Monday, November 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राजकीय हस्तक्षेप व गुन्हेगारी व्यावसायिकांचा बिमोड करून, वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाची धडक अतिक्रमण कारवाई, वाहतुक कोंडीतून नागरीकांची सुटका

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गणपती माथा ते शिंदे पूल हा एनडीए कडे जाणारा रस्ता कायमच अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या वाहनांनी गजबजलेला असतो. नागरिकांना रस्त्यावरून जाताना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. दरम्यान गेली अनेक वर्ष नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रारी येत होत्या, परंतु काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यवसायिक व राजकीय हस्तक्षेपामुळे या ठिकाणी कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्याने, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यावसायिकांचा बिमोड करून अतिक्रमण विभाग व मध्यवर्ती पथकाकडून धाडसी कारववाई आज करण्यात आली.

कारवाई करत असीतारंना, वाहनांची पळापळ, कर्मचाऱ्यांच्या अंगावरही धावुन आले-
या कारवाईत 16 व्यावसायिक टेम्पो, 06 बिगर टप हातगाडी, 1 टप हात गाडी, 3 नग होजिअरी, 3 लोखंडी काउंटर, 3 गॅस सिलेंडर, 1 फ्रीज, 1 लोखंडी बाकडा व स्टूल, 1 छत्री व 1 मोठे डिजिटल स्टॅन्ड जप्त करण्यात आले. वाहनांवर कारवाई करत असताना वाहने पळवणे, धोकादायकरित्या सेवकांच्या अंगावर वाहने घालणे अशा प्रकारच्या विकृती व्यवसाय धारकांकडून चालू असतानाही कारवाई चालू ठेवून सक्षमपणे कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण निरीक्षक श्री अजय गोळे यांनी सलग तिसऱ्या दिवशी मध्यवर्ती पथक व जवळील क्षेत्रीय कार्यालयाकडील सेवकांना बोलाऊन सक्षमपणे अनधिकृत व्यवसायिकांवरील कारवाई चालू ठेवली. या अतिक्रमण कारवाईत एक अतिक्रमण निरीक्षक ,9 सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, 32 बिगारी सेवक, 2 एमएसएफ पथक व 3 ट्रक यांचे मार्फत ही कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली , महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल, अतिक्रमन निरीक्षक अजय गोळे सहाय्यक अतिक्रमन निरीक्षक श्रीमती किरण डवरी,  राकेश काची,  कुणाल मुंडे, राहुल बोकन , राहुल डोके, सचिन जाधव, शिवशंकर वाडीकर, सागर विभूते व प्रथमेश पाटील यांनी यशस्वीरित्या कारवाई पार पाडली.

श्री. अजय गोळे यांचे व्यावसायिकांना आवाहन-
श्री अजय गोळे यांनी अनधिकृत व्यवसाय धारकांना आव्हान केले आहे की, वारजे क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत अनेक व्यवसायधारक रस्त्यावर फुटपाथवर व सोसायटी साईड मार्जिन मध्ये अनधिकृतरित्या व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनात येत असल्याने आम्ही कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग यांच्यामार्फत अतिक्रमण विभाग, आकाशचिन्ह विभाग मिळून संयुक्तरित्या येणाऱ्या पुढील काळात कारवाया प्रस्थापित करणार आहोत, त्यामुळे कोणीही अनाधिकृत व्यवसाय करू नये याची व्यवसायिकांनी नोंद घ्यावी असे आव्हान केले आहे.