सहकारनगर पोलीस- रागाने काय बघतो म्हणून पाठीमागुन कोयताच मारला…
पर्वती पोलीस – पायी चालला, मग काय.. लोखंडी रॉड आणि लाकडी बांबुने मारझोड
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
तु माझ्याकडे रागाने का बघतोस, तु माझ्याकडे बघुन मान का वळवलीस अशा शुल्लक कारणांवरून देखील दोन गटांमध्ये राडा होण्याचे प्रमाण सध्या पुणे शहरात घडत आहेत. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील संभाजीनगर, धनकवडी येथे रागाने बघत असल्याने जाब विचारल्याने शाब्दीक चकमक झाली अन् त्याचे पर्यवासन हाणामारीत झाले. ते इतके की कोयते काढण्यात आले. पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील जनता वसाहत पर्वती येथे मित्राच्या भावाला मारहाण होत असल्याने त्यात मध्यस्थी केल्याने टोळक्याने लाकडी स्टम्प व लोखंडी रॉडने हाणमार केल्याच्या घटना घडल्या आहेत. गुन्ह्याची हकीकत खालील प्रमाणे-
सहकारनगर पोलीस स्टेशन –
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमान मंदिराजवळ संभाजीनगर पुणे येथे एक अल्पवयीन मुलगा रा. संभाजीनगर हे दि. 19 जानेवारी रोजी त्याच्या मित्र अनिकेत कर्के याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असतांना, यातील चार इसमांनी रस्त्यात आडवे होवून, फिर्यादी यांच्याकडे रागाने बघत असतांना, त्यांना जाब विचारल्याच्या कारणांवरून त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 जानेवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास यातील फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत संभाजीनगर येथे सजावटीचे पताके लावत असतांना, सदर इसमांनी आपसात संगनमत करून, त्याच्या हातावर धारदार हत्यार घेवून येवून त्यांनी भांडणे मिटवण्याचे कारणांवरून फिर्यादी यांना हाताने मारहाण करून त्यांच्या पाठीमागुन कोयत्याने वार करून दुखापत केली.
चार इसमांविरूद्ध गुन्हे दाखल केले असून, त्यांचेवर भादविक 323, 326, 504, 506, 34 व भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25) महा. पोलस अधि. कलम 37 (1) 3 सह 135 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींना अद्याप अटक केली नाही.
अधिक तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उप. निरी. युवराज पठारे करीत आहेत.
पर्वती पोलीस स्टेशन –
पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील जनता वसाहत गल्ली नं. 73, वरचा टप्पा पर्वती येथे फिर्यादी रोहित गोरखे वय 23 रा. जनता वसाहत पर्वती हे त्यांचा मित्र पवन कोळी याच्यासह जात असतांना, फिर्यादी याच्या मित्राचा भाऊ शंकर काकडे यांना काही मुले मारहाण करीत होते, म्हणून फिर्यादी हे त्यांच्या मदतीला गेले. तथापी तेथे असलेल्या एकुण 10 इसम व त्यांचे इतर 3 ते 4 साथीदार यांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन, फिर्यादी व पवन यांना शिवीगाळ करून, लाथा बुक्कयांनी मारहाण करून त्यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांचे डोक्यात तसेच पवन कोळी याच्या डोक्यात लाकडी स्टम्प, लोखंडी रॉड, लाकडी बांबु व दगडाने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या मदतीला आलेल्या वस्तीतील नागरीकांना धमकावुन पळवुन लावान दहशत निर्माण केली आहे.
या प्रकरणी एकुण 10 इसम व त्यांचे इतर 3 ते 4 साथीदारांविरूद्ध पर्वती पोलीस स्टेशन मध्ये भादवीक 307, 323, 143, 144, 147, 148, 504, 506 महा.पो. का क. 37 (1) 135 आर्म ॲक्ट 4 (25) क्रिमिनल लॉ क्र. 3 व 7 नुसार गुन्हे दखल केले आहेत. याबाबतचा अधिक तपास पर्वती पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जी. डी. घावट करीत आहेत.