Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

देशात बनावट दारूमुळे गेल्या 6 वर्षांत 6 हजार 954 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली/दि/ प्रतिनिधी/
2016 ते 2021 या 6 वर्षांच्या कालावधीत बनावट मद्य प्राशन केल्याने 6 हजार 954 लोकांनी आपला जीव गमावला आहे. ही आकडेवारी लोकसभेत सादर करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात बनावट दारूमुळे गेल्या सहा वर्षांत सर्वाधिक 1 हजार 322 जणांना जीव गमवावा लागला आहे. मध्यप्रदेशात 1 हजार 322, बिहारमध्ये 23 आणि गुजरातमध्ये 54 मृत्यू झाले आहेत.
दरम्यान, सारण जिल्ह्यातील ईशुआपूर पोलीस स्टेशन हद्दीतील मृतांच्या मृतदेहाजवळ कथितरित्या बनावट दारू पिऊन मृत्यू झालेल्या लोकांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी शोक व्यक्त केला आहे. बिहारमधील सारण जिल्ह्यात बनावट दारूमुळे झालेल्या मृत्यूवरून बिहारमधील खासदारांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली.
संजय जयस्वाल यांनी बनावट दारूमुळे होणार्या मृत्यूला राज्य सरकार पुरस्कृत मृत्यू म्हणत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. गेल्या सहा वर्षांत बनावट दारूमुळे भाजपशासित मध्य प्रदेश आणि गुजरातपेक्षा बिहारमध्ये कमी जीव गेले आहेत. बिहारपेक्षा गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये जास्त मृत्यू झालेले आहेत. मध्यप्रदेशात गेल्या सहा वर्षांत 1 हजार 322 जणांना जीव गमवावा लागला आहे.