Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

निवडणूकीत कार्यकर्त्यांना विषारी दारू पाजुन विजय झाले अन्‌‍.. विषारी दारूकांडानंतर फरार झालेले उमेदवार अखेर 8 वर्षांनी पुण्यात सापडले

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
अहमदनगर जिल्ह्यात 2017 साली पांगरमल विषारी दारूकांड प्रचंड गाजले होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकी दरम्यान मतदारांना खुष करण्यासाठी दारू वाटून मतदान पदरात पाडून घेण्याची मोठी चढओढ ग्रामीण भागासह शहरीत भागातही असते. अशी तशाच प्रकारे निवडणूक येण्यासाठी शिवसेना उमेदवारांनी मतदारांना विषारी दारू वाटल्यामुळे त्यात अनेकांचे जीव गेले, अनेक जायबंदी झाले होते. दरम्यान या निवडणूकीतील उमेदवार मात्र विजयी होवूनही फरार होते. मागील पाच सहा वर्षांपासून पोलीसांना गुंगारा देत होते. अखेर विषारी दारूकांडातील उमेदवार पुण्यात आढळुन आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

गुन्ह्याची हकीकत अशी की,
एम.आय.डी.सी पोलीस ठाणे जि. अहमदनगर गु.र.नं. 36/2017 भा.द.वि. कलम 304, 328,34, महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (क) (ख) (ग) (घ) (ड) (च), 68 (क) (ख), 80 (1) (2) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3 (1) () (), 3(2), 3(4),4 या गुन्हयातील आरोपी भाग्यश्री गोविंद मोकाटे व मंगल महादेव आव्हाड ह्या शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीकरीता उमेदवार म्हणुन निवडणूकीस उभे असताना, त्यांनी दिनांक 12/02/2017 रोजी मतदारांना व कार्यकर्त्यांना जेवण व देशी/विदेशी दारुची पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये दारु प्राशन केल्यामुळे एकुण 9 इसम मयत झाले व 13 लोक गंभीररीत्या जखमी झाले. त्यापैकी दोघांना अर्धांगवायु व एकास अंधत्व आले आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्युस व गंभीर दुखापतीस कारणीभूत झालेवरुन त्यांच्या विरुध्द वरील गुन्हा दाखल होता.

या गुन्ह्यातील इतर 19 आरोपींवर एकुण 68 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याने सदरच्या गुन्ह्यास मोका कायदा लावून त्यानुसार गुन्ह्याचा तपास चालू होता. गुन्ह्याचे गांभीर्य व व्याप्ती, तसेच राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेवून गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे येथे दिनांक 19/04/2017 रोजी वर्ग करण्यात आला.

सीआयडीचा तपास –
विषारी दारूकांड गुन्हयामध्ये एकुण 20 आरोपी निष्पन्न झाले असून त्यामधील 17 आरोपींना अटक करण्यात आलेली असून दोन आरोपी मयत आहे. या गुन्ह्यात मुख्य महिला आरोपी भाग्यश्री गोविंद मोकाटे. रा. इमामपुर ता. जि. अहमदनगर ही जिल्हा परिषद जेऊर जि. अहमदनगर गटातुन सन 2017 मध्ये जि.प.सदस्य म्हणुन निवडुन आलेली आहे. परंतु त्या मागील सहा वर्षांपासुन फरार होत्या. नमुद आरोपीचा न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज नामंजुर केले आहे. तिच्याविरुध्द विशेष न्यायालयाने एनबीडब्ल्यू वॉरंट व जाहीरनामे प्रसिध्द करुन देखील नमुद आरोपी न्यायालयात हजर न होता स्वतःचे अस्तित्व लपवून फरार होत्या.

सीआयडीला तपास लागला –
एनबीडब्ल्यू वॉरंट व जाहीरनामे प्रसिध्द करुन देखील आरोपी न्यायालयात हजर न होता स्वतःचे अस्तित्व होत्या. दरम्यान भाग्यश्री गोविंद मोकाटे ही पुणे शहरामध्ये वास्तव्यास असल्याची तसेच एका नामांकित कंपनी, म्हाळुंगे, पुणे येथे सेल्स एक्झिक्युटीव्ह म्हणुन कामास असल्याचे खात्रीलायक माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांना बातमीदाराकडुन मिळाल्याने, नियोजित सापळा रचुन तिला दिनांक 27/08/2023 रोजी शिताफीने ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली.

ही कामगिरी श्री. प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक, गु. अ. वि. म. राज्य. पुणे, संजय येनपूरे, विशेष पोलीस महानिरीक्षक (पश्चिम) गु.अ.वि.म.राज्य. पुणे, मा. श्रीमती. पल्लवी बर्गे, पोलीस अधीक्षक, (का व सं) गु.अ.वि.म.राज्य. पुणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. आनंद रोहिदास रावडे, पो. हवा. विकास कोळी पो.हवा. सुनिल फकिरप्पा बनसोडे, म.पो.हवा. उजवला डिंबळे, चालक पो.ना. कदम सर्व नेमणुक गु.अ.वि.म.राज्य. पुणे यांनी केलेली आहे.