Thursday, March 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

फरासखाना व खडक पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरी करणाऱ्यास दरोडा-वाहनचोरी पथकाने केले जेरबंद

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील फरासखाना व खडक पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहन चोरीच्या घटना घडून गुन्हे दाखल करण्यात आले होते. या वाहन चोरी प्रकरणी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 कडील पोलीस अंमलदार तपास करीत होते. दरम्यान फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील वाहन चोरीबाबत आरोपींचा शोध घेत असतांना, गोकुळ नगर कात्रज येथील वाहन चोरटयाचा तपास लागला.

गुन्ह्याची हकीकत अशी की,
फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील वाहन चोरीचा शोध दरोडा-वाहनचोरी पथक, संबंधित गुन्हा दाखल झालेपासून सीसीटीव्ही फुटेज चेक करीत होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माहीती प्राप्त झाली की, सदर गुन्ह्यातील वाहनचोरी करणारा संशयित इसम हा गोकुळनगर, कात्रज या परीसरात फिरत आहे.

सदरची माहीती पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 वर्षा देशमुख यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसर नमुद ठिकाणी स्टाफसह सापळा रचून संशयितास त्याच्या रहाते घराचे टेरेस वरून ताब्यात घेण्यात आले. त्यास त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव राकेश दिपक विश्वकर्मा वय-19 वर्षे (रा. शिवशंभो गल्ली नं.1, गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड, कात्रज पुणे)  असे असल्याचे सांगितले. 

त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत एक पांढ-या रंगाची ॲक्टीव्हा मोपेड गाडी नंबर 128169 तसेच खडक पोलीस स्टेशन हद्दीत एक पांढऱ्या रंगाची ॲक्टीव्हा मोपेड गाडी नंबर 423017 या गाड्या चोरी केल्याचे कबुल केल्याने त्यास फरासखाना पोलीस स्टेशन येथे पुढील कारवाईकरीता ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई  पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 श्रीमती वर्षा देशमुख, यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, अजित शिंदे, रविंद्र लोखंडे, दत्तात्रय पवार, धनंजय ताजणे, महेश पाटील, साईकुमार कारके व शिवाजी सातपुते तसेच महिला पोलीस अंमलदार साधना पवार, रेहाना शेख व विद्या पन्हाड दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1. गुन्हे शाखा यांनी केली आहे.