Saturday, August 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

एक लाख ते 100 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांना जास्त परताव्याचे आमिष, आर्थिक फसवणूक करणाऱ्या राजश्री तुड्येकर हीला शिवाजीनगर पोलीसांनी केली अटक

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
शिवाजीनगर हद्दीत रॉयल फॉरेक्स ट्रेडींग या नावाने कंपनीचे कार्यालय चालू करून रॉयल ट्रेडिंग कंपनीमध्ये 01 लाखापासून पुढे 100 कोटी पर्यंतच्या गुंतवणुक स्विकारल्या जातात तसेच दिलेल्या रकमेपैकी 30 टक्के रक्कम शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतविली जाते व उरलेली 70 टक्के रक्कम सुरक्षीत ठेवली जाते, त्यामुळे गुंतवणुकदारास त्यांनी गुंतविलेल्या रकमेवर चांगला परतावा दिला जातो… असे सांगून अनेक गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे खोटे आमिष दाखवुन फसवणुक करणारी महिला राजश्री राजेश तुडयेकर हीला शिवाजीनगर पोलीसांनी अटक केली आहे.

 रॉयल फॉरेक्स ट्रेडींगच्या राजश्री राजेश तुडयेकर हीच्या विरोधात शिवाजीनगर येथे भादवि कलम 406,409,420, सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, 1999 (एमपीआयडी) कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


या गुन्हयाच्या तपासा दरम्यान आरोपी राजश्री राजेश तुड्यकर हीने अनेक गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे खोटे आमिष दाखवुन आर्थिक फसवणुक केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्यानंतर, या महिलेस बेळगांव, राज्य कर्नाटक येथुन शिवाजीनगर पोलीसांनी ताब्यात घेवुन सदर महिलेस नमुद गुन्हयात अटक केली आहे. सध्या आरोपी राजश्री राजेश तुड्यकर हि दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी पासून न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृह, पुणे येथे असून या महिलेने ज्या गुंतवणुकदारांना जास्त परताव्याचे खोटे आमिष दाखविले आहे, त्यांच्याकडे तपास केला असता, त्यामध्ये या गुन्हयाची व्याप्ती मोठी असल्याचे निष्पन्न झाले आहे.


 तरी रॉयल ट्रेडिंग कंपनी मध्ये गुंतवणुक करणा-या इतर गुंतवणुकदारांना शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे संपर्क करण्याचे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरीशकुमार दिघावकर यांनी याव्दारे आवाहन केले आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त, श्री संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-1 श्री. कृषीकेश रावले, सहा पोलीस आयुक्त, श्रीमती अनुना देशमाने विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरीशकुमार दिधावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमर काळंगे, सहा पोलीस निरीक्षक श्री. संतोष पाटील, पोलीस हवालदार तेजस चोपडे, पोलीस हवालदार नलिनी क्षिरसागर, पोलीस अंमलदार आदेश चन्नवादी, महिला पोलीस अंमलदार सोनाली सुतार व तांत्रिक विश्लेषक पोलीस अंमलदार अविनाश दरवडे परिमंडळ एक यांनी केली आहे.