Wednesday, December 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा!

बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई
पुणे/ प्रबुद्ध भारत/दि./प्रतिनिधी/
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटद्वारे जोरदार टीका केली आहे. हरयाणा दंगलीच्या संदर्भातील एक बातमी आणि धार्मिक यात्रेत हत्यार घेऊन निघालेल्या काही लोकांचा फोटो ट्विट करत त्यांनी 2014 मध्ये केंद्रात भाजप-आरएसएसचे सरकार आल्यानंतर दलित-आदिवासी आणि मुस्लिमविरोधी आणि ओबीसी-विरोधी हिंसाचारात झपाट्याने वाढ झाल्याचा आरोप केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना ट्विट मध्ये पुढे ते म्हणाले आहेत की, ‘द्व्‌ेष, जातिवाद आणि मृत्यूच्या व्यापाराचा ठेकेदार आणि त्याचे गुंड निवडणुकीतील फायदा मिळवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी दंगली भडकावण्यावर, ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक आणि जातीय फूट वाढवण्यावर विश्वास ठेवतात.'

भाजप  आरएसएस सतत सत्तेत राहावी यासाठी दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम यांना सतत दडपण, भीती आणि दहशतीच्या छायेखाली ठेवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ट्विट मध्ये केला आहे.