Friday, April 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील ट्रीपल के -कल्याणी नगर, कोरेगाव पार्क कोंढवा , सगळीकडं हुक्का,जुगार, विदेशी दारू आणि परदेशी चलनाचा खुळखुळाट

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुणे शहरातील ट्रीपल के म्हणून कल्याणी नगर, कोरेगाव पार्क आणि कोंढवा हे हुक्का पार्लर, मसाज पार्लर, जुगार अड्डे, पोकर अड्डे, बेटींग अड्डे, देशी विदेशी दारूचे कोठार आणि परदेशी चलनांची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. देश विदेशातील नागरीकांचा येथे मोठा राबता असतो. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग देखील ट्रीपल के सोडून इतरत्र अग्रेसर असल्याचे दिसते. परंतु या ट्रीपल के वर कधीच कारवाई होत नसल्याने, यामागे मोठी राजकीय यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.

परवा ट्रीपल के पैकी असलेल्या कोंढव्यात सामाजिक सुरक्षा विभागाने रेड करून, ५८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची बातमी आली आहे. यामध्ये देशी १लाख ७ हजार १५० रुपयांच्या ३४ विदेशी दारूच्या बाटल्या, १३ पोकर टेबल, एक काऊंटर चिपचे बॉक्स, ३० पत्यांचे कॅटचे बॉक्स, व वेगवेगळे आकडे असलेले रूले असा एकुण १ लाख ४२ हजार रुपयांचे साहित्य, ४७ लाख ७६ हजार ५०० रुपयांचे राखे रक्कम त्यात ५५०० ऑस्टे्रलियन डॉलर व ६७०० यूएस डॉलर असा एुण ५८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 

पोलीसांनी जितेन जगदीप सिंग वय ४२ रा कोंढवा याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तथापी कोंढव्यात कमेलापासून ते एनआयबीएम पर्यंत आणि पुढे देखील अशाच प्रकारचे मोठे उद्योग सुरू असतात. दिवस रात्र हुक्क्याचा धुर बाहेर पडत असतो. अलिशान चार चाकी वाहनांची रात्रभर फेर्‍या सुरू असतात. यात गुजरात, मुंबई येथून येणार्‍यांची मोठी संख्या असल्याचे सांगितले जाते. 

पुण्यातील ट्रीपल के मध्ये अशाच प्रकारचे उद्योग सुरू असतात. पोलीसांना हे सगळं माहिती असण्याची शक्यता आहे. परंतु कारवाईच्या नावाने शिमगा केला जातो. हुक्का पार्लर, मसाज पार्लरबाबत अनेक नागरीकांनी तक्रारी केलेल्या आहेत. तसेच पोकर आणि पत्ता क्लब बाबतही शेकडोंनी तक्रारी आहेत. परंतु सामाजिक सुरक्षा विभाग या ट्रीपल के कडे अजिबात लक्ष देत नाहीत. त्यामुळेच आज हे ट्रीपल के जगाच्या नकाशावर उठून दिसत आहेत. सगळ्या प्रकारच्या अवैध धंदयाचे माहेरघर म्हणून या ट्रीपल के ची मोठी ओळख निर्माण झाली आहे. अशा करूयात की, पोलीस यंत्रणा अशा प्रकारच्या उद्योगांवर भविष्यात कारवाई करेल व अवैध कृती व अवैध धंदे बंद करतील.