Friday, September 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

माझ्या मित्राला शिवी का दिली….., उसने घेतलेले पैसे का मागता म्हणत उत्तमनगर व वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत हत्यारे उपसली, पुण्यात चिल्लर कारणांवरून, लोक हत्यारे का काढत आहेत…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
गुन्हा करण्यास किंवा गुन्हा घडण्यास काहीतरी ठोस कारण असल्याशिवाय, गुन्हा घडत नाही ही गुन्ह्याची व्याख्या असली तरी, आता मूळ गुन्ह्याची व्याख्याच बदलण्याची वेळ आली आहे. काहीतरी चिल्लर आणि थिल्लर कारणांवरून लोक गुन्हा करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. अशाच काही घटना आज पुणे शहरात घडल्या आहेत. वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत माझ्या मित्राला शिवी का दिली म्हणून हत्यारे काढण्यात आली. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली तर उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत तर तिसऱ्याने उधार घेतलेले पैसे का मागतो म्हणून तिथेही दुसऱ्याने हत्यारे काढुन दहशत निर्माण करण्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांच्या मनांत कायदयाचा धाकच राहिला नसल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे.

मित्रास शिवी का दिली-
वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील रायसोनी कॉलेज गेट समोर येथे एक 22 वर्षीय इसम वय 22 वर्ष (रा. आव्हाळवाडी रोड वाघोली) हे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी मित्रासोबत थांबलेले असतांना, एकुण तीन आरोपींनी मोटारसायकलवरून फिर्यादी यांच्या मित्रास शिवी का दिली या कारणावरून त्यांच्यात वाद झाले. यावेळी संबधित 3 आरोपींनी धारदार हत्याने फिर्यादीच्या मित्रास पाठीवर, डोक्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करून गंभीर जखमी करून जबरी मारहाण करण्यात आली. वाघोली पोलीस स्टेशन येथे एकुण तीन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे करीत आहेत.

उसने पैसे का मागता –
उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अयप्पा मंदिराचे बाजुला कॅनॉल रोड, कोपरे रोड, उत्तमनगर येथे एक 36 वर्षीय फिर्यादी यांनी त्यांच्या ओळखीच्या इसमास उसने घेतलेले पैसे मागण्यासाठी गेले असतांना आरोपी शुभम पांडूरंग जाधव वय 24 वर्ष (रा. भैरवनगर, कोंढवे-धावडे पुणे)याने फिर्यादी यांना म्हणाला की, उसने घेतलेले पैसे का मागता या कारणांवरून तुंबळ भांडणे झाली. यात फिर्यादी यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून हत्यारे हाता घेवून धमकी दिली. तसेच या भागात जबरी दहशत निर्माण केली.
आरोपींविरूद्ध उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार कुंभार करीत आहेत.