
पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दर दोन किंवा तीन वर्षांनी बदली होते, त्यात बांधकाम आणि टॅक्स विभाग म्हणजे मलईदार खाते. पथ, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा ही दुसऱ्या क्रमांकाची खाती, जिथं हात घालू तिथे पैसाच पैसा आहे. परंतु दोन 3 वर्षांनी बदलीची कट कट मागे लागलेली असते. त्यात आयुक्त,अति. आयुक्त आणि उपआयुक्त घेण्या-देण्यातील असतील तर काही चिंता नसते. त्यातल्या त्यात खातेप्रमुख आणि विभागप्रमुख मुठीतील असतील तर सोने पे सुहागा… परंतु जर बदल्या झाल्याच तर पुढे काय करावे असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. बदली कशी रद्द करावी व पुनः मूळ खात्यात कसे रिव्हर्ट व्हावे यांच्यासाठी ही खास बातमी. उदाहरण दुसऱ्याचे आहे, परंतु अभ्यास करण्यासारखे आहे.
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयातील झाडण कामांची कंत्राटी बंद घरे, नवीन कंत्राटी नोकर भरती, कायम सेवकांची बंद घरे, बल्क वेस्ट, हॉटेल, प्लास्टिक कारवाई व कचरा प्रकल्प यातून दरमहा लाखो रूपयांची वसुली सोडून धनकवडी क्षेत्रिय कार्यालयात बदलीचा आदेश अति. आयुक्तांनी काढल्यानंतर, सिंहगड क्षेत्रिय कार्यालयात मागील 12 वर्षात उभं केललं आर्थिक साम्राज्य सोडून जावे लागु नये म्हणून, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयातून धनकवडी क्षेत्रिय कार्यालयातील बदली रद्द करण्यासाठी पाच 50 लाख रुपये खर्ची पडले तरी बेहत्तर, तसेच पुणे मनपाच्या नियमांची अंमलबजावणी करणारे, वाटेत आडवे येणाऱ्यांच्या तोंडात नोटांचे बंडल कोंबुन त्यांना शांत करून, बदली रद्द करण्यासाठी मेडिकलची रजा घेण्यात आली. मेडिकल लिव्ह अर्थात वैदयकीय रजेच्या नावाखाली पुणे, मुंबई, नागपुर व्हाया… बारामतीच्या चकरा मारून अखेर 25 डिसेंबर 2023 रोजी बदली आदेशावर अतिरिक्त आयुक्तांकडून पाणी सोडण्यात आले व 26 डिसेंबर 2023 रोजी पुनः सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात रुजु झालेले आरोग्य निरीक्षक आशिष माणिक सुपणार यांचा बदली रद्दचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. आरोग्य निरीक्षक सुपणार यांना 53 + 12 = 65 दिवस कायदेशिर रजेवर ठेवण्यात सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय व धनकवडी आंबेगाव क्षेत्रिय कार्यालयाने दाखविलेले औदार्य वाखाणण्यासारखे आहे. पुणे मनपा सेवा विनियम-1987 आणि इतर कायदे कसे गुंडाळून ठेवता येतात याचे उत्तम उदाहरण आशिष सुपणार यांनी दाखवुन दिले आहे. तसेच ज्यांनी रूपाली चाकणकर यांच्या तक्रार अर्जासह, नवीन पुराव्यासह मागील दीड/दोन वर्षांपासून तक्रार अर्ज केले आहेत, त्या पाठपुरावा करणाऱ्या तक्रारदारांना देखील उपआयुक्त सामान्य प्रशासन, उपआयुक्त घनकचरा व उपआयुक्त परिमंडळ क्र. 03 यांनी तक्रार अर्ज खालून वर व वरून खाली कसे पाठविले तसेच तक्रारदारांना कसे गरा- गरा फिरविले व सुपणार यांची चौकशी न करता कायदेशिर संरक्षण दिले, त्या सर्व उपआयुक्तांना कडक सॅल्युट ठोकुन, कायदा कसा मोडता येतो याचे उदाहरण पुणे मनपाच्या सेवकांपुढे ठेवले आहे. किती आजारी व रजा आवश्यक असलेल्या सेवकांना 3 दिवसांपेक्षा अधिक रजा दिली जात नाही. इथे तर 65 दिवसांची रजा दिली आहे.
पुणे मनपाचे आयुक्त, उपआयुक्तांनाही दोन महिन्यांची रजा मिळत नाही, बदली नंतर सुपणार 65 दिवस मेडिकलवर ?
पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडील आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार मागील 15 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा बदलीचा अधिनियम लागु केला गेला नाही, त्यामुळे त्यांची बदली केली जात नाही. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या तत्कालिन अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांनी केलेल्या तक्रार अर्जामुळे सुपणार यांनी केलेला आर्थिक गैरव्यवहार प्रथमच समोर आला. दरम्यान श्रीमती चाकणकर यांच्या तक्रार अर्जांवर कोणतीही चौकशी न करता सुपणार यांची बदली, सुमारे 13 वर्षांनंतर सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय येथुन धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे करण्यात आली. तथापी अतिरिक्त आयुक्तांचा आदेश धुडकावुन व धनकवडी येथे रुजु न होता, सुमारे 65 दिवसांच्या वैदयकीय रजेवर निघून गेले. पुणे मनपाच्या आयुक्त, उपआयुक्त किंवा कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याला 7 दिवसांपेक्षा अधिक कालावधीची रजा मिळणे कठीण असतांना, सुपणार हे 65 दिवस रजेवर निघून केले. दरम्यान त्यांची 65 दिवसांची वैदयकीय रजा नेमकी कुणी मान्य केली रजा देणाऱ्यांना तसे अधिकार होते का.

…. अखेर, सुपणार यांची 13 वर्षानंतर बदली झाली-
श्री. सुपणार हे 2011 रोजी पुणे महापालिकेच्या सेवेत रुजु झाल्यानंतर, प्रथम टिळक रोड क्षेत्रिय कार्यालयाकडील सिंहगड रोड वरील आरोग्य कोठ्यांवर नियुक्ती देण्यात आली. पुढे 2018 रोजी पुणे महापालिकेत काही गावे नव्याने समाविष्ठ झाल्यानंतर, टिळक रोड क्षेत्रिय कार्यालयाचे नामांतर सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय करण्यात आले. 2011 ते 2018 टिळक रोड क्षेत्रिय कार्यालय व 2018 ते आज 2026 पर्यंत सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय असे एकुण 15 वर्ष एकाच सिंहगड रोड येथील आरोग्य कोठ्यांवर कार्यरत आहेत.
दरम्यान रूपाली चाकणकर यांनी सुपणार यांच्या विरूद्ध दिलेल्या निवेदनामुळे, सुपणार यांच्या साम्राज्याला प्रथम धक्का देण्यात आला. दि. 5 ऑक्टोंबर 2023 रोजी सुपणार यांची धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे बदली करण्यात आली. दि. 9 ऑक्टोंबर 2023 रोजी सिंहगड कार्यालयाने सुपणार यांना कार्यमुक्त केल्याच्या नोंदी आहे. त्यानंतर सुपणार यांनी अति. आयुक्तांच्या आदेशानुसार 9 ऑक्टोंबर 2023 रोजी धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे पदभार स्वीकारणे अपेक्षित असतांना, सुपणार यांनी दि. 2 डिसेंबर 2023 रोजी धनकवडी येथे पदभार स्वीकारला. दरम्यान दि. 9/10/2023 ते 1/12/2023 या 53 दिवसांच्या कालावधीत सुपणार हे वैदयकीय रजेवर गेले असल्याचे सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्ष त्यांच्या नोदी आढळुन येत नाहीत. पुणे महापालिकेच्या आयुक्तांसह कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्याला 7 दिवसांपेक्षा अधिक काळ रजा देता येत नाही. तसे वैदयकीय प्रमाणपत्रही मिळत नाही.
मग, सुपणार यांना वैदयकीय रजा कुणी दिली….
सिंहगड क्षेत्रिय कार्यालयाकडून श्री. सुपणार यांच्या बदली व रजेची माहिती देण्यात आली आहे. यात रजेबाबत धनकवडी क्षेत्रिय कार्यालयातील बदलीचे कारण देण्यात आले आहे. सिंहगड कार्यालयाने दि. 9 ऑक्टोंबर 2023 रोजी कार्यमुक्त केल्याने रजा देण्याचा आमचा म्हणजे सिंहगड क्षेत्रिय कार्यालयाचा अधिकार राहत नसल्याची माहिती तत्कालिन वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. मंगलदास माने यांनी सांगितले आहे. बदली व पदस्थापनेचा तो निर्णय प्रशासनाचा असतो.
धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे सुपणार यांच्या रजेबाबत विचारणा केली असता, धनकवडी-आंबेगाव क्षेत्रिय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. विक्रम काथवटे यांनी माहे 2023 मधील सर्व अभिलेखे आमच्या समोर ठेवत सांगितले की, श्री. सुपणार हे धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे दि. 7 डिसेंबर 2023 रोजी रुजु झाले. दि. 7 ते 9 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यरत होते. पुढे 10 तारखेला रविवार होता. दि. 11 ते 23 डिसेंबर 2023 रोजी एलटीसी म्हणजे वैदयकीय रजा मिळवुन सुपणार निघून गेले. त्यानंतर सुपणार हे दि. 24 डिसेंबर 2023 रोजी रजेवरून, पुनः धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे रुजु झाले व 25 डिसेंबर 2023 रोजी पुनः सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय येथे बदलीने नियुक्त झाले. दरम्यान धनकवडी-आंबेगाव क्षेत्रिय कार्यालयाने सुपणार यांना 12 दिवसांसाठी वैदयकीय रजा कशाच्या आधारे दिली हा प्रश्न पुन्हा निर्माण होत आहे.

सुपणार यांना आम्ही रजा दिली नाही-काथवटे
धनकवडी-आंबेगाव क्षेत्रिय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. विक्रम काथवटे यांनी नमूद केले की, श्री. सुपणार हे धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे रुजु झाले नाहीत, त्यामुळे दि. 9/10/2023 ते 1/12/2023 या दोन महिन्यांच्या कालावधीत त्यांना आम्ही रजा देण्याचा प्रश्नच नव्हता. तो आम्हाला अधिकारही नव्हता. परंतु श्री. सुपणार यांच्या बदलीनंतर, म्हणजे ऑक्टोंबर 2023 मध्ये त्यांचे सेवापुस्तक आमच्या धनकवडी क्षेत्रिय कार्यालयात, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाने पाठविले. परंतु श्री. सुपणार हे आमच्या कार्यालयात हजर झाले नव्हते, त्यामुळे त्यांचे सेवापुस्तक आम्ही पुन्हा सिंहगड कार्यालयाकडे पाठविल्याचे नमूद केले आहे. दरम्यान अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार एखादा सेवक बदली आदेशानंतर, बदलीच्या खात्यात रुजु झाला नाही तर, त्याच्या विरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा असा आदेश असतानाही धनकवडी-आंबेगाव क्षेत्रिय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. विक्रम काथवटे यांनी प्रस्ताव दाखल केला नाही. याचा अर्थ काथवटे देखील सुपणार याच्या कटात सहभागी झाले होते काय याचा तपास होणे आवश्यक ठरत आहे.
प्रदीर्घ रजा नेमकी कुणाला दिली जाते –
अ वर्ग महापालिका व शासकीय कर्मचाऱ्याला क्षयरोग (टी.बी.), कर्करोग (कॅन्सर), कुष्ठरोग, पक्षाघात (पॅरालिसिस), हृदयविकार, आणि मानसिक आजार यांसारख्या गंभीर आजारांसाठी महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 अंतर्गत विशेष वैद्यकीय रजा मंजूर केली जाते. त्यातही वैदयकीय रजेसाठी, वैदयकीय प्रमाणपत्र सादर करावे लागते. रजा घेण्यासाठी शासकीय मान्यताप्राप्त किंवा अधिकृत वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते.
दरम्यान महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 अंतर्गत विविध प्रकारच्या रजा मिळतात यामध्ये प्रामुख्याने नैमित्तिक रजा (8 दिवस), अर्जित रजा (वार्षिक 30 दिवस), अर्धवेतनी रजा, वैद्यकीय रजा आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा (180 दिवस) यांचा समावेश होतो. आशिष सुपणार यांनी नेमक्या कोणत्या प्रकारचे प्रमाणपत्र सादर केले होते हा गहन प्रश्न आहे. कोणतेही हॉस्पीटल एवढेच कशाला, पुणे मनपाचे कमला नेहरू रूग्णालय व ससुन हॉस्पीटल देखील 7 दिवसांपेक्षा अधिक काळासाठी रजेसाठी वैदयकीय प्रमाणपत्र देत नाही. दर 7 दिवसांनी पुन्हाः वैदयकीय प्रमाणपत्र घ्यावे लागते. इथे तर सुपणार यांनी एकाच वेळी 53 दिवस व पुढे 12 दिवस वैदयकीय रजा घेतली आहे. त्यातही सुपणार यांची सिंहगड येथे बदली झाल्यानंतर, त्यांचे सर्व आजार बरे झाले व पुढे त्यांनी एकही दिवस रजा घेतली नाही हे विशेष आहे.

सुपणार याच्या फौजदारी पात्र कटात कोणते अधिकारी सामील आहेत-
दरम्यान सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाकडील आरोग्य निरीक्षक आशिष माणिक सुपणार यांनी केलेली कंत्राटी नोकरभरती, तसेच राज्य महिला आयोगाच्या तत्कालिन अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांनी दिलेले निवेदन, सुपणार यांची बदली व बदलीसाठी मेडीकल रजेचा केलेला गैरवापर, त्यावर न झालेली चौकशी, उपआयुक्त घनकचरा यांनी सुपणार यांच्याबाबत चौकशीत दाखविलेली उदासिनता यामुळे पुणे महापालिकेचे झालेले आर्थिक नुकसानीस नेमके कोणते अधिकारी जबाबदार आहेत अशी विचारणा केली असता, उपलब्ध झालेल्या कागदपत्रानुसार, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाचे तत्कालिन 1) प्रशासन अधिकारी व आजचे सहायक महापालिका आयुक्त तिमय्या जंगले, 2) वरिष्ठ लिपिक बाळासाहेब कोंढाळकर, 3) धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. विक्रम काथवटे, 4) राज्य शासनाच्या प्रतिनियुक्तीवरील एक महिला अधिकारी व सध्या कार्यरत 5) उपअभियंता तथा सहा. महापालिका आयुक्त श्री. वाघमोडे हेच पाच अधिकारी सुपणार यांनी केलेल्या फौजदारीपात्र कटात सहभागी झाल्याचे दिसून येत आहे.
सुपणार यांची आरोग्य निरीक्षक संघटना व वेतनश्रेणी वाढविण्याच्या नावाखाली 25 लाखाचा अपहार-
तसं प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात एक तरी सुपणार आहे. आता ह्याच सुपणारांनी पुणे महापालिकेत आरोग्य निरीक्षकांची संघटना स्थापन केली आहे. पुणे महापालिकेतील आरोग्य निरीक्षकांची वेतनश्रेणी एस- 10 वरून एस- 13 करण्यात सुपणार यांचा वाटा असल्याचे सांगितले जाते. परंतु सुपणार यांनी प्रत्येक आरोग्य निरीक्षकाकडून मंत्रालयातून वेतनश्रेणी वाढवुन आणण्यासाठी प्रत्येकी 15 ते 25 हजार रुपये असे एकुण 150 आरोग्य निरीक्षकांकडून वसुल केले होते. 15 हजार रुपयांप्रमाणे 150 आरोग्य निरीक्षकांकडून सुमारे 22 लाख 50 हजार रुपये जमा केले होते. पुढे ही रक्कम म्हणे मंत्रालयातील सचिव तसेच पुणे महापालिकेतील आयुक्त, अति. आयुक्त व सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त यांना दिल्याचे आरोग्य निरीक्षकांना सांगितले जात आहे. यातही मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे.
बदली रद्द करण्यासाठी सुपणार यांचा प्रवास अतिशय थक्क करणारा आहे यात शंकाच नाही. मागील 4 बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच 23 पेक्षा अधिक तक्रार अर्ज आयुक्तांकडे पडून आहेत, तरी देखील चौकशी होत नाही, इतके उपआयुक्त व सहायक महापालिका आयुक्त सुपणारच्या उपकार आणि डान्सबारखाली दबले गेले आहेत असेच म्हणावे लागत आहे.
