पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकार्याने तोतया डॉक्टरला कात्रजमध्ये पकडले
Bharti police
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात बोगस वैद्यकीय डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे, कालपर्यंत कंपाऊंडर म्हणून काम करणारे आज पुण्याच्या दुसर्या भागात डॉक्टर म्हणून दवाखाने थाटून रूग्णांवर उपचार करीत असल्याची बातमी नॅशनल फोरम मधुन प्रसारित करण्यात आली होती व आजही याबाबतचे वृत्त प्रसारित करण्यात येत आहे. दरम्यान पुणे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने बोगस डॉक्टरांविरूद्ध मोहिम उघडली असून, बोगस व तोतया डॉक्टरांना शोधून त्यांच्याविरूद्ध कारवाई सत्र सुरू केले आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील श्री कॉम्प्लेक्स, संतोष नगर गल्ली नं. २, पीएमपीएमएल बस स्टॉप मागे जैन मंदिर रात्र कात्र येथे तोडकर संजिवनी निसर्गोपचार केंद्र या नावाने एक इसम डॉक्टर असल्याचे भासवुन रूग्णांवर उपचार करीत असल्याचे आढळुन आले. पुणे महापालिकेचे वैदयकीय अधिकारी डॉ. दिपक पखाले यांनी संबंधित बोगस डॉक्टरकडे वैद्य...