पुणे महापालिकेतील भ्रष्टाचार – गैरव्यवहारांच्या अबु्रची लक्तरे वेशीवर टांगली
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महानगरपालिकेत भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांच्या साखळदंडांने पुणेकर नागरीकांना बांधुन टाकले आहे. पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रिय व उपायुक्त कार्यालयातही भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांची चलती वाढली आहे. बनावट बिल प्रकरणी आशय इंजिनिअरवर फौजदारी गुन्हा, धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयातील गैरव्यवहार प्रकरणी दोन अभियंते निलंबित तर उपअभियंत्याची खातेनिहाय चौकशी, कनिष्ठ अभियंता रामचंद्र शिंदे याच्याकडून माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर महिलांकरवी दहशत अशा घटनांची एक मालिकाच तयार झाली आहे. त्यातच बांधकामासहित विविध तांत्रिक खात्यात होत असलेल्या मनमानी बदल्या आणि अतिरिक्त पदभार कारभारामुळे पुणे महापालिका आयुक्तांच्या आदेशाखेरीज खातेप्रमुखांनी प्रशासकीय मान्यतेशिवाय खात्यामध्ये परस्पर बदल करू नयेत असे फर्मान जारी करावे लागले आहे. सगळीकडे भ्रष्टाचार आणि ...