
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे सातारा रस्त्यावरील बालाजीनगर व के.के. मार्केट येथे मागील अनेक वर्षांपासून बेकादेशिररित्या मसाज पार्लर, स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू आहे. वारंवार तक्रारी करूनही पोलीस दाद देत नाहीत. अनेकदा पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर, तात्पुरते बंद ठेवण्यात येते. पंरतु स्पा च्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर कठोर कारवाई करण्याची स्थानिक नागरीकांनी मागणी केली आहे.
पोलीस नियंत्रण कक्षाला रोज/रोज फोन केल्यावरच कारवाई करणार का –
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बालाजीनगर,के.के. मार्केटजवळ आयुर्वेदिक स्पा व मसाज पार्लच्या नावाखाली दिवस-रात्र वेश्याव्यवसाय सुरू आहेत. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर, तेथे मार्शल येतो व कुठे चालु आहे ते दाखवा म्हणतो. पण पोलीस येण्याच्या आतच मसाज पार्लर, स्पाचे शटर/ दार बंद झालेले असते. कुलूप लावले जाते. पंरतु पुन्हा काही तासाने सुरू झालेले असते. रोज,रोज उठुन पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला तरी दाद मिळत नसल्याचेही काही नागरीकांनी सांगितले आहे.
कित्येक नागरीकांवर पोलीसांनी खोटे गुन्हे दाखल केले –
बालाजीनगर येथील स्पा, मसाज पार्लर नेमका कुणाचा आहे, हे कुणालाही माहिती नाही. दरम्यान ज्या ज्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तक्रार अर्ज दिले, त्या प्रत्येकावर सहकारनगर पोलीसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच या मसाज पार्लरला संरक्षण देण्यात आले आहे. मागील 10/12 वर्षात सुमारे 20 ते 25 कार्यकर्त्यांवर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर सहकारनगर पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. नेमकं याच्यामागच काय कारण आहे याच्याच संभ्रमात इथले नागरीक असल्याचे दिसून आले आहे. आयुर्वेदिक स्पा आहे, इथे अवैध काही होत नाही असे सांगितले जाते. मसाज हा संपूर्ण कपड्यासहित केला जात नाही तर त्यासाठी निर्वस्त्र केले जाते, पुरूष निर्वस्त्र झाल्यानंतर, त्याला कोणत्याही तेलाने किंवा क्रीम ने मसाज केल्यानंतर त्याच्या आंतरिक भावना संपलेल्या असतात की, भावना उत्तेजित केल्या जातात हा मुद्दा असला तरी प्रत्येक वेळी व काही महिन्यानंतर या मसाज पार्लर,स्पावर नव नवीन मुली व महिला अशा दिसून येतात हा मुद्दाही काही नागरीकांनी उपस्थित केला आहे.
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बंद नाहीत-
पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी, पुणे शहरात कुठेही अवैध व बेकादेशिर धंदे सुरू असल्याचे दिसल्यास तत्काळ कारवाई करू, तसेच पोलीसांवर देखील कारवाई करू अशा आशयाचे वृत्त सोशल मिडीयावर फिरत असते. तथापी सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बंद नाहीत. सगळे जसेच्या तसे सुरू आहे. के.के. मार्केट जवळील स्पा, मसाज पार्लर आजही सुरू आहे. केकेच्या नाल्यातील व पार्कींग जवळील मटका, जुगार आजही सुरू आहे. ते कधी बंदच झाले नसल्याची माहिती नागरीकांनी दिली आहे. तळजाई पठार लुंकड शाळेजवळ तर हातभट्टीचाही धिंगाणा सुरू असतो, त्यातच काही घरांमधुन मटका, जुगार चालविले जात असल्याचे दिसून आले आहे. तसेच धनकवडी शेवट बसस्टॉप जवळही मटका जुगार चालु असल्याने सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाने उचल खाल्ली असल्याचे दिसून येत आहे. पोलीस आयुक्त फक्त बोलतात, स्थानिक पोलीस कधीच कारवाई करीत नाहीत. याचा अर्थ संपूर्ण पोलीस यंत्रणाच अवैध धंदयाच्या पाठीशी उभी आहे असेच यातून दिसून येत आहे.
