
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
अप्पा बळवंत चौक ते मंडई, मडई ते शनिवारवाडा, अप्पा बळवंत चौक ते रेडलाईट एरिया या संपूर्ण दाट लोकसंख्येच्या भागावर सीसीटीव्हीची नरज असली तरी पुणे शहरातील उपपोलीस आयुक्तालय असलेले फरासखाना इमारतीतील पोलीस आणि ज्या गुन्हेगारांचा इथे सतत राबता असतो, त्याच फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर हदीत 12 फेबु्रवारी श्री भारतीय इलेक्ट्रानिक्स नावाचे दुकानाचे शटर उचकटुन सुमारे 1 लाख 25 रूपयांच्या इलेक्ट्रीकल पॉलीकॅब वायर चोरी झाल्याचा गुन्हा घडला होता. सीसीटीव्ही, पोलीस आणि सराईत गुन्हेगारांच्या नजरेखाली चोरी झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. तथापी फरासखाना पोलीसांनी देखील प्रयत्नांची पराकष्टा करीत चोरट्यांना अटक करण्यात यश मिळाले आहे.
फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत प्रभारी प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी व पोलीस अमंलदार यांना सुचना दिल्यानंतर, तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक, वैभव गायकवाड, पोलीस उप-निरीक्षक, अरविंद शिंदे यांनी तपासाची दिशा ठरवुन, गुन्हा घडल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, सोबतचे पोलीस स्टाफचे मदतीने तपास करीत असताना, पोलीस अंमलदार पासलकर, राठोड व खुट्टे यांना त्याचे गुप्त बातमीदारमार्फतीने बातमी मिळाली की, घरफोडी गुन्हा केलेले इसम हे वडारवाडी परिसरात राहण्यास आहेत.
त्याअनुषंगाने पोलीस अंमलदार पासलकर, राठोड व खुट्टे यांनी वडारवाडी परिसरात जावुन बातमीदारामार्फतीने आणखीन माहिती घेवुन गुन्हा करणारे 5 संशयीत इसमांना ताब्यात घेतले. तपासात त्यांनी गुन्हा केला असल्याचे कबुली दिली आहे.
पोलीस उप निरिक्षक संतोष गोरे यांनी 1) आदित्य संतोष बंडगर वय 20 वर्षे रा. वडारवाडी, शिवाजीनगर पुणे 2) प्रेम भाऊराव बोदडे वय 21 वर्षे रा. सदर 3) पवन संजय चव्हाण वय 19 वर्षे रा. सदर असे 3 आरोपीतांना अटक व 2 अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले आहे. तसेच सदर गुन्हयात चोरीस गेलेल्या पॉलीकॅब वायर तसेच आरोपीतांनी गुन्हा करते वेळी वापरलेल्या 2 मोपेड मोटार सायकल असा एकुण 2 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन, गुन्हा उघडकीस आणुन, उल्लेखनिय कामगीरी केली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-1 पुणे शहर श्री. कृषिकेश रावले., सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग श्रीमती अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली
वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रशांत भस्मे यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरी वैभव गायकवाड, पोलीस उप-निरी. अरविंद शिंदे, पोलीस उप-निरी. संतोष गोरे, पोलीस अंमलदार कृष्णा निढाळकर, प्रविण पासलकर, महेश राठोड, तानाजी गांगरे, नितीन तेलंगे, नितीन जाधव, गजानन सोनुने, सुमित खुट्टे, चेतन होळकर, प्रशांत पालांडे, आनंद गाने, महेश पवार, शशिकांत ननावरे यांनी केलेली आहे.
