
पुण्यातील विधानसभेच्या पोटनिवडणूकीत आघाडीचा धर्म राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी पाळला का….
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumपुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड मध्ये काल झालेल्या मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन्ही मतदारसंघात आघाडीचा धर्म पाळला आहे काय असा सवाल काही कार्यकर्ते व्यक्त करू लागले असल्याचे दिसून येत आहे. काल दुपारी साडेबारावाजेपर्यंत पिंपरी मतदारसंघातील भोसरी व चिंचवड येथे बहुतांश भाजपाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे काम करीत असल्याचे काही कार्यकर्त्यांनी निरीक्षण नोंदविले आहे. शिवाय पुण्यातील कसबा पेठेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपासाठी मतदान करण्यासाठी नागरीकांना पुढे पाठवित असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म प्रामाणिकपणे पाळला आहे काय अशी शंका निर्माण झाली आहे.
दोन्ही मतदारसंघात 40 ते 45 टक्के मतदान झाले आहे. सकाळी आम्ही कसब्यात असतांना दुपारी 12 वाजेपर्यंत काही मतदारसंघात 8 ते 12 टक्के मतदान झाले होते. भाजपा व काँग्...