Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

हत्यारबंद पोलीसांखेरीज सामाजिक सुरक्षा विभागाने फरासखान्यासहित कोणत्याही हद्दीत कारवाईस जाऊ नये

ढमढेरे गल्लीला पुढे करून पोलीस व गुन्हेगारांकडून हल्ल्याची शक्यता
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
राज्यात सध्या सत्तेच्या खेळाचे प्रयोग सुरू आहेत. कै. अरूणसर नाईकांचा सिंहासन पार्ट – 2 मुंबईतून रिलिज झाला असून, सुरज, गुवाहटी वरून त्याचे प्रसारण सुरू आहे. मुंबईतच निळू फुलें समर्पित सामना – 2 चे प्रयोग खेळले जातही असतांनाच पुणे शहरात मात्र प्रशासकीय कामकाज सुरूळीत सुरू आहे. पुणे शहर पोलीस दलाने शहरातील अवैध सावकारी, बेकायदा अवैध धंदयाविरूद्ध आघाडी उघडलेली आहे. पुणे शहर पोलीसांनी अब तक 85 जणांना मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. 30 पोलीस स्टेशन हद्दीतील शेकडो गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तर सामाजिक सुरक्षा विभागाने अवैध वेश्याव्यवसाय, अवैध जुगारअड्डे, क्लब, अंमली पदार्थ, खाजगी सावकारी यांच्याविरूद्ध तीव्र कारवाई सुरू केली असतांनाच, स्थानिक पोलीसांच्या असहकाराच्या भुमिकेमुळे सामाजिक सुरक्षा विभागावरच हल्लयाचे कटकारस्थान रचले गेले असल्याचे समोर आले आहे. हल्लयाचे केंद्र फराखाना पोलीस स्टेशन असल्याचे दिसून येत आहे.


कोरोना महामारी नंतर बेरोजगार युवकांचे तांडेच्या तांडे नोकरीच्या मागे लागता – लागता आता भाई बनण्याच्या मागे लागला असल्याचे पुण्यातील काही प्रकरणांवरून दिसून आले आहे. खाजगी सावकार देखील भविष्यातील भाईचा शोध घेत असून, मोटारसायकल आणि हातात देशी कट्टा, पिस्तुल देवून, खाजगी सावकारीची वसुलीच्या कामी जुंपले आहेत. शंभरावर मोक्का आणि शेकडोपार तडीपार केले तरी गुन्हेगारांची संख्या कमी होत नाहीये. पुणे शहरात जुगार अड्ड्यांचे पेव फुटले आहे. महिला, मुलींची तस्करी, बालगुन्हेगारी, अंमली पदार्थांची प्रचंड रेलचेल सुरू आहे. या सर्व धंदयामध्ये बालकामगारांना ओढले आहे. 15 ते 25 वयोगटातील तरूणांच्या हाती मटक्याच्या चिठ्ठया आणि जुगार क्बलचे पत्ते हाती देण्यात आले आहेत.
या सर्व पार्श्वभूमिवर पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने अवैध धंदयाविरूद्ध तीव्र कारवाई सुरू केल्याने, आता सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकावर हल्ला करण्याचे नियोजन असल्याचे एका स्टींग ऑपरेशनमध्ये आढळुन आले आहे. पोलीसांवर हल्लयाचा कट फरासखाना पोलीस स्टेशन मधील ढमढेरे गल्लीच असल्याचेही दिसून आले आहे.
स्थानिक पोलीस- जुगार अड्डे मालकांपुढे शरणागत –
चमडा बाजार माफीयासोबत पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियमित उठबस असेल, पोलीसांना मदयपान करण्यासाठी फाईव्ह आणि सेव्हन स्टार मध्ये दैनंदिन राबता असेल, पोलीस आयुक्त कार्यालयातील सपोआ,उपआयुक्त अति. आयु- गुन्हे शाखेतील कर्मचारी वसुलीसाठी धंदेवाल्यांकडे येत असतील, पोलीस स्टेशनमधील वसुलदार जुगारअड्डे, चमडाबाजार, अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या मिनटा मिनटाला संपर्कात असतील तर सामाजिक सुरक्षा विभागातील एकटे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक आणि त्यांचे कार्यालय कुठे कुठे लक्ष ठेवणार हा अनुत्तरी प्रश्न आहे. अवैध धंद्यावर कारवाई केल्याच्या दुसऱ्या तासाला जुगार अड्डे, चमडा बाजार, मादक द्रव्य विकणारे उजळ माथ्याने पुनः फिरत असतील तर दाद नेमकी कुठे मागायची हा गहन प्रश्न आज निर्माण झाला आहे.
गुन्हेगारांवर मोक्का सारख्या कारवाया केल्याचे ठासून सांगितले जात असतांना, दुसरीकडे मात्र सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईच्या बातम्या मात्र प्रेस रूम मधुन मिडीयात येत नाहीत. हे वास्तव आहे पुणे शहर पोलीस दलाचे…..सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने मागील पाच आठवड्यात कारवाया सुरू असतांना, त्या बातमीचा मागोवा घेत बातमी नॅशनल फोरम मध्ये प्रसारित होत आहे. परंतु कारवाई मागील वास्तव आणि त्याचे विश्लेषणही पुढे आणणे आमचे काम आहे. अक्षरशः सर्वच केडरमधील/संवर्गातील पोलीस – गुन्हेगार, जुगार अड्डे आणि स्थानिक पोलीसांच्या वसुलदारांपुढे शरणागत झाले आहेत एवढाच निष्कर्ष निघु शकतो, दुसरे काहीच नाही.
गुन्हे शाखेचे राजेश पुराणिक यांच्याविरूद्ध गुन्हेगार-स्थानिक पोलीसांची मोहिम –
राज्यात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शिवसेना आणि सरकारचे अस्तित्व या विषयावर चर्चा होत आहेत. मिडीयासह गल्ली बोळात – सरकार टिकणार की जाणार यावर चर्चेचे फड रंगत आहेत. मग पुढचा मुख्यमंत्री कोण यावर देखील चर्चा रंगत आहेत. राजकीय धुळवड सुरू असतांना, पुणे शहर पोलीस दलात मात्र वेगळीच धुळधाण सुरू आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या राजेश पुराणिक यांनी, अवैध धंदे व गुन्हेगारांची धुळधाण उडवून दिली आहे, त्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाई विरूद्ध पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील प्रेस रूम पासून ते पोलीस स्टेशन पर्यंत सर्वांनीच गुन्हे शाखेचे राजेश पुराणिक यांच्याविरूद्ध मोहिम उघडली असल्याचे दिसून आले आहे. पुणे शहरातील अवैध धंदयाविरूद्ध व गुन्हेगारांविरूद्ध कुठेही कारवाई केली तरी त्याची बातमी प्रेस रूम मधुन बाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे.
ज्या पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करण्यात आली आहे, ते पोलीस स्टेशन देखील गुन्हेगार आणि अवैध धंदेवाल्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे दिसून येत असून, कारवाई केल्याच्या दुसऱ्या दिवशीच अवैध धंदे सुरू होत आहेत. यात पोलीस परिमंडळ एक मधील फरासखाना, खडक, डेक्कन आणि समर्थ पोलीस स्टेशन हद्दीचा समावेश आहे. तर स्वारगेट, मार्केटयार्ड पासून कोरेगाव पार्क पर्यंत कारवाई केलेल्या हद्दीत सर्वत्र पुनः सर्वच प्रकारचे अवैध धंदे सुरू झाले आहेत. थोडक्यात पोलीसच अवैध धंदेवाल्यांच्या म्हणजे गुन्हेगारांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहिले असल्याचे दिसून येत आहे. बातमीच्या विश्लेषणाची तपासणीच करायची तर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने ज्या ज्या अवैध व बेकायदा धंदयावर कारवाई करून गुन्हेगारांविरूद्ध कारवाई केली, तेथील आजची परिस्थिती पहा म्हणजे बातमीचा उद्देश लक्षात येईल.
सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने अवैध धंदयाविरूद्ध जेवढ्या कारवाया केल्या आहेत, जेवढे एफआयआर नोंदविले आहेत, त्यापैकी किती पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे पूर्णतः किंवा अशंतः बंद झाले आहेत, ते दाखवुन दया…. एकही बंद झाल्याचे दिसून येत नाहीये…..उलट मोठ्या संख्येने अवैध धंदे सुरू आहेत. यामागे स्थानिक पोलीसांचा सहभाग असल्याखेरीज हे शक्य नाही. एकटे अवैध धंदेवाले पोलीसांच्या आदेशाचा आणि कारवाईचा अव्हेर करून एवढी मुजोरी करूच शकत नाहीत. यामागे पोलीसांचा वरदहस्त आहे हे आता पुनः पुनः नमूद करण्याची आवश्यकता नाहीये.

सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने अवैध धंदयाविरूद्ध जेवढ्या कारवाया केल्या आहेत, जेवढे एफआयआर नोंदविले आहेत, त्यापैकी किती पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे पूर्णतः किंवा अशंतः बंद झाले आहेत, ते दाखवुन दया.... 
एकही बंद झाल्याचे दिसून येत नाहीये.....उलट मोठ्या संख्येने अवैध धंदे सुरू आहेत. यामागे स्थानिक पोलीसांचा सहभाग असल्याखेरीज हे शक्य नाही. अवैध धंदेवाले पोलीसांच्या आदेशाचा आणि कारवाईचा अव्हेर करून एवढी मुजोरी करूच शकत नाहीत. यामागे पोलीसांचा वरदहस्त आहे हे आता पुनः पुनः नमूद करण्याची आवश्यकता नाहीये.