
विधी विभागाच्या ऍड. निशा चव्हाण यांच्या चुकीच्या अभिप्रायांमुळे मेडीकल कॉलेजचे अदा केले कोट्यवधी रुपये
पुणे /दि/पुणे महापालिकेला संलग्न असलेले अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज ट्रस्ट नव्याने स्थापन करण्यात आले आहे. ह्याचे कामकाज पुणे महापालिकेच्या नायडू कंपाऊंड मध्ये सुरू आहे. तथापी पुणे महापालिकेने मेडीकल कॉलेज सुरू करण्यात आले असले तरी कोविड १९ मुळे विद्यार्थीच नाहीत. विना विद्यार्थी मेडिकल कॉलेज मध्ये डॉक्टर प्राध्यापकांची भरती करून सुमारे ५ कोटी रुपयांचे वेतन अदा करून पुणे महापालिकेची फसवणूक करण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेज साठी सहा महिन्याच्या मुदतीवर प्राध्यापक असलेले डॉक्टर घेतलेले आहे. कोविड १९ मुळे मेडिकल कॉलेजमध्ये विदयार्थी नसल्यामुळे त्यांना कमला नेहरू हॉस्पीटल मध्ये काम देण्यात आले. कमला नेहरू हॉस्पीटल मध्ये ते ओपीडी मध्ये काम करीत असल्याचे सांगण्यात आले तथापी त्या ठिकाणी संबधित प्राध्यापक असलेले डॉक्टर आढळुन आले नसल्याच्या तक्रारी माहित...