
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल पवार यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर, पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना हद्दीत पेट्रोलिंग करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच श्री. विठ्ठल पवार देखील वेळोवेळी हद्दीत पेट्रोलिंग करीत असतात. सोमवार दि. 9 रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत गस्त घालत असतांना, उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या राजमुद्रा सोसायटीत बेकायदेशिरपणे हुक्का पार्लर सुरू असल्याची खबर मिळाल्यानंतर, तातडीने विनापरवाना सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई करून जागेच्या मालकासह चौघांना अटक करून त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे.
गुन्ह्याची हकीकत अशी की,
सहकारनगर पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार दि. 9 फेब्रुवारी रोजी नियमित असे सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, गुलाबनगर चौकात आले असता, पोलीस अंमलदार अमोल पवार यांना माहीती मिळाली की, राजमुद्रा हौसींग सोसायटीतील मेहेर लिव्हींग बिल्डींग शेजारील श्री. गुरु नानक कृपा बिल्डींगमधील तिसऱ्या मजल्याच्या टेरेसवर अवैध हुक्का पार्लर विनापरवाना चालु असल्याची बातमी मिळाली.
पोलीस अंमलदार अमोल पवार यांनी लागलीच सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक गणेश कर्चे यांना कळविल्यानंतर, लागलीच सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पालीस निरीक्षक श्री. विठ्ठल पवार यांना सांगितले असता, त्यांनी लागलीच तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले.
त्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी राजमुद्रा हौसींग सोसायटीतील मेहेर लिव्हींग बिल्डींग शेजारील श्री. गुरु नानक कृपा बिल्डीगमधील तिसऱ्या मजल्याच्या टेरेसवर प्रवेश करून जिन्याने टेरेसवर जावुन तेथील लाकडी दरवाजा तोडुन, छापा टाकला असता हॉलमध्ये एकुण 06 टेबल मांडलेले दिसले. त्यामधील 04 टेबलवर 08 इसम हुक्का पलेवरचे सेवन करताना मिळुन आले.
काऊंटरवर हजर असलेल्या इसमाकडे सदरबाबत चौकशी करता तेथे हॉटेल मालक व वेटर हे मिळुन आले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता हॉटेल मालकाने त्याचे नाव -
1) राजसिंग भजनसिंग गोरोवाडा वय 35 वर्षे राजमुद्रा सोसायटी धनकवडी पुणे
2) पारस परमानंद शर्मा वय 24 वर्षे रा. सदर मुळ रा. नेपाळगंज जि. बाके नेपाळ
3) सुभाष मानसिंग गिरी वय 20 वर्षे रा. सदर मुळ रा. कंचनपुर जि.बिलोरी नेपाळ
4) तिलक भोला तिवारी वय 35 वर्षे रा. सदर मुळ रा.टिकापुर जि. कैलानी नेपाळ
5) नारायण मेघे आचार्य वय 34 वर्षे रा. सदर मुळ रा. रा. टिकापुर जि. कैलानी नेपाळ
अशी असल्याची सांगितली. हॉटेलच्या किचनची पाहणी केली असता तेथे विविध फ्लेवरचे हुक्का भरलेले चिलीमसह टेबलवर मिळुन आलेले हुक्का पॉट व साहित्य तसेच किचनमधील विविध फ्लेवरचे हुक्का भरलेले चिलीम मिळुन आल्याने सदरचा 12 हजार 495 रुपयांचा माल पंचासमक्ष जप्त करुन त्यांच्याविरूदध्द सहकारनगर पोलीस स्टेशन येथे 43/2026 नुसार गुन्हा दाखल केला असून, त्यांच्यावर भारतीय न्यायसंहीता 2023 चे क. 123, 3(5) तसेच सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018 चे क. 4 अ. 21 अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-2. मिलींद मोहीते, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्री. धन्यकुमार घोडसे, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. मनोजकुमार लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली
तपास पथकाचे पोउनि गणेश कर्चे, सद्दामहुसेन फकीर, सहा. पोउनि बापु खुटवड, व पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, किरण कांबळे, बजरंग पवार, सागर सुतकर, आशिष ढमाळ, निखील राजीवडे, अभिजीत वालगुडे, महेश भगत, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे, अभिमान बागलाने, अमित पदमाळे, मारोती नलवाड, रफीक तडवी यांनी केली.
