Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पोलीस आयुक्तांची ५९ वी एमपीडीए कारवाई, बिबवेवाडी पोलीसांकडील अप्परचा दाद्या शिंदे स्थानबद्ध

पुणे/दि/नॅशनल फोरम/
पुणे शहर पोलीस आयुक्तांकडून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एमपीडीएची कारवाई वेगात सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे ५९ गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील अप्पर मधील खुशाल उर्फ दाद्या संतोश शिंदे व य २२ वर्ष याला एमपीडीए अन्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे.


बिबवेवाडी येथील राजगड चाळ, राजीव गांधी नगर अप्पर येथील दाद्या शिंदे हा पुणे पोलीसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे. त्याने त्याच्या साथीदारासह बिबवेवाडी पोलीस स्टेशन, भारती पोलीस स्टेशन हद्दीत लोखंडी कोयता, लोखंडी रॉड या सारख्या जीवघेण्या हत्यांसह खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रासह इच्छापूर्वक दुखापत करणे, बेकादेशिर हत्यार बाळगणे या सारखे गंभिर ५ वर्षात सुमारे ४ गुन्हे केले आहेत.
या सर्व कृत्यांमुळे बिबवेवाडी पोलीस हद्दीत सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जिविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. बिबवेवाडी पोलीस स्टेशन कडील प्रस्ताव व त्यातील कागदपत्रांची पाहणी करून पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी श्री. शिंदे विरूद्ध एमपीडीए कायदयानुसार त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करून त्याची रवानगी औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे, पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली चांदगुडे पीसीबी गुन्हे शाखा यांनी केली आहे.