Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

गुन्ह्यांचा धावता आढावा, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन व कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी गुन्ह्यांचा समावेश

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
आज दि. 15 फेब्रुवारी रोजीपर्यंत घडलेल्या गुन्ह्यांचा धावता आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये सिंहगड रोड पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन व कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी गुन्ह्यांचा समावेश आहे.

मी पारावरचा भाई आणि 1000 रुपये लुटून नेई…
पुणे/दि/सिंहगड रोड पोलीस स्टेशन/

वैभव बोराडे हा 28 वर्षे युवक रात्री 11030 च्या सुमारास सिंहगड रोडवरील ज्ञानोबा नगर येथे मोटर सायकल वरून घरी जात असताना, आरोपी आदित्य रोहिदास रांजणे व 19 वर्ष रा. चरवड वस्ती वडगाव बुद्रुक 2) गणेश पांडुरंग चोरगे वय 23 वर्ष रा. मोरे यांची बिल्डिंग, म्हसोबा मंदिराजवळ, वडगाव बुद्रुक यांनी मी पारावरचा भाई आहे … मला तुझ्याकडील पैसे दे असे म्हणून फिर्यादी वैभव बोराडे याला लोखंडी हत्याराचा धाक दाखवून, धमकी देऊन, शिवीगाळ व मारहाण करून त्यांच्याकडे रोख एक हजार रुपये जबरदस्तीने घेऊन गेले आहेत. संबंधित आरोपी विरुद्ध सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे भादवि 392 323, 504, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लोहार करीत आहेत.

62 वर्षाच्या वृद्ध महिलेची 64 हजार रुपयांची फसवणूक
पुणे/दि/ चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन/

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील बाणेर येथे राहणाऱ्या एका 62 वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतची हकीकत अशी की, बँक ऑफ बडोदा अशोक नगर येथे संबंधित महिलेचे बँक अकाउंट असून त्यांच्या खात्यावरून ऑगस्ट 2022 ते नोव्हेंबर 2022 व दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी असे एकूण 64 हजार रुपये फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय कोणीतरी अज्ञात व्यक्तीने, कोणत्यातरी अज्ञात पद्धतीने काढून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. याबाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमा विरुद्ध भा द वि 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर सी चाळके करीत आहेत.

खडकी येथे रिकाम्या गॅस सिलेंडरची चोरी
पुणे/खडकी पोलीस स्टेशन/

खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील फिर्यादी शिवकरण इटकर वय 31 वर्ष रा. फ्लॅट नंबर 4, शांताई अपार्टमेंट, समर्थ नगर खराडी, हे टेम्पो चालक असून खडकी येथील देगलूरकर भारत गॅस एजन्सी, एलफिस्टन या ठिकाणी टेम्पोमध्ये लॉक करून ठेवलेले भारत गॅसचे 31 खाली /रिकामे गॅस सिलेंडर हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने टेम्पोच्या मागे असलेले कुलूप तोडून चोरून नेले आहे. अज्ञात चोरट्या विरुद्ध भादविक 461 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतचा अधिक तपास खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम करीत आहेत.

पीएमटी हडपसर प्रवासात महिलेचे मंगळसूत्र लांबविले
पुणे/दि/ हडपसर पोलीस स्टेशन/

हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील मांजरी बस स्टॉप पीएमटी डेपो हडपसर पुणे येथे एक 26 वर्षीय महिला रा. लोणी काळभोर या नमूद ठिकाणाहून पी एम पी एम एल बसने प्रवास करीत असताना फिर्यादी यांची नजर चुकवून त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले रोख 480 रुपये व सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण 5,480/- रुपये किमतीचा ऐवज चोरी केला आहे. अज्ञात इसमा विरुद्ध हडपसर पोलीस स्टेशन येथे भादविक 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस अमंलदार जी बी क्षिरसागर करीत आहेत.

एमआयटी कॉलेजपरिसरात एम.डी. ड्रग्जची विक्री, दोन आरोपी जेरबंद, 14 लाख 37 हजाराचे ड्रग्ज जप्त
विनायक गायकवाड यांची कामगिरी
पुणे/दि/कोथरूड पोलीस स्टेशन/

कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथक पेट्रोलिंग करीत असतांना, पोलीस अंमलदार विशाल शिंदे यांना खबर मिळाली की, लोहिया जैन आयटी पार्क जवळ डावी भुसार कॉनली येथे एका कार मधुन दोन मुले एम. डी. या अंमली पदार्थाची विक्री एमआयटी कॉलेज परिसरातील तरूणांना करीत असतात. त्यानुसार विनायक गायकवाड यांच्यासह लक्ष्मण ढेंगळे, शैलेजा जानकर व पथकाने छापा कारवाई सुरू केली.
याच वेळी बुलेट शोरूम चौक, लोहिया जैन आयटी पार्क जवळ डावी भुसार कॉनी इशाना आय बिल्डींग समोर सार्वजनिक रस्त्यावर दोन इसम एक पांढरे रंगाच्या हुडाई निओस आय 10 कार मध्ये संशयीतरित्या बसलेले दिसले. सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे व पथकाने छापा कारवाई करून 1. पद्मसिंग हेमंत पाटील वय 23 रा. सुसगांव पुणे 2. यश संतोष शिंदे वय 22 रा. रूणवाल सोसायटी वारजे पुणे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 14 लाख 37 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यामध्ये 4 लाख 26 हजार रुपये किमतीचे 20 ग्रॅम 133 मिली मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ एक इलेक्ट्रीक वजन काटा, हुंडाई कार, चार मोबाईल असा ऐवज व अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या जवळ बाळगतांना मिळून आला आहे.
संबंधितांविरूद्ध एनडीपीएसॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच गुन्ह्यातील आरोपींकडे चौकशीत त्यानी हे अंमली पदार्थ मुंबई येथील निगरो इसमांकडून आणला असल्याचे सांगितले. अधिक तपास कोथरूड पोलीस करीत आहेत. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर घोरपडे, मनोजकुमार साहुंके, विशाल दळवी, राहुल जोशी, पांडूरंग पवार, सचिन माळवे, संदशे काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.