‍यांच्या पट्टीतून तोलाईची रक्कम कपात करू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशामध्ये कोणताही बदल करू नये तसेच तोलाई आकारणी बंदीचा निर्णय कायम ठेवावा असा ठराव पुण्यात झालेल्या व्यापार्‍यांच्या राज्यव्यापी परिषदेत करण्यात आला असल्याची माहिती दि पुना मर्चंट चेंबर व फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ टे्रडर्स यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली.        तसेच या राज्यव्यापी बैठकीत ठराव पास केले आहेत, त्यानुसार मार्केटयार्डातील अडचणी तसेच उत्तर प्रदेशाप्रमाणे सेस रद्द करावा, ई- नाम कायद्याती तरतुदी अंमलबजावणी करू नये, बाजार आवारातील वस्तू नियमन मुक्ती कराव...
भ्रष्टाचाराचा गुन्हाच दाखल नाही तर अहवाल कसले सादर करताय?

भ्रष्टाचाराचा गुन्हाच दाखल नाही तर अहवाल कसले सादर करताय?

शासन यंत्रणा
मुंबई/दि/ महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या पुढारी आणि अधिकार्‍यांवर गुन्हेच दाखल होत नाहीत तर तुम्ही अहवाल कसले सादर करणार, असा सवाल खंडपीठाने सरकारला केला. एवढेच नव्हे तर अहवाल सादर करण्यासाठी नेमकी कोणाची आणि कसली चौकशी केली याबाबत सरकारला खडे बोलही सुनावले.        १९६१ साली स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेत संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी सूत गिरणी आणि साखर कारखान्यासाठी कोट्यवधी रुपयांची कर्जे दिली. या संचालक मंडळामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण अशा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश आहे. या तत्कालीन संचालकांनी आपल्या काळात सूत गिरण्या आणि साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयां...
वंचित बहुजन आघाडीकडे… विधानसभेच्या २८८ जागांसाठी ११०० जणांचा उमेदवारी अर्ज दाखल

वंचित बहुजन आघाडीकडे… विधानसभेच्या २८८ जागांसाठी ११०० जणांचा उमेदवारी अर्ज दाखल

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/        ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीकडे राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी ११०० जणांनी उमेदवारी  मागितली आहे. शिवाय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा सेना या पक्षातील आजी माजी आमदार, महापालिका-जिल्हा परिषद सदस्य तसेच काही नाराज नेत्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. दरम्यान  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समिर कुलकर्णी यांना वंचित कडून         उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज केल्याची माहिती वंचित आघाडीचे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य ऍड. अण्णाराव पाटील यांनी दिली आहे.        वंचित बहुजन आघाडीकडून राज्यातील २८८ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील मुलाखती झाल्या आहेत. शनिवार व रविवार पुण्यासह सातार्‍यातील इच्छुका...
पुणे महापालिका आयुक्त कार्यालय झिंगझिंग झिंगाट, बांधकाम खात्ते- चिंगचिंग सुस्साटऽऽऽ

पुणे महापालिका आयुक्त कार्यालय झिंगझिंग झिंगाट, बांधकाम खात्ते- चिंगचिंग सुस्साटऽऽऽ

सर्व साधारण
pune pmc susat पुणे महापालिका मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी, कार्यालये बिल्डरांना फुकटात आंदण - आरक्षणाच्या जमिनीवर बिनधास्त बांधकामे. भर पावसाळ्यात पुणे ठप्प- अधिकारी गप्प्पऽऽ पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/        शासनातील अधिकारी आणि कर्मचारी क्रिम पोस्ट आणि क्रिम एरियासाठी जीवाचा आकांत करून धावा धाव, करून ते पदरात पाडून घेत असतांना सर्वांनीच पाहीले आहे. गृह मंत्रालयाकडील सर्वच विभाग, त्यातल्या त्यात पोलीस खात्यात चढाओढ सुरू असल्याचे ज्ञात आहे. अंमलदार ते पो.उप.निरी.पर्यंत आणि पोलीस ठाण्यासहित गुन्हे शाखेत साठमारी सुरू असते. त्यानंतर महसुल, कृषी, सहकार ही ओघाने येणारी साठमारी- तुंबळ हाणामारीची खाती. परंतु पुणे महापालिकेतही क्रिम पोस्ट आणि क्रिम एरियासाठी एवढी मोठ्ठी रस्सीखेच असेल अस्सं कधी वाटलच नाही. कधी दिसूनही आले नाही. परंतु एक सारख्या विभागात( जुना आणि नवा, खु...
पोलीस खात्याची बदनामी करणार्यांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करणार – पोलीस महासंचालक

पोलीस खात्याची बदनामी करणार्यांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करणार – पोलीस महासंचालक

पोलीस क्राइम
पोलीस दलात अंतर्गत हेवेदावे वाढले. पोस्टींग, सेवाज्येष्ठता प्रकरणी अंतर्गत वाद वाढत असले तरी, याद राखा, प्रसार माध्यमांकडे गेलात तर शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल. नियमानुसार सक्त ताकीद, वेतनवाढ रोखणे, निलंबन किंवा बडतर्फही केले जाईल. मुंबई/दि/ प्रतिनिधी/      पोलीस दलात मोठ्या प्रमाणात हेवेदावे वाढले आहेत. विेशेषतः पोस्टिंग, सेवाज्येष्ठता, पदोन्नती व अन्य कारणामुळे अंतर्गत वाद विकोपाला जात आहेत. या प्रकरणी वरीष्ठ कार्यालयाकडे दाद न मागता, विरोधी गटाच्या बदनामी करीता, पोलीस थेटच प्रसार माध्यमांकडे जात आहेत. असले प्रकार खात्यात खपवुन घेतले जाणार नाहीत. खात्याची बदनामी करणार्‍यांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय पोलीस महासंचालक कार्यालयाने नुकताच घेतला आहे.      याबाबतची माहिती अशी की, पोलीस अधिकारी- अंमलदार यांचे आपआसातील हेवेदावे प्रार माध्यंमाप...