Thursday, April 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: narendramodiprakashambedkar

1977 ची पुनरावृत्ती होऊ दयायची नसेल, तर आता किमान समान कार्यक्रमावर राजकीय पक्षांनी एकत्र येणे लोकशाहीसाठी आवश्यक

1977 ची पुनरावृत्ती होऊ दयायची नसेल, तर आता किमान समान कार्यक्रमावर राजकीय पक्षांनी एकत्र येणे लोकशाहीसाठी आवश्यक

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/देशात मोदी हटाव, लोकशाही वाचवा म्हणून सर्व विरोधी पक्ष टाहो फोडत आहेत. लहान मोठ्या प्रसार माध्यमांतुन देखील मोदी हटाव ची घोषणा होत आहे. परंतु देशात हे पहिल्यांदाच होत नाहीये. तर यापूर्वी देखील इंदिरा गांधीच्या आणीबाणीनंतर, देशात असंतोष निर्माण झाला होता. त्यावेळी देखील इंदिरा हटाव, लोकशाही बचाव म्हणून सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहे. जनता पार्टीच्या माध्यमातून देशात सर्व विरोधी पक्ष एक झाले होते. परंतु किमान समान कार्यक्रम नसल्यामुळे व वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र आल्यामुळे त्यांच्यात एक वाक्यता राहिली नाही. त्यामुळे जनता पार्टीचे विघटन झाले. चौधरी चरणसिंग देशाचे काही काळ पंतप्रधान राहिले. परंतु पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या. पुढे राजीव गांधी व काँग्रेस विरूद्ध देशात वातावरण निर्माण झाल्यानंतर, पुन्हा देशात विरोधी पक्ष एक झाले व त्यांनी र...
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा!

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा!

राजकीय
बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाईपुणे/ प्रबुद्ध भारत/दि./प्रतिनिधी/वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटद्वारे जोरदार टीका केली आहे. हरयाणा दंगलीच्या संदर्भातील एक बातमी आणि धार्मिक यात्रेत हत्यार घेऊन निघालेल्या काही लोकांचा फोटो ट्विट करत त्यांनी 2014 मध्ये केंद्रात भाजप-आरएसएसचे सरकार आल्यानंतर दलित-आदिवासी आणि मुस्लिमविरोधी आणि ओबीसी-विरोधी हिंसाचारात झपाट्याने वाढ झाल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना ट्विट मध्ये पुढे ते म्हणाले आहेत की, ‘द्व्‌ेष, जातिवाद आणि मृत्यूच्या व्यापाराचा ठेकेदार आणि त्याचे गुंड निवडणुकीतील फायदा मिळवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी दंगली भडकावण्यावर, ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक आणि जातीय ...
नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण ? ॲड.बाळासाहेब आंबेडकर

नोटाबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण ? ॲड.बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/नोटबंदीचा निर्णय वैध असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत असून आता बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण? असाही सवाल उपस्थित केला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिनांक 10 मार्च 2017 रोजी त्यांच्या प्रकाशनामध्ये नोटाबंदीचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर विपरीतपणे झाला आहे असे म्हटले आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाने 2016 च्या नोटबंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना अचानकपणे घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे झालेल्या मृत्यूची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. कोणत्याही सिरीजच्या नोटा रद्द करणे किंवा त्या पुन्हा चलनात आणणे किंवा नोटबंदी करणे यामध्ये केंद्र सरकारने काय भूमिका घ्यावी याविषयीच्या संवैधानिक मुद्यावर अ...