Wednesday, April 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

वंचितच्या मसुदयावर 12 दिवस उलटले तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष दुभंगलेली काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (उबाठा) गप्प का…

वंचितच्या मसुदयावर 12 दिवस उलटले तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष दुभंगलेली काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (उबाठा) गप्प का…

राजकीय
प्रस्थापित पक्षांना वंचित समाजाची मते हवीत… मग त्यांचा सत्तेत सहभाग नको का…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/कायम सत्तेत राहिलेल्या पक्षांना, विरोधी पक्षात बसल्यानंतर, सत्तेत कधी पोहोचेल असे वाटू लागते. काँग्रस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेला चिटकलेले मुंगळे आहेत. सत्तेसाठी वाट्टेल ते करायला पुढे मागे पाहत नाहीत. हेच या दोन्ही पक्षांबाबत बोलले जाते. परंतु देशातचे संविधान वाचवायचे आहे, त्यासाठी वंचितने मागील दोन ते अडीज वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्व पक्षांना एका विचारपीठावर आणून, 39 कलमी समान कार्यक्रमावर बांधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु प्रस्थापित राजकीय पक्ष त्या 39 कलमी मुद्यांबाबत काहीच बोलत नाहीत. आज 12 दिवस उलटून गेले तरी काही बोलत नाहीत. देशातचे पहिले पंतप्रधन जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर व पुढे 1977 पर्यंत देशात काँग्रेसच्या भांडवलदारधार्जिण...
दुभंगलेली काँग्रेस- राष्ट्रवादी (शरद पवार गट)- शिवसेना (उबाठा) यांचे… आता वाजले की बारा… 12 दिवस उलटून गेले तरी वंचितच्या 39 मुद्यांवर मौन का बाळगुन आहेत…

दुभंगलेली काँग्रेस- राष्ट्रवादी (शरद पवार गट)- शिवसेना (उबाठा) यांचे… आता वाजले की बारा… 12 दिवस उलटून गेले तरी वंचितच्या 39 मुद्यांवर मौन का बाळगुन आहेत…

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/देशातचे पहिले पंतप्रधन जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर व पुढे 1977 पर्यंत देशात काँग्रेसच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणांमुळे सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आणि काँग्रेस हटावची चळवळ सुरू झाली. इंदिरा हटाव मोहिम सुरू झाली. पुढे कालांतराने आता भाजपाने देखील काँग्रेसचाच भांडवलदार धार्जिणा कार्यक्रम पुढे रेटल्याने, देशात मोदी हटाव, भाजपा हटाव म्हणून विरोधी पक्ष एक होत आहेत. कुणाला तरी विरोध म्हणून किंवा सत्तेसाठी विरोधी पक्ष एकवटत असला तरी यातून जनतेचे कोणतेही हीत होत नाही. त्यामुळेच किमान समान कार्यक्रमावर आधारित सर्व राजकीय पक्षांनी एक होवून देशातील निवडणूकांना सामोरे जावे यासाठी वंचित बहुजन आघाडीने मागील दोन ते अडीच वर्षांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक शहर व जिल्ह्यात 8 ते 10 लाखांच्या सभा पार पडत आहेत. दरम्यान वंचित व शिवसेना...
1977 ची पुनरावृत्ती होऊ दयायची नसेल, तर आता किमान समान कार्यक्रमावर राजकीय पक्षांनी एकत्र येणे लोकशाहीसाठी आवश्यक

1977 ची पुनरावृत्ती होऊ दयायची नसेल, तर आता किमान समान कार्यक्रमावर राजकीय पक्षांनी एकत्र येणे लोकशाहीसाठी आवश्यक

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/देशात मोदी हटाव, लोकशाही वाचवा म्हणून सर्व विरोधी पक्ष टाहो फोडत आहेत. लहान मोठ्या प्रसार माध्यमांतुन देखील मोदी हटाव ची घोषणा होत आहे. परंतु देशात हे पहिल्यांदाच होत नाहीये. तर यापूर्वी देखील इंदिरा गांधीच्या आणीबाणीनंतर, देशात असंतोष निर्माण झाला होता. त्यावेळी देखील इंदिरा हटाव, लोकशाही बचाव म्हणून सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहे. जनता पार्टीच्या माध्यमातून देशात सर्व विरोधी पक्ष एक झाले होते. परंतु किमान समान कार्यक्रम नसल्यामुळे व वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र आल्यामुळे त्यांच्यात एक वाक्यता राहिली नाही. त्यामुळे जनता पार्टीचे विघटन झाले. चौधरी चरणसिंग देशाचे काही काळ पंतप्रधान राहिले. परंतु पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या. पुढे राजीव गांधी व काँग्रेस विरूद्ध देशात वातावरण निर्माण झाल्यानंतर, पुन्हा देशात विरोधी पक्ष एक झाले व त्यांनी र...
पुणे पोलीसांच्या 206 वर्षाच्या काळात प्रथम, पुण्यातील कुख्यात गुन्हेगारी टोळ्या समोरासमोर,मारणे, बोडके, घायवळ ते आंदेकरसह सुमारे 15 टोळ्या आणि 50 उपटोळ्यांसह 267 गुन्हेगारांची पुणे पोलीस आयुक्तालयात परेड

पुणे पोलीसांच्या 206 वर्षाच्या काळात प्रथम, पुण्यातील कुख्यात गुन्हेगारी टोळ्या समोरासमोर,मारणे, बोडके, घायवळ ते आंदेकरसह सुमारे 15 टोळ्या आणि 50 उपटोळ्यांसह 267 गुन्हेगारांची पुणे पोलीस आयुक्तालयात परेड

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे पोलीस दलाची स्थापना ब्रिटीश राजवटीत 1818 रोजी झाली. तर महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 रोजी करण्यात आली. ब्रिटीश राजवटीपासून ते महाराष्ट्र राज्य निर्मितीपर्यंत आणि त्यापासून आज 2024 पर्यंत गुन्हेगारी टोळ्यांची आजपर्यंत कुणीच ओळखपरेड काढली नव्हती. पुण्याचे नव नियुक्त पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी, पुणे पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील सुमारे 15 मुख्य, 50 उपमुख्य टोळ्यांसह सुमारे 267 गुन्हेगारांची ओळख परेड पोलीस आयुक्तालयात काढण्यात आली आहे. पुण्याच्या इतिहासात प्रथमच गुन्हेगारांची अशी ओळख परेड काढण्यात आली आहे. तसेच गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे व्हिडीओ, रिल्स बनवल्यास काय कारवाई केली जाईल याचा अजेंड यावेळी वाचुन दाखविण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच पुण्यातील कुख्यात ...
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सत्ताधारी पक्षाला झुकते माप दिल्याने, शहराचे विद्रुपिकरण वाढले – अतिक्रमण निरीक्षक वसुलीवर मग कारवाई करणार कोण…

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सत्ताधारी पक्षाला झुकते माप दिल्याने, शहराचे विद्रुपिकरण वाढले – अतिक्रमण निरीक्षक वसुलीवर मग कारवाई करणार कोण…

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाने सत्ताधारी भाजपा-शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला झुकते माप दिले असल्याने पुणे शहरात फ्लेसबाजीला उधाण आले आहे. संपूर्ण शहराचे विद्रुपिकरण होत आहे. परंतु दुसऱ्या बाजुला विरोधी पक्ष किंवा सामाजिक संघटनांचे बॅनर मात्र रात्रोरात काढले जात आहेत, त्यांच्यावर दंडही आकारला जात आहे. यामुळे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त श्री. माधव जगताप हे सत्ताधारी पक्षाला झुकते माप देत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. दरम्यान सत्ताधारी पक्षांकडून दरदिवशी पुणे शहरात फ्लेक्सबाजी वाढत चालली असल्याने पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुणे महापालिका हद्दीत फ्लेक्स किंवा होर्डींग उभे करण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून शुल्क भरून घेवून परवानगी दिली जाते, मात्र, महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवा...
माढ्यातील घराणेशाही थांबवा, आता ओबीसी उमेदवार हवा- फोंडशिरस येथील मुस्लिम समाजाच्या बैठकीत मागणी

माढ्यातील घराणेशाही थांबवा, आता ओबीसी उमेदवार हवा- फोंडशिरस येथील मुस्लिम समाजाच्या बैठकीत मागणी

राजकीय
नॅशनल फोरम/सोलापुर (माळशिरस)/ दि/ प्रतिनिधी/माढा लोकसभा मतदारसंघात कायमस्वरूपी घराणेशाहीचे राज्य आहे. प्रस्थापित शक्तींच्या हातात कायमस्वरूपी सत्ता असल्याने त्यांना जनतेचा आणि त्यांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. त्यामुळे माढ्यातून कायमस्वरूपी घराणेशाही संपवुन आता लोकशाहीतील मूल्यांनुसार, जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी साझेदारी ह्या सुत्रानुसार माढ्यात आता ओबीसी नेतृत्वाला संधी देण्याच्या मागणीने जोर धरत आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. परंतु स्थानिक कार्यकर्ते व नागरीकांचा देखील मोठा असंतोष पहायला मिळत असून, माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी बांधवानी यावेळी, माढ्यातून जर ओबीसी उमेदवार मिळाला तरच मतदान करणार अन्यथा मतदान करणार नसल्याचीही भूमिका जाहीर केली आहे. यावेळी प्रस्थापित राजकीय पक्ष पारंपारीक घराणेश...
पुणे महापालिकेची सेवा प्रवेश नियमावली म्हणजे दुसरी मनुस्मृती, भेदभाव करणारी व मनमानी अटी व शर्ती मुळे बदनाम झालेली सेवाप्रवेश नियमावली रद्द करा…

पुणे महापालिकेची सेवा प्रवेश नियमावली म्हणजे दुसरी मनुस्मृती, भेदभाव करणारी व मनमानी अटी व शर्ती मुळे बदनाम झालेली सेवाप्रवेश नियमावली रद्द करा…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/मनुस्मृतीनुसार, ब्राह्मणांचा जन्म ब्रह्मदेवाच्या मुखातून झाला, क्षत्रियांचा जन्म भुजातून, वैश्यांचा जन्म जांघेतून तर शुद्रांचा जन्म पायातून झाल्याचे सनातन वैदिक धर्मशास्त्रात नमूद आहे. तसेच श्रीमद्‌‍ भागवत महापुराण व स्कंध-7 वा, अध्याय 11 वा यामध्ये त्याच्या नोंदी आढळुन येतात. वर्षानुवर्ष ही वर्णव्यवस्था व जाती व्यवस्था टिकुन होती. परंतु भारतीय संविधानाने ही वर्णव्यवस्था मोडून काढली आणि प्रत्येक नागरीकाला मुलभूत अधिकार बहाल केले. कुणीही श्रेष्ठ नाही व कुणीही कनिष्ठ नाही. सर्वांना समान अधिकार बहाल केले. परंतु पुणे महापालिकेतील सेवा प्रवेश नियमावली - 2014 चा अभ्यास केला असता, असे दिसून येते की, ही नियमावली नसुन मनुस्मृती असल्याचे दिसून येत आहे. वर्ग 1 ते 3 मधील पदांसाठी कुठेही समानता आढळुन येत नाही. प्रत्येकाचे शिक्षण, अनुभवाच्या अटी वेगवेगळ्या आहेत. काही ठ...
पर्वती व सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत हाफ मर्डरच्या घटना

पर्वती व सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत हाफ मर्डरच्या घटना

पोलीस क्राइम
सहकारनगर पोलीस- रागाने काय बघतो म्हणून पाठीमागुन कोयताच मारला…पर्वती पोलीस - पायी चालला, मग काय.. लोखंडी रॉड आणि लाकडी बांबुने मारझोड नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/तु माझ्याकडे रागाने का बघतोस, तु माझ्याकडे बघुन मान का वळवलीस अशा शुल्लक कारणांवरून देखील दोन गटांमध्ये राडा होण्याचे प्रमाण सध्या पुणे शहरात घडत आहेत. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील संभाजीनगर, धनकवडी येथे रागाने बघत असल्याने जाब विचारल्याने शाब्दीक चकमक झाली अन्‌‍ त्याचे पर्यवासन हाणामारीत झाले. ते इतके की कोयते काढण्यात आले. पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील जनता वसाहत पर्वती येथे मित्राच्या भावाला मारहाण होत असल्याने त्यात मध्यस्थी केल्याने टोळक्याने लाकडी स्टम्प व लोखंडी रॉडने हाणमार केल्याच्या घटना घडल्या आहेत. गुन्ह्याची हकीकत खालील प्रमाणे- सहकारनगर पोलीस स्टेशन -सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमान मंदिराजवळ संभाज...
पुण्यात मोबाईल चोराची हेराफेरीः उच्चशिक्षित चोराकडून 17 मोबाईलची चोरी, चोरीचे मोबाईल विकण्यासाठी नामांकित कंपनीच्या बीलांची हेराफेरी…

पुण्यात मोबाईल चोराची हेराफेरीः उच्चशिक्षित चोराकडून 17 मोबाईलची चोरी, चोरीचे मोबाईल विकण्यासाठी नामांकित कंपनीच्या बीलांची हेराफेरी…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यासारख्या उच्च शिक्षितांच्या शहरात ऑनलाईन सायबर क्राईम अफाट वाढलेले आहे. परंतु छापिल बिलांमध्ये देखील हेराफेरी करता येते हे देखील पुण्यातील लबाड चोरांनी करून दाखविले आहे. परंतु कानुन के हाथ बहोत लंबे होते है हे मात्र पुण्यातील चोर कदाचित विसरले असतीलही… परंतु कानुन के हाथ बहोत लंबे होते है, हा प्रत्यय शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधील चोरीच्या प्रकरणांने समोर आला आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील, शिवाजीनगर जुना तोफखाना भागात फिर्यादी यांचे स्वतःचे फर्निचरचे दुकानात दिनांक 04/01/2024 कामात व्यस्त असताना त्यांचा काउंटरवर ठेवलेला सॅमसंग कंपनीचा असलेला मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे तक्रारी वरुन शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि क्र.20/2024 भादवि क. 380 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. शिवाजीनगर पोलीस स्टेशन च...
अनाधिकृत बांधकामावर कारवाई करतांना पुणे महापालिका अभियंत्याला शिवीगाळ, रस्त्यात वाहने आडवी लावली…

अनाधिकृत बांधकामावर कारवाई करतांना पुणे महापालिका अभियंत्याला शिवीगाळ, रस्त्यात वाहने आडवी लावली…

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेतील शाखा अभियंता श्री. दत्तात्रय जगताप व त्यांचे सहकारी हे अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच रस्त्यात गाड्या आडव्या लावुन कारवाई करण्यापासून त्यांना परावृत्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधितांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, पुणे महापालिकेतील शाखा अभियंता व त्यांचे सहकारी हे अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करणेसाठी अहिरेगाव येथे गेले होते. तथापी अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करू नये म्हणून विठ्ठल वांजळे, एस. व्ही. वांजळे, कैलास वांजळे, अविनाश निवृत्ती मोहोळ, ओंकार झारी, रोहन वांजळे, चार महिला आणि इतरांना त्यांचे पथकाला विरोध केला. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून अंगावर धावुन गेले. याबाबत...