
धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी दोन अभियंते निलंबित, लाखनीची खातेनिहाय चौकशी
उपायुक्त जयंत भोसेकरांकडून होत होती पाठराखण, अखेर गिते आणि परदेशी निलंबित….,रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्रच्या पाठपुराव्याला यश
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण /धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाकडील निविदा कामात झालेल्या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांनी केलेल्या तक्रार अर्जांवर चौकशी होवून, अखेर शाखा अभियंता अजय परदेशी आणि कनिष्ठ अभियंता गणेश गिते यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच उपअभियंता कन्हैयालाल लाखनी यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिले आहेत.
धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाने माहे २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांच्या कालावधीत निविदा कामांमध्ये कमालिचा भ्रष्टाचार करण्यात आलेला होता. कामे न करताच बिलांची वसूली करण्यात येत होती. एका ठिकाणी कामाचे क्षेत्र दाखवुन दुसर्या ठिकाणी कामे ...