आदिवासी समाजाने आरक्षणाबाबत जागृत राहणे ही काळाची गरज
नॅशनल फोरम/अकोले/दि/ प्रतिनिधी/
आरक्षणामध्ये विविध समाजामध्ये भांडणे लावून दिली आहेत. भारतीय राज्य घटनेत आरक्षणाच्या स्पष्ट तरतुदी असताना त्यामध्ये राजकारण करण्याच्या उद्देशाने इतर समुदायाला खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करण्यात येत आहे .त्यामुळे आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. यापुढे जावून आता तर सर्वोच्च न्यायालयाने एससी/एसटी मध्ये सब कॅटेगरि करून आरक्षणाची भागीदारी आणि आरक्षणामध्ये अेबीसीडी करून त्यातही क्रिमिलियर लावण्याचे स्पष्टसंकेत दिले आहेत. अशा पद्धतीने समान गुणधर्म आणि एकजिनशी संस्कृती असणाऱ्या समुदायामध्ये विभागणी करून जातीव्यवस्था बळकट करण्याचे सूतोवाच सर्वोच्च न्यायालयाने केल्याचे प्रथम दर्शनी जाणवत आहे . आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात इतर जातींची घुसखोरी होत असून आदिवासी समाजातील लाखो नोकऱ्या हडप केल्या आहेत. आपण एकजूट दाखवून कायदेशीर मार्गाने अगर रस्त्यावर उतरून आंदोलन केले नाही तर आपल्या हातात काहीच उरणार नाही , आपल्या भावी पिढ्या बर्बाद होत आहेत .त्या बद्दल नुकतेच धनगर लढा आणि नाम सादृष्याचा गैर फायदा घेणाऱ्या बोगस जातींचा कसा अटांपिटा चालू आहे. त्यामुळे आदिवासी समाजाने आरक्षणाबद्दल जागृत होण्याची गरज असल्याचे मत पुणे महापालिकेतील तत्कालिन अधीक्षक अभियंता श्री. नामदेव गंभिरे यांनी व्यक्त केले आहे.
आदिवासी समाज कृती समिती ,महाराष्ट्र पुणे व आदिवासी स्वप्नदूत फौडेशंन , मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने आदिवासी विद्यार्थी गुणवंत पुरस्कार -2024 चे आयोजन ऍड. एम.एन. देशमुख महाविद्यालय राजूर तालुका अकोले येथे आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमामध्ये इयता 10 वी ,12 वी. ( कला , वाणिज्य व विज्ञान ) या इयत्तांमध्ये मध्ये 75 % पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेल्या आणि पदवी तथा तत्सम परीक्षेमध्ये विशेष गुणवता प्राप्त केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना स्मुर्ती चिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे ,धरती आबा बिरसा मुंडा ,त्याचप्रमाणे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, विद्येची देवता सरस्वतीमाता आणि भारतीय संविधानाचे निर्माते डॉ आबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली .जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंभिरेवाडी येथील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात केली .आदिवासी समाज कृती समिती ,महारास्त्र पुणे या संस्थेचे उपाध्यक्ष मा गंगाराम सांगडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्थाविक केले त्यामध्ये त्यांनी संस्थेने या पूर्वी केलेल्या सामाजिक कार्याचे अवलोकन करून भावी योजनांची माहिती दिली ,त्याच प्रमाणे आदिवासी स्वप्नदूत फाउंडेशन,,मुंबई या संस्थेचे अध्यक्ष इंजि .सुनिल भांगरे यांनी संस्थेचे यापूर्वीचे कामाचा आढावा घेऊन पुढील कामाची दिशा स्पष्ट केली. त्यामध्ये भविष्यात आदिवासी गुणवंत व गरजू मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल .तशेच संस्थेंने महिला पतपेढीची निर्मिती केली असून त्याद्वारे आदिवासी गरजू व गरीब महिलांच्या व्यावसाईक कामासाठी अनुदान दिले जाईल असे सांगितले .
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा भाऊसाहेब चासकर यांनी मुलांना भावी शिक्षणाची दिशा दिली . मुलांनी अभ्यासाबरोबर संस्कार अंगीकारणे खूप गरजेचे आहे . मुलांनी आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन जिद्दीने आणि मेहनतिने आपले ध्येय पूर्ण करावे असे सांगितले .त्याच प्रमाणे डॉ सुनिल घनकुटे यांनी मुलांना स्वप्न कसे पाहावे व ते प्रत्यक्षात कसे आणावे या बाबतचे डॉ . ए पी जे अब्दुल कलाम आणि स्वामी विवेकानंद यांची उदाहरणे देऊन पटवून दिले .
आदिवासी समाज कृती समितीचे अध्यक्ष इंजी. नामदेव गंभिरे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना , मुलांनी प्राप्त परस्थितीमध्ये उपलब्ध साधनांचा योग्य उपयोग करून मेहनत आणि उच्च ध्येय ठेऊन इंजीनिअर, डॉक्टर, स्पर्धा परीक्षेतून मोठी पदे व उच्च पदांसाठी प्रयत्न करून यशस्वी व्हावे .सर्वच क्षेत्रात खूप मोठी स्पर्धा असल्याने रोज किमान 8-10 तास अभ्यास करणे गरजेचे आहे .नोकरीच्या संधी कमी झाल्याने खाजगी अगर सरकारी आस्थापनामध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करून मेहनतीने योग्य नियोजन केल्यास स्वताचे घर आणि कुटुंब चांगल्या पद्धतीने चालवू शकाल असे काही मुलांचे उदाहरण देवून सांगितले,त्याच प्रमाणे विविध व्यवसाय स्वताचे पायावर उभे राहण्याचे बळ निशित देवू शकतील .भविष्यात आरक्षण बंद होण्याचे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत .
गंभिरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मुलीनी उत्तम डान्स करून उपस्थितांची मने जिंकली .इयता 10 वी व 12 वी मधील सुमारे 100 मुलांचा सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवून पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये
करूणा बांबेरे 90..40%,
किशोर गंभिरे 91.20 % ,
आर्या गंभिरे 90.16 % ,
सिद्धी इरनक 97 % ,
अंकांशा बोऱ्हाडे 82 %
ममता मुठे 88.20 % ,
जालिंदर हिले 89.80 %,
सम्राट संगारे 78.80 %,
अनिकेत कचरे 78.20 % ,
आरती भालचिम 86.06 % ,
नीलम कडाळी 85.67 % ,
वैष्णवी दराडे 81.50 % ,
कार्तिकी लोहकरे 83.80 % ,
मनोज बाबळे 79 % ,
स्वाती गंभिरे 81 % ,
प्रज्योत भांगरे 83 %
इत्यादींचा समावेश आहे .
त्याच प्रमाणे नेहा गंभिरे (बी फार्म ) .प्रा कुसमुडे जि एस .सेट परीक्षा उतीर्ण आणि विक्रांत अल्हाट यांनी पिएसआय परीक्षा उतीर्ण केल्या बद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी मुलांनी मोबाइलचा गर्जे पुरता वापर करावा, व्यसनाधिनतेकडे वळू नये, कुटुंबातील संस्कार वाढीसाठी प्रबोधनाची गरज असल्याचे विद्यार्थी व पालकांना आवाहन केले.
या प्रसंगी ऍड . एम.एन . देशमुख महाविद्यालय राजूर या संस्थेस 51000 /- चा धनादेश एन स्क्युअर आर्म बिजनेस हब पुणे यांचेमार्फत मुलांच्या शुद्ध पिंण्याच्या पाण्यासाठी फिलट्रेशन व्यवस्थेसह कुलर विकत घेण्यासाठीङ्गसुपूर्द करण्यात आला .त्याच प्रमाणे सौ सखुबाई श्रावण घिगे यांना 5000/- ची मदत देण्यात आली .श्री किसनराव भोजने यांनी पाहुणे ,विद्यार्थी आणि पालक तशेच उपस्थितांचे आभार मानले .पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होऊन सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेऊन पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली .