
KoregaonBhima चौकशी आयोगाचे परमबीर सिंह आणि रश्मी शुक्लांना समन्स
मुंबई/दि/कोरेगाव- भीमा दंगलीच्या तपासासाठी नेमलेल्या न्या.पटेल आयोगाने आता परागंदा असलेले पोलिस अधिकारी परमबीर सिंह आणि उठझऋ च्या अतिरीक्त महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या चौकशीसाठी समन्स दिले आहे. एल्गार परीषद पार पडलेल्या विश्रामबाग पोलिस स्टेशनकडून आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपासासाठी कागदपत्रं मागवण्याचे आदेश कालच आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. आज झालेल्या आयोगाच्या सुनावणीमधे तत्कालीन महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमबीर सिंह आणि पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांना ८ नोव्हेंबर रोजी तपासासाठी आणि कागदपत्रं जमा करण्याचे आदेश आयोगानं दिले आहे.
१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव- भीमा परीसरात उसळलेल्या दंगलीमधे एक जणाचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले होते. दंगलीनंतर राज्यात अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तत्कालीन सरकारने निवृत्त न्यायमुर्ती पटेल...