Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सावरकर भवन मध्ये अघोरी पुजा- तांत्रिक मांत्रिक गंडे दोरेचा प्रकार –

pmc bandhakam 2022

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात अमुलाग्र सुधारणा,
बांधकाम झोन 7 मधील झुंडशाहीचे अतिक्रमण मोडून काढले,

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात सातत्याने ठिय्या मारून बसलेल्या दगडी नागोबांना सध्या बाहेरचा रस्ता दाखविण्यात येत असून, झुंडशाहीचे अतिक्रमण बऱ्यापैकी मोडून काढले जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अंगातभिनलेला रेसवटपणा मंगळवारच्या बैठकीतून काढुन टाकला जात आहे, त्यानंतर स्वतः अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्याच्या नेतृत्वात सातत्याने कार्यालयीन बैठका घेण्याचा पायंडा पाडला जात आहे. या माध्यमातून अधिकारी कर्मचारी सतर्क झाले आहेतच शिवाय नागरीक, माहिती अधिकार कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे नेते- पुढारी मंडळी, नगरसेवक आणि आमदार – नामदारांच्याही अर्जांवर तातडीने कार्यवाही केली जात आहे, टपाल आणि प्रकरणांच्या निर्गतीचे प्रमाण अधिक वाढले आहे. यावरून बांधकाम विभागातअमुलाग्र सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे.


पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात, बांधकाम व्यावसायिक आणि लायजेनिंग एजंटासह राजकीय नेत्यांचा प्रचंड दबाव ठेवून कामे करण्याचा पायंडा पडला होता. त्यातच काही अभियंता मंडळी देखील राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पुढे पुढे करीत असल्याचेपहायला मिळत होते. परंतु सध्या पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यापासून तर नगरसेवक- आमदारांच्या पुढे पुढे करणारे सध्या जागेवर बसूनच अभिवादन करीत आहेत. नियमबाह्यतेबाबत दक्षता ठेवूनच कार्यवाही केली जात असल्याचे दिसून येते.
बांधकाम झोन 7 मधील झुंडशाहीचे अतिक्रमण मोडून काढले –
पुण्यातील सर्व पेठांचा कारभार बांधकाम विभागाच्या झोन क्र. 7 या कार्यालयातून चालविला जातो. धोकादायक वाडे, अरूंद बोळ आणि गल्ल्या, निवासी आणि व्यापारी अतिक्रमण, अनाधिकृत बांधकामे ही सर्वात मोठी डोकेदुखी झोन क्र. 7 ची आहे. त्यातच

मागील 10 ते 15 वर्षांपासून पुण्यातील पेठांसाठी स्वतंत्र असा कारभारी नियुक्त केलेला नव्हता. सातत्याने प्रभारी पद देवून पुण्यातील पेठांची बोळवण केली जात होती. त्यामुळेच मागील तीन साडेतीन वर्षात एका नाच्याने पुरता हैदोस घातला होता.
बांधकाम व्यावसायिक, लायजेनिंग एजंटाची बहुतांश सगळीच नियमबाह्य कामे नोटांची बंडले मोजुन करण्यात आली आहेत. एखादा वाडा पाडून बांधकाम करावयाचे आहे, परंतु नियमानुसार मान्यता घेणे शक्य नाही. अशा ठिकाणी धोकादायक वाडा नोटीस पाहिजे

असल्यास 5 लाख रुपये, अनाधिकृत बांधकाम सुरू केले आहे, 25 लाख रुपये, अनाधिकृत बांधकामाला नोटीस न देण्यासाठी 25 लाख रुपये, प्रत्येक भेटीसाठी 5 लाख रुपये दर ठेवण्यात आलेला होता. एखादया बांधकाम प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, परंतु प्रत्यक्षात तीन मजल्याऐंवजी सात मजले केले , त्यासाठी 50 लाख रुपये, विना मंजुरीच बांधकाम नियमान्वित होणार नाही हे माहिती असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी एवढी मोठी रक्कम मोजली आहे.
सर्वात कहर म्हणजे ज्या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी जाणे-येणेसाठी रस्ताच नसतांना, त्या ठिकाणीही बांधकाम मंजुरी दिली आहे. एका छोट्या पायवाटेने किंवा एखादयाची भिंत तोडून त्यातून ये – जा करण्यासाठी रस्ता मिळेल या आशेवर बांधकाम मंजुरी दिली. मंगळवार पेठ 428 चे प्रकरण अतिच गाजले होते. थेटच 50 लाखाची मागणी. सीई ऑफिसमध्ये गदारोळ बभ्रा झाला. पण 25 लाखात काम करून दिले. ते रिवाईजही झाले. रिवाईजवर सुट्टीच्या अभियंत्याने मागाहून सही केली, त्याचे 15 लाख अलहिदा तो इथे नसतांनाही त्याला मिळाले.
सावरकर भवन मध्ये अघोरी पुजा- तांत्रिक मांत्रिक गंडे दोरेचा प्रकार –
बांधकाम झोन 7 मध्ये ब्रिटीश आणि मुघलांसारखी लुटालुट केल्यानंतर, ही माहिती बाहेर येवू नये, तसेच कुणीही माहिती अधिकारात माहिती मागु नये यासाठी अनेक उपायोजना तत्कालिन काळात केल्या होत्या. माहिती अधिकार अर्ज करणाऱ्या नागरीक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर महिला सोडणे, ॲट्रॉसिटीची धमकी देणे, कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांवर दबाव येण्यासाठी मोठ्याने आरडा ओरडा करणे, मी अमुक जातीचा आहे म्हणून कांगावा करणे, सीईंच्या मी जवळचा आहे अशीही फुशारकी मारणे, अशा प्रकारचे कृत्य मागील तीन साडेतीन वर्ष सुरू होते. त्यातच कहर म्हणजे, तांत्रिक मांत्रिकांना शासकीय कार्यालयात बोलाविणे, लिंबु उतारे, कोंबडे – डुक्कर कापण्याचे अघोरी कामही करण्यात आल्याचे अनेक प्रकार सावरकर भवन कार्यालयात झाले असून झोन 7 च्या कार्यालयात रात्रौ स्वतः नग्न होवून एक अघोरी पुजा देखील केली असल्याची माहिती समजली आहे. एवढा कहर आणि थयथयाट करण्यात आला होता.
झोन 7 च्या दलदलीत प्रविण शेंडे सारखे कमळ –
परंतु सध्या मागील दोन पाच महिन्यांपासून श्री. प्रविण शेंडे यांनी पूर्णपणे पदचा पदभार स्वीकारला आहे. बांधकाम झोन 7 मध्ये सगळीकडे दलदल पसरलेली असतांना श्री. शेंडे यांनी पदभार स्वीकारला आहे. ही दलदल आणि घाण साफ करणे सहज शक्य नसले तरी मागील 10 ते 15 वर्षांनंतर श्री. शेंडे सारख्या अधिकाऱ्याकडे झोन 7 चा कारभार आला आहे. दर मंगळवारी सीई ऑफिस मधील बैठक संपल्यानंतर, ते स्वतः जातीने झोन 7 मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेत आहेत.
तक्रार अर्ज असो ती माहिती अधिकार अर्ज…. बांधकामाच्या फाईल्स असो की, धोकादायक इमारत किंवा अतिक्रमणाच्या. सर्व प्रकरणांवर तातडीने कार्यवाही कशी करावी याबाबत मार्गदर्शन करून ते स्वतःच अनाधिकृत बांधकामे पाडणे, अतिक्रमणे काढणे यासारख्या कामात उतरले असल्याचे दिसून येत आहे.
तुर्तास शुभेच्छा… सर्वांना…
कनिष्ठ अभियंता श्री. वाघ, श्री. जगताप, श्री. सय्यद यांच्या सारखे इतर अभियंते देखील कामात कसुर होऊ देत नाहीत. सर्वच पेठांमध्ये त्याच नाच्याने घाण करून ठेवली आहे, ती साफ करणे सहज शक्य नसले तरी आता नव्या दमाची टिम अधीक्षक अभियंता श्री. सुधीर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. प्रविण शेंडे यांच्या नेतृत्वात कार्यरत आहेत. कार्यालयातील काही गुपित एक दोन कर्मचारी बाहेर फोडत आहेत. परंतु केवड्या रेवड्याकडे लक्ष देण्याची गरज नाहीये. श्री. गायकवाड आणि श्री. देवडे यांच्याबाबत

सध्या काहीच वाच्चता करणार नाहीये. ते पुढे पाहुयात. तुर्तास शुभेच्छा… सर्वांना…
झोन 7 मधील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा अघोरी उपाय –
बांधकाम विभागाच्या झोन क्र. 7 मधील नोटांच्या बंडलांनी सोकावलेल्या नाच्याने स्वतःच्या गैरहजेरीत इथल्या कर्मचाऱ्यांना अधिकचा त्रास कसा होईल यासाठी अनेक प्रयत्न मागील काही महिन्यांपासून सुरू आहेत. काही नव्यानेच माहिती अधिकार व तक्रार अर्ज कार्यालयात आले आहेत. त्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना त्रास देण्याच्या उद्देशानेच यांना पाठविण्यात येत आहे. दरम्यान श्री. प्रविण शेंडे सारखे अधिकारी खंबीर असल्यामुळे व इतरही कनिष्ठ अभियंता प्रामाणिक असल्यामुळे भांडणे तंटे होत नाहीत. त्यामुळे भांडण – तंट्याच्या दृष्टीने काही माजी नगरसेवकांना, पुढाऱ्यांना पाठवुन त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे.
एवढं करूनही तो थांबत नाहीये. चौथ्या मजल्यावरील झोन 7 च्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अधिक त्रास व्हावा या कपटी उद्देशाने मागील ग्रहणावेळी अघोरी तंत्रमंत्र केले असल्याचे कानावर आले आहे. या अधोरी उपायामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिकचा त्रास व्हावा, भावा – भावा भांडणे व्हावीत, नवरा बायकोत भांडणे, कुटूंबात कहल निर्माण होणे, विनाकारण मुलं आजारी पडणे, कोणतेही कारण नसतांना छोटे मोठे अपघात होणे या सारख्या बाबी घडविण्याच्या उद्देशाने तीन बायका आणि दोन बुटक्यांना वाई प्रांतात पाठवुन अघोरी कृत्य केले असल्याचे कानी येते. झोन 7 च्या कार्यालयात कुणीही टिकुन काम करू नये यासाठी त्याचा खटाटोप सुरू असल्याचे समजते. खरं तर असल्या अंधश्रद्धांचे आम्हीच काय, कुणीच समर्थन करीत नाही. करणारही नाही. याला शास्त्रीय पुरावा काहीही नसला, कायदयाचा आधार नसला तरी हे अघोरी युद्ध खेळणारांची संख्या कमी नाही हे त्यानेच दाखवुन दिले आहे.
झोन 7 च्या कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याची कौटूंबिक स्थिती काय आहे हे समजुन घेण्याचा नागरीक म्हणून कुणालाच अधिकार नाहीये. ते प्रत्येकाचे स्वतंत्र अधिकार आहेत. पण असे काही घडत आहे काय हे ज्याचे त्यानेच तपासून पहावे. ही बातमी

करावी किंवा कसे याबाबत अनेकदा विचार केला. परंतु शुक्रवारी मोठ्या साहेबांचा किरकोळ अपघात आणि त्यांनी हाताला बांधलेले प्लास्टर पाहून अत्यंत धाडस करून हे मी वाचकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या समोर आणले आहे. अंधश्रद्धांच आम्ही समर्थन करीत नाही आणि करणारही नाही. चार बायकाच्या नाच्याने स्वतःच्या घराकडं पहावं. दुसऱ्याच्या घराला आणि कुटूंबाला आगी लावण्याच्या भानगडीत पडू नये.