Thursday, March 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

स्पोर्ट बाईकवर भरधाव येवून मोबाईल हिसकावणाऱ्या परप्रांतिय टोळीचा पर्वती पोलीसांनी केला पर्दाफाश, चोरांचा पाठलाग, 8 मोबाईल व 1 मोटारसायकल जप्त

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरात रस्त्याने एकटे मोबाईलवर बोलत चालणाऱ्या इसमांचे फोन स्पोर्ट बाईकवर भरधाव वेगात येवुन, अचानक हिसकावून घेवून, चोरी झाल्या दोन घटना पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत घडल्या. पर्वती पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे यांनी सी.सी.टी.व्ही. च्या आधारे शोध घेत असतांना, नवी मुंबई पासिंग असलेल्या वाहनावर पुण्यात चलन पडले होते.

यमाहा आर-15 या वाहनावर पुणे शहरात वाहतुक पोलीसांकडून चलन करण्यात आल्याने पोलीस वाहनाच्या मालकाचा शोध घेत असतांना, नवी मुंबई येथून संबंधित वाहन चोरी झाल्याची नोंद आढळुन आली.  सदरील वाहन चोरीचे असल्याचे व ते पुण्यामध्ये वापरात असल्याचे धागेदारे मिळाल्यानंतर, पुण्यामध्ये संबधित बाईक चालविणाऱ्या चोरट्यांचा शोध घेवून त्यांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने पकडले असता त्यांच्याकडुन  सुमारे 8 मोबाईल फोन व चोरीची मोटार सायकल जप्त करण्यात आली.

पकडलेल्या आरोपरींची नावे –
1) अर्जुन कमलेश सरोज, वय 18 वर्षे सध्या रा. कार्तिकेश्वर हॉटेल शाखा नंबर 03 त्रीमुर्ती चौक, आंबेगाव पठार, पुणे ) मुळ रा. राज्य उत्तर प्रदेश
2) इमरान शफीक शेख वय 18 वर्षे, (रा. रॉयल जीमजवळ ऊंड्री चौक, पुणे व सेक्टर नं 19, पुनीत कॉर्नर, कोपरीगाव, नवी मुंबई ) मुळ रा. राज्य झारखंड,
3) रवीकुमार राजेंद्रकुमार वय 21 वर्षे (रा. रॉयल जीम जवळ उर्दी चौक पुणे) मुळ रा. उत्तर प्रदेश,
4) प्रदिप कुमार महेंद्रकुमार वय 21 वर्षे (रा. किर्तीश्वर हॉटेल, शाखानंबर 03, त्रिमुर्ती चौक, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, पुणे) मुळ रा. राज्य उत्तर प्रदेश
अशी असुन ते सर्व परप्रांतीय आहेत. सदर आरोपींवर पर्वती पोलीस स्टेशन येथे भा.न्या.सं.क 304.3 (5) अन्वये दाखल गुन्हयात अटक करण्यात आले आहे

नमूद कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग, पुणे शहर श्री राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परि-02 श्री. मिलिंद मोहिते, सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली 


पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश गरगजे, महेश मंडलिक, सुर्या जाधव, मनोज बनसोड, नाना सोखाडे, सदाग शेख, अमित विव्हे, अमोल दबडे, राकेश सुर्वे यांनी केली.