Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्डयांचे पुनः उघडले महाव्दार

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/
पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक यांच्या नियंत्रणाखालील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्डा चालकांनी, मटका, सोरट, रमीचे क्लब सारख्या जुगाराचे महाव्दार उघडले असल्याचे दिसून आले आहे. काही अड्डेवाले उघड उघड धंदा करीत आहेत तर काही लपुन- छपुन अवैध धंदे सुरू असल्याचे दिसून येत आहे.


पुणे महानगरपालिकेजवळ मनोज शहा नावाच्या इसमाचा ऑनलाईन लॉटरी दुकानात मटक्याचा अड्डा सुरू असल्याचे दिसून आले आहे. या गॅम्बलरची विशेषतः अशी सांगितली जाते की, ऑनलाईन मधुन मटक्याचा कोणताही निकाल आला तरी तो स्वतःच्या बाजुने सर्व निकाल ओढुन घेतो अशी त्याची कसब असल्याची चर्चा आहे.
सावरकर भवन ते मॉर्डन कॉलनीपर्यंत रमीचा प्रवास सुखनैव सुरूच आहे. 1.विठ्ठल, 2.जावेद , 3. सचिन 4. गायकवाड, 5. अलिकडचा राजु आणि पलिकडच्या राजुचा थयथयाट अजूनही सुरूच असल्याचे सांगितले जात आहे.
शिवाजीनगर कोर्टातून टाईप केलेल्या पिटीशनचे भेंडोळे वकीलांपुढे आपटून, थकलेल्या अवस्थेत गाडीवरून पुढे जात असतांना, नर्मदेजवळ दोन चार झिरो पोलीसांनी, पोलीस अंमलदाराच्या थाटात कोपऱ्यावरून आवाज ठोकला. मिलेंगे पाँच … तर चहा तर होणारच… नर्मदा हर हर चा मटण मसाला चहा घेता घेताच, मग पुढे शिवाजीनगरच्या दरबाराची कहानी सुरू झाली.
आता…हताश होऊन बातमी देणं एवढच माझ्या हातात आहे, पोलीस कारवाई करीत नाहीत. नियंत्रण कक्ष तर कान असून बहिरे आणि डोळे असून आंधळे झाले आहे, त्याला कोण काय करणार… एकशे बारा… एकशे बारा… करून… करून… तर पुण्याचे बारा वाजविले आहेत.