
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
खराडी परिसरातून सुमारे दोन लाख 61 हजार रुपयांचा पॉपी स्ट्रा (अफु) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 यांना यश आले आहे. दरम्यान खराडी परिसरात सातत्याने अंमली पदार्थांवर कारवाई केल्याचे व गुन्हा दाखल केल्याच्या नोंदी येत असल्या तरी, खराडी परिसरात एवढे अंमली पदार्थ येतात तरी कुठून हा प्रश्न निर्माण होत आहे. अंमली पदार्थापैकी बहुतांश अंमली पदार्थाविरूद्ध कारवाई करून माल जप्त करण्यात आलेला आहे. मेफेड्रोन, चर्रस, गांजा व आता तर पॉपी स्ट्रा अफु आढळुन आला आहे. त्यामुळे एकेकाळी खराडी परिसर हा आयटी हब म्हणून ओळखल जात होता. आता हाच खराडी परिसर ड्रग्ज हब म्हणून ओळखला जात आहे.
गुन्ह्याची हकीकत अशी की,
दि. 6 जून 2026 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-1 गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण व पोलीस अंमलदार असे पुणे शहर हद्दीत अंमली पदार्थ विरोधी गस्त करीत असताना खराडकर पार्क, थिटे वस्ती, साईकृपा बिल्डींगसमोर रस्त्याच्या कडेला, खराडी, पुणे येथे एक इसम हा दोन गोण्यासह संशयीतरित्या उभा असल्याचे मपोहवा सुर्यवंशी यांना दिसुन आले. नमुद इसमास ताब्यात घेवुन त्याच्याकडे विचारपुस केली असता, तो असमाधानकारक व उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्याच्या ताब्यात काहीतरी अंमली पदार्थ असल्याचा संशय आल्याने सदर इसमाची झडती घेतली असता आरोपी मुकेश विश्णोई (वय 30 वर्षे रा. खराडकर पार्क, थिटे वस्ती खराडी, पुणे) याचे ताब्यातील गोण्यामध्ये एकुण दोन लाख 61 हजार 600/-रु. किं.चा 13 किलो 80 ग्रॅम पॉपी स्ट्रा (अफु) हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द खराडी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. गौहर हसन, सहा. पो. आयुक्त, गुन्हे 3 श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली
अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण यांचे सुचनांप्रमाणे सहा. पो. निरी. अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुखे, विशाल मिलारे, निशिकांत सावंत, संजय राजे, निलेश जाधव, अतुल क्षिरसागर, सचिन लोहार, विजय कांबळे, तुषार साळुंखे, आशा भिंगारे, जान्हवी सुर्यवंशी व मंगेश गुंड यांचे पथकाने केली आहे.
