Monday, November 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

10 वीत दोन/दोन वेळा नापास झालेले व पुणे महापालिकेत गवंडी, बिगारी, शिपाई, आरेखक पदावरील सेवक आता कनिष्ठ अभियंता म्हणून पदाचा वापर करीत आहेत….आयुक्त विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे यांनी पुणे महापालिका विकायला काढली आहे काय…

बोगस डिग्री आहे हे माहिती असतांना देखील नियुक्ती व पदोन्नती कशाच्या आधारे दिली जात आहे,
2015 मध्ये पदोन्नती दिलेले कोण आहेत हे अभियंते….
कारवाई करू नये म्हणून प्रत्येकी 10/10 लाख रुपये दिल्याचा आपने आरोप केला आहे, कुठून आणल्या डिग्र्या… पूर्वीचे त्यांचे पद काय होते सर्व सविस्तर माहिती पहा आजच्या अंकात…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी, पुणे महापालिकेतील बदल्यांचे दर 10 लाख, 20 लाख, 30 लाख रुपये दिल्याशिवाय नियुक्ती व पदोन्नती दिली जात नसल्याचा तक्रार अर्ज नगरविकास मंत्रालयास दिला होता. आता देखील आम आदमी पक्षाने बोगस अभियंत्यांनी, कारवाई करू नये म्हणून सुमारे 10 लाख रुपये दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हे पैसे जातात तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता पुणे महापालिकेत समाविष्ठ केलेल्या गावातील कर्मचाऱ्यांना थेट वरिष्ठ लिपिक पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे, तसेच नवीन सेवकांना बांधकाम, टॅक्स सारख्या खात्यात नियुक्ती देवू नये असा 2004 चा ठराव असतांना देखील नवीन सेवकांना बांधकाम, टॅक्स सारख्या विभागात नियुक्ती दिली गेली आहे. याच कालावधीत समाज विकास विभागातील 160 जणांना कायम नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत, पैकी त्यातही 20 ते 25 जणांना वेटींगवर ठेवण्यात आले आहे. समाविष्ठ गावातील सेवकांना कायम करणे, समाज विकास विभागातील सेवकांना कायम करणे व महत्वाच्या खात्यात नियुक्ती देण्यातही मोठी उलाढाल झाली असल्याची चर्चा पुणे महापालिकेत आहे. त्यात पुणे महापालिकेत 10/15 वर्षांपासून काम करणाऱ्या सेवकांवर अन्याय होत असल्याने पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार व अति. आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्या कारभाराविरूद्ध महापालिकेत असंतोष निर्माण झाला आहे. परीक्षा, नवनियुक्ती, पदोन्नती, क्रिमी खात्यात पदस्थापना यात लाखोंची बोली लागत असून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असल्याची पुणे शहरात ओरड होत आहे. त्यामुळे पुणे महापालिका विकायला काढली आहे काय असाही सवाल आज पुणे महापालिकेतील आजी माजी नगरसेवक व आजी- माजी सेवकांनी तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला आहे.

बोगस अभियंत्यांवर सवलतींचा वर्षाव –
पुणे महापालिकेने माहे 2015, 2018 व 2020 रोजी कनिष्ठ अभियंता पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले आहेत. यातील 42 सेवकांनी सिव्हील इंजिनिअर म्हणून आणलेल्या पदवी व पदविका बोगस असल्याची तक्रार आम आदमी पक्षाने मागील तीन वर्षापूर्वी केली होती. तसेच राजस्थान, आसाम, मणिपूर सारख्या परराज्यातून ह्या पदव्या संपादन केल्या होत्या. विहित शैक्षणिक अर्हता नसताना देखील अभियंते असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्यांचे अर्ज आधीच बाद करून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करायला हवा, बडतर्फीची कारवाई करायला हवी. पण मग तसे न करता या बोगस अभियंत्यांना पुणे मनपा पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेल्या बोगस अभियंत्यांना बांधकाम, पथ, टॅक्स सारख्या क्रिमी खात्यात पोस्टींग देवून, त्यातही काही क्रिमी विभागात नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. काही बोगस अभियंत्यांना क्षेत्रिय कार्यालयात महत्वाच्या पदांवर नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. काही जणांना तर क्षेत्रिय अधिकारी पदाचा प्रभारी पदभार देण्यात आलेला आहे. काही बोगस पदविका आणणाऱ्या अभियंत्यांना पूर्ण अधिकार पद बहाल केले आहे. त्यामुळे बोगस अभियंत्यांवर एवढ्या सवलतींचा वर्षाव का करण्यात येत आहे असाही सवाल पुणे महापालिकेत विचारला जात आहे.

वास्तविक पाहता, दूरस्थ शिक्षणाद्वारे नियमबाह्य बोगस अभियंता पदविका प्रमाणपत्र सादर करून वर्ष 2015, 2018, 2020 या वर्षी महानगरपालिकेत  पदोन्नतीने अभियंता झालेल्या 42 बोगस अभियंत्यांवर शासन निर्णय क्रमांक सीडीआर 1093/ 1077  प्र क्र 23/ 93/ अकरा दिनांक 12- 10- 1993 अनुसार सेवा समाप्ती / बडतर्फीची कारवाई करावी आणि फसवणूक, संघटीत कट, संगनमताने केलेला गुन्हा याबद्दल फौजदारी कारवाई करावी अशीही मागणी आपने लेखी स्वरूपात आयुक्त विक्रम कुमार व अति. आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्याकडे केली आहे. तथापी सर्व पुरावे समोर येवून देखील आयुक्त बोगस अभियंत्यावर कारवाई का करीत नाहीत. तसेच कारवाई तर सोडाच परंतु त्यांच्यावर प्रभारी व अति. पदभार देवून सवलतींचा वर्षाव करीत असल्याचे समोर आले आहे. 

2015 मध्ये पदोन्नती दिलेले कोण आहेत हे अभियंते….
पुणे महापालिकेतील कार्यरत कर्मचाऱ्यांमधुन किमान 5 वर्षाचा अनुभव व शेषणिक अर्हता धारण करणाऱ्या सेवकांना अति. महा. आयुक्त ज या कार्यालयाने दि. 15 मे 2015 रोजी त्यांचे कार्यालयीन पत्र आस्था/895 नुसार स्थापत्य विभागासाठी 20 व विद्युत विभागासाठी 3 सेवकांना पदोन्नती दिली आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे आहे –
कनिष्ठ अभियंता – स्थापत्य-
1) श्री. हवालदार प्रकाश सिताराम, अजा (डिसीई) पूर्वीचे पद- अनुरेखक – वर्ग 3
2) श्री. शिंदे रामचंद्र सोपान, अजा (डीसीई) पूर्वीचे पद – अनुरेखक – वर्ग 3
3) श्री. बारवकर बापु रघुनाथ इमाव (डीसीई) पुर्वीचे पद – गवंडी वर्ग – 4
4) श्री. राऊत हरिश्चंद्र ज्ञानेश्वर इमाव (डीसीई) पुर्वीचे पद – गवंडी वर्ग – 4
5) श्री. पांडूळे श्रीधर दिगंबर भजक (डीसीई) पुर्वीचे पद – गवंडी वर्ग – 4
6) श्री. ढमाले ईश्वर दशरथराव खुला (डीसीई) पूर्वीचे पद – गवंडी वर्ग 4
7) श्री. भागवत त्र्यंबक नाथा इमाव (डीसीई) पूर्वीचे पद – गवंडी वर्ग 4
8) श्री. राऊत चंद्रकांत लक्ष्मण इमाव (डीसीई) पूर्वीचे पद – गवंडी वर्ग 4
9) श्रीमती राठोड विजया मनोहर विजाअ (बीई) पूर्वीचे पद – ज्यु. ग्रे. लेख वर्ग – 3
10) श्री. गायकवाड शिवाजी तुकाराम खुला (डीसीई) पूर्वीचे पद -अतिक्र. निरीक्षक वर्ग 3
11) श्रीमती जगताप कविता चंद्रकांत खुला (डीसीई) पूर्वीचे पद – आरेखक वर्ग 3
12) श्रीमती तळेकर अर्चना शंकरराव अजा (डीसीई) पूर्वीचे पद – आरेखक वर्ग 3
13) श्री. पाटोळे रमेश दास अजा (डीसीई) पूर्वीचे पद – कचरा मोटार बिगारी वर्ग 4
14) श्री. चाबुकस्वार संदिप विद्याधर अजा (डीसीई) पूर्वीचे पद – अनुरेखक वर्ग 3
15) श्री. संदीप नरहरी राजुरकर इमाव (डीसीई) पूर्वीचे पद – अनुरेखक वर्ग 3
16) श्री. चोपडे परशुराम विष्णु इमाव (डीसीई) पूर्वीचे पद – अनुरेखक वर्ग 3
17) श्री. आढारी रामदास तुळशीराम अज (डीसीई) पूर्वीचे पद – गवंडी वर्ग 4
18) श्री. निवदेकर शशिकांत गोविंद इमाव (डीसीई) पूर्वीचे पद – शिपाई वर्ग 4
19) श्री. चव्हाण मनोज बबन खुला ए.एम.आय.ई. पुर्वीचे पद असि. इलेक्ट्रीशियन वर्ग 3
20) श्री. गिते गणेश राजेंद्र इमाव (डीसीई) पूर्वीचे पद – शिपाई वर्ग 4
कनिष्ठ अभियंता (विद्युत) –
1) श्री. नागदेवकते सिद्धार्थ जोगडे अजा (डीसीई) पूर्वीचे पद – निदेशक वर्ग 3
2) श्री. जाधव सुर्यभान गेनबा इमाव (डीसीई) पूर्वीचे पद – इलेक्ट्रीशियन वर्ग 3
3) श्री. आवळे सोमनाथ अशोक अजा (डीसीई) पूर्वीचे पद – आरोग्य निरीक्षक वर्ग 3

स्थापत्य अभियंत्यांनी कुठून आणल्या पदवी व पदविका-
1) श्री. हवालदार प्रकाश सिताराम, – पुणे
2) श्री. शिंदे रामचंद्र सोपान, – आसाम
3) श्री. बारवकर बापु रघुनाथ -आसाम
4) श्री. राऊत हरिश्चंद्र ज्ञानेश्वर -आसाम
5) श्री. पांडूळे श्रीधर दिगंबर – आसाम
6) श्री. ढमाले ईश्वर दशरथराव – गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल पुणे
7) श्री. भागवत त्र्यंबक नाथा- आसाम
8) श्री. राऊत चंद्रकांत लक्ष्मण – फाईल अनुपलब्ध
9) श्रीमती राठोड विजया मनोहर – पुणे
10) श्री. गायकवाड शिवाजी तुकाराम- गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे
11) श्रीमती जगताप कविता चंद्रकांत- गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे
12) श्रीमती तळेकर अर्चना शंकरराव – टेक्निकल एज्येकेशन पुणे
13) श्री. पाटोळे रमेश दास- Gov.टेक्निकल एज्येकेशन पुणे
14) श्री. चाबुकस्वार संदिप विद्याधर -टेक्निकल एज्येकेशन पुणे
15) श्री. संदीप नरहरी राजुरकर टेक्निकल एज्युकेशन पुणे
16) श्री. चोपडे परशुराम विष्णु टेक्निकल एज्युकेशन पुणे
17) श्री. आढारी रामदास तुळशीराम- आसाम
18) श्री. निवदेकर शशिकांत गोविंद -टेक्निकल एज्युकेशन पुणे
19) श्री. चव्हाण मनोज बबन -एज्युकेशन इंजिनिअर इंडिया ( नाव पत्ता काहीच नाही)
20) श्री. गिते गणेश राजेंद्र – राजस्थान

कनिष्ठ अभियंता (विद्युत) –
1) श्री. नागदेवकते सिद्धार्थ जोगडे – राजस्थान
2) श्री. जाधव सुर्यभान गेनबा – गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल, पुणे
3) श्री. आवळे सोमनाथ अशोक – टेक्निकल बोर्ड मुबई व कर्नाटक

इंजिनिअरींग हा वर्गात बसून पूर्ण वेळेचा अभ्यासक्रम आहे- दुरस्थ नाही-
वरील नमूद 1ते 23 सेवकांनी पुणे महापालिकेत सेवक म्हणून कर्तव्य बजावित असतांनाच, काहीं सेवकांनी दुरस्थ पद्धतीने व काही सेवकांनी दोन्ही ठिकाणी एकाच वेळी हजर राहून अभ्यासक्रम पुर्ण केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत आहे. दरम्यान अभियांत्रिकी हा प्रात्यक्षिकासोबत पूर्ण वेळ करावयाचा कोर्स असल्याने दूरस्थ पद्धतीने तो शिकता येत नाही. अेआयसीटीची मान्यता नसल्याने दूरस्थ शिक्षण पद्धतीने प्रदान केलेल्या अभियांत्रिकी पदवी, पदविका ह्या नियमबाह्य आहेत आणि त्याआधारे कोणतीही पदोन्नती, सरकारी नोकरी देऊ नये असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांनी दिलेला आहे. पहा –
(Supreme Court of India – CIVIL APPEAL NOS. 17869-17870 /2017 (Arising out of Special Leave Petition (C) Nos.19807-19808/2012- ORISSA LIFT IRRIGATION CORP. LTD ……APPELLANTS VERSUS RABI SANKAR PATRO & ORS. ….RESPONDENTS); Punjab and Haryana High Court- CWP No.20430 of 2011 (O&M) and connected cases) याबाबतUGC/ AICT यांची अनेक परिपत्रके आहेत. तरी देखील पुणे महापालिकेने वरील नमूद व सध्या कार्यरत असलेल्या 1 ते 23 सेवकांना पदोन्नती दिली आहे.

पुणे महापालिका युजीसी-एआयसीटीई व सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे काय –
इंजिनिअरींग अर्थात अभियांत्रिकी शिक्षण व अभियंता म्हणून नियुक्ती देत असतांना, पदोन्नती देत असतांना, युजीसी व एआयसीटीईने अनेक परिपत्रके व आदेश जारी केले आहेत. संबधितांचे वेबसाईटवर ती उपलब्ध आहेत. तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने देखील याबाबत आदेश जारी केले आहेत. थोडक्यात ज्या सेवकांनी परराज्यातील आणलेल्या पदव्या व पदविका ह्या बेकायदेशिर आहेत हे आता समोर आले असतांना देखील पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार व अति. आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे कारवाई का करीत नाहीत हा महत्वाचा मुद्दा आहे.

आसाम मधील अभियंत्यांच्या डिग्र्या हाताने लिहलेल्या – आसाम मधील सर्व सेवकांची बॅच नंबर – 1002 कसे-
यात विशेष महत्वाची बाब म्हणजे ज्या सेवकांनी आसाम मधील सिलचर म्हणून पदव्या व पदविका आणलेल्या आहेत, त्या सर्व हाताने लिहलेल्या आहेत. ब्रिटीश काळापासून देशात टाईपराइटर आहे. तसेच 2000 सालापासून सर्व शिक्षण संस्था व विद्यापीठांमध्ये संगणकाचा वापर करण्यात येत आहे. तरी देखील आसाम, सिलचर मधील एकुण 8 सेवकांच्याच्या पदविका ह्या हाताने लिहलेल्या असल्याचे दिसून येत आहे. फोटो पहा.

ज्यांनी राज्य व पुण्यातील अभियंते म्हणून पदवी/पदविका आणली त्याबाबत-
पुणे महापालिकेत कार्यरत असलेल्या ज्या सेवकांनी पुणे व महाराष्ट्रातून पदवि व पदविका आणल्या आहेत, त्याबाबत संबंधित सेवकांनी कुठल्याही प्रकारचे शिक्षणासाठी पुणे महापालिकेकडे परवानगी मागितली नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. तसेच ते सेवक पुणे महापालिकेतही हजर होते व सदर शिक्षण संस्थेतही हजर होते, हे कसे शक्य आहे. त्यामुळे ह्या सर्व फौजदारी पात्र कटाची सीबीआय, ईडी मार्फत चौकशी करून दोषींविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणे आवश्यक ठरत असल्याचे मत रिपब्लिकन फेडरेशनचे अध्यक्ष अनिरूद्ध चव्हाण यांनी मुख्य सचिवांना केलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. तसेच आम आदमी पक्षाने देखील संबंधित अभियंत्यांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

आता चौकशी होणे आवश्यक आहे-
बॉम्बे टेक्निकल बोर्ड व मुंबई हिंदी विद्यापीठ ह्या संस्थेतून देखील पुणे महापालिकेच्या सुमारे 20 टक्के सेवकांनी पदवि व पदविका आणलेल्या आहेत. या संस्थाविरोधात बोगस डिग्री प्रकरणी माहिम मुंबई येथे अनेक तक्रारी व गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ज्या सेवकांनी बॉम्बे टेक्निकल बोर्ड व मुंबई हिंदी विद्यापीठातून पदवि व पदविका आणल्या आहेत, त्याचीही चौकशीची मागणी केली आहे. (क्रमशः) पुढील अंकात- 2018 मधील अभियंते व त्यांची सद्यःस्थिती पाहूयात….