
लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीच्या नावे पुणे महापालिकेतही लाखोंची खंडणी वसुली,
अन्यायग्रस्त महिलांना देखील न्याय मिळेना,
पुणे/दि/ प्रतिनिध/पुणे महानगरपालिकेत महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळापासून संरक्षण मिळणेसाठी राज्य शासनाच्या सुचनेनुसार विविध महिला समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. तथापी ज्या महिला कर्मचाऱ्यांवर खरोखर शारिरीक मानसिक अत्याचार होत आहेत, त्यांच्या तक्रार अर्जांवर कोणतीही चौकशी केली जात नाही. परंतु काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी, त्यांच्याकडून खंडणी वसुल करण्यासाठी अमूक एका महिला कर्मचाऱ्यांने तुमच्या विरूद्ध लैंगिक छळाची तक्रार दिली आहे. तुमच्यावर चौकशी समिती बसणार आहे अशी धमकी देवून त्यांच्याकडून खंडणी वसुल करण्याचे शेकडो प्रकार पुणे महापालिकेत होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विशाखा समिती व अन्य महिला समित्यांकडे एकुण महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वच तक्रार अर्जांची चौकशी करून ज्या प्रकरणात महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे, त्यांना न्याय देण्यात यावा व ज्या महिलां...